बाजारभावापेक्षा स्वस्तात करा सोन्याची खरेदी

सार्वभौम सुवर्ण (गोल्ड) बाँड योजनेद्वारे सरकार बाजार दरापेक्षा कमी किमतीत सोन्याची विक्री करते. जागतिक तसेच भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या किमतींनी आस्मान गाठले असताना आता नवीन वर्षातही गुंतवणूकदारांना या योजनेत सोने खरेदी करता येईल. सार्वभौम सुवर्ण बाँड योजना २०२३-२३ ची पुढील मालिका १२ फेब्रुवारी २०२४ रोजी जारी केली जाईल आणि या योजनेत १६ फेब्रुवारीपर्यंत सोने खरेदी करता येईल. सरकारच्या या योजनेंतर्गत बाजारापेक्षा कमी किंमतीत सोन्यात गुंतवणूक करता येते. ही सरकारी योजना असून यामध्ये भारत सरकार गुंतवलेल्या पैशाच्या सुरक्षिततेची हमी देते. केंद्र सरकारच्या वतीने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) रोखे जारी करते. इतके सोने खरेदी करता येईल रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी…

आयपीओ मार्केट बहरणार

आता हे वर्ष संपणार आहे आणि २०२४ च्या सुरुवातीची तयारी सुरू झाली आहे. शेअर बाजारही यासाठी तयारीला लागला असून पुढील वर्षीही आयपीओ बाजारात खळबळ माजवण्याची पूर्ण तयारी सुरू आहे. बाजारातून मिळालेल्या आकडेवारीनुसार सुमारे ५८ कंपन्या पुढील वर्ष २०२४ मध्ये त्यांचे आयपीओ लॉन्च करण्याच्या तयारीत असून यापैकी २७ कंपन्यांना सेबीकडून हिरवा कंदील दाखवण्यात आला असताना या कंपन्या बाजारातून २९ हजार कोटी रुपये भरण्यासाठी प्रयत्नशील असतील. याशिवाय आणखी २९ कंपन्या मंजुरीसाठी रांगेत आहेत. पुढील वर्षीही म्हणजे २०२४ मध्ये अनेक लहान-मोठ्या कंपन्या आयपीओ लॉन्च करण्यासाठी रांगेत उभे आहेत. सर्वात मोठ्या नावांमध्ये ओला इलेक्ट्रिक पहिल्या क्रमांकावर, तर ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगी देखील आयपीओ…

३१ डिसेंबरआधी ही कामे कराच! अन्यथा बसेल फटका–

डिसेंबर महिना संपून नवे वर्ष सुरू होण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. नवीन वर्ष अनेक बदल घेऊन येणार आहे. त्यामुळे तुम्हाला ३१ डिसेंबरपर्यंत अनेक कामे पूर्ण करायची आहेत. असे न केल्यास नुकसान होऊ शकते. या बदलांची आधीच माहिती असणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. १. लॉकर अॅग्रीमेंट रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) नुसार, बँकांमध्ये लॉकर असलेल्या ग्राहकांना सुधारित लॉकर करार सादर करण्यासाठी ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत वेळ देण्यात आला आहे. ग्राहकांना बँकेत जाऊन अपडेटेड करारनामा सादर करावा लागेल. असे न केल्यास, तुम्हाला लॉकर रिकामे करावे लागेल. RBI ने निर्देश दिले आहेत की या वर्षाच्या अखेरीस ग्राहकांचे १००% अपडेट केलेले करार…

SIP बाबत गुंतवणूकदारांमध्ये वाढते आकर्षण

एसआयपीचे आकर्षण कशामुळे? म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून विविध कंपन्यांचे समभाग अप्रत्यक्षरीत्या खरेदी करता येतात. प्रत्येक फंडाची योजना विशिष्ट क्षेत्रांतील समभागांमध्ये गुंतवणूक करते. ही क्षेत्रे निश्चित करण्याची, तसेच कंपन्यांची निवड करण्याची जबाबदारी फंड व्यवस्थापकाकडे असते. सामान्य गुंतवणूकदाराच्या वतीने हा व्यवस्थापक फंडाच्या विशिष्ट योजनेत पैसे गुंतवतो. या गुंतवणुकीचे मोजमाप युनिट्सच्या स्वरूपात आपल्यापर्यंत येते. या युनिट्सचे निव्वळ मत्तामूल्य (एनएव्ही) दररोज बदलत राहते. बदलत्या एनएव्हीमुळे युनिटची किंमत वरखाली होते. किंमत वाढलेली असताना युनिट विकले, तर या गुंतवणुकीतून लाभ होतो. हा सगळा खटाटोप तुलनेने कमी जोखमीचा होतो. यासाठीच एसआयपीबद्दलचे आकर्षण वाढत आहे. त्यामुळे तुम्हीसुद्धा अद्यापी SIP सुरु केली नसल्यास आत्ताच निर्णय घ्या आणि आपली अर्थ स्वातंत्र्याची…

डोम्स इंडस्ट्रीजच्या आयपीओ गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा

स्टेशनरी आणि कला उत्पादने कंपनी डोम्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या शेअर्सने आज देशांतर्गत बाजारात दमदार प्रवेश केला. कंपनीच्या आयपीओला गुंतवणूकदारांकडून जोरदार प्रतिसाद मिळाला होता आणि एकूण ९९ पेक्षा जास्त वेळा सब्स्क्राइब होऊन बंद झाला. आयपीओ अंतर्गत ७९० रुपये किमतीला शेअर्स जारी करण्यात आले होते तर आज बीएसईवर १,४०० रुपयांपासून शेअरचा प्रवेश झाला आहे. म्हणजे आयपीओ गुंतवणूकदारांना ७७% लिस्टिंग नफा मिळाला असून लिस्टिंगनंतरही शेअरमधील तेजी कायम आहेत.

आयपीओ मार्केट

गेल्या काही महिन्यांपासून आयपीओ मार्केटमध्ये गुंतवणूकदारांकडून उत्साह पाहायला मिळत असून आजचा दिवासही खूप महत्त्वाचा आहे. आज हॅप्पी फोर्जिंग लिमिटेडचा १,००८.५९ कोटी रुपयांचा आयपीओ सबस्क्रिप्शनसाठी खुला झाला असून या अंतर्गत कंपनीने ४०० कोटी रुपयांचे नवीन शेअर्स जारी केले आहेत, तर ६०८.५९ कोटी रुपयांचे शेअर्स ऑफर फॉर सेल असतील. हॅपी फोर्जिंग आयपीओ या कंपनीचा आयपीओ १९ ते २१ डिसेंबर २०२३ पर्यंत सबस्क्रिप्शनसाठी खुला राहील तर २२ डिसेंबर रोजी शेअर्सचे वाटप होऊन आयपीओ अंतर्गत शेअर्स न मिळालेल्या गुंतवणूकदारांना २६ डिसेंबरपर्यंत त्यांचे पैसे परत मिळतील. तर यशस्वी गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यात २६ डिसेंबर रोजी शेअर्स जमा होतील. बीएसई आणि एनएसईवर २७ डिसेंबर रोजी शेअर्स सूचिबद्ध…

गोल्ड बॉंड – आधुनिक सोने खरेदी

गोल्ड बॉंड - आधुनिक सोने खरेदी भारतीय लोकांना कोणत्याही शुभप्रसंगी सोने खरेदी करण्याची पारंपारिक सवय आहे. पण प्रत्यक्ष खरेदी केलेल्या सोन्यामधील गुंतवणूक सोने विकून गरजेच्या वेळी सोडवून घेणे थोडेसे गुंतागुंतीचे असते किवा अशा अत्यंत गरजेच्या वेळी “सोनेतारण कर्ज घेणे “ आवश्यक ठरते. नेमकी हीच गरज ओळखून भारत सरकारने “Sovereign Gold bonds” ही योजना सर्वसामान्यांसाठी सुरु केली आहे. यामध्ये कोणतीही व्यक्ती १ ग्रॅम पासून ४ किलोपर्यंतचे सोने खरेदी करू शकतो व हे सोने प्रत्यक्ष हातात न देता ते आपल्या demat खात्यात जमा होते. आणि ५ वर्षानंतर केव्हाही आपण त्यावेळी जो बाजारभाव असेल त्याप्रमाणे त्याची विक्री करू शकतो आणि कोणतीही वजावट न…

म्युच्युअल फंडात रेकॉर्ड-ब्रेक गुंतवणूक

म्युच्युअल फंडात रेकॉर्ड-ब्रेक गुंतवणूक म्युच्युअल फंड उद्योग व्यापार संघटना असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड ऑफ इंडिया (AMFI) ने ८ डिसेंबर रोजी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, म्युच्युअल फंड उद्योगाच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता (AUM) नोव्हेंबरमध्ये ४९.०४ ट्रिलियन रुपयांवर पोहोचली आहे. या महिन्यात बेंचमार्क निर्देशांकांनी (सेन्सेक्स-निफ्टी) सर्वकालीन उच्चांक गाठल्याने गुंतवणुकीला चालना मिळाली. तर गेल्या ऑक्टोबरमध्ये एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडातील गुंतवणूक १६,९२८ कोटी रुपये होती. SIP मध्ये २५० रुपयांपासून सुरूवात होणार? लवकरच छोटे गुंतवणूकदार म्युच्युअल फंडात २५० रुपयाच्या मासिक SIP द्वारे गुंतवणूक करू शकतील. असा निर्णय लवकरच होण्याची शक्यता आहे .

सन २०२४ साठी चांगले समभाग पहा —

आता डिसेंबर महिना संपत आलाय आणि सर्वांनाच नव्या वर्षाचे वेध लागलेत ! या नव्या वर्षाच्या कालावधीत आपल्या पार्लमेंटच्या निवडणुकाही होणार आहेत आणि त्याची झलक आपल्याला तीन राज्यांच्या निवडणुकांमधून दिसून आली आहे !! साधारणतः बीजेपी गव्हर्नमेंटच पुन्हा कंटिन्यू होईल अशा स्वरूपाच्या बातम्या आपल्याला दिसत आहे आणि या दरम्यानच या नव्याने येणाऱ्या 2024 सालसाठीच्या काही चांगल्या समभागांची यादी आपल्याला देण्याचा मोह मला आवरत नाही !! या दृष्टीने मी काही महत्त्वाचे आणि चांगले परफॉर्म करतील असे दहा स्टॉक्स आपल्या पोर्टफोलिओमध्ये असावेत असे आपल्याला सुचवीत आहे त्यापैकी पहिला समभाग आहे मॅक्स हेल्थकेअर याचा भाव 678 रुपये चालू असून त्याचे नजीकचे उद्दिष्ट सातशे रुपये गृहीत…

अ‍ॅक्सिस इंडिया मॅन्युफॅक्चरिंग फंड

भारत हा जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक देश आहे, तर GDP1 च्या बाबतीत सध्या 5 व्या क्रमांकावर आहे. भारत 20272 पर्यंत $5 ट्रिलियन GDP सह जागतिक स्तरावर तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याची सध्या अपेक्षा करण्यात येत आहे. गेल्या काही वर्षांपासून भारत देश उत्पादनांच्या बाबतीत खूपच पुढे निघून आला आहे, विविध पीएलआय योजना आणि आत्मनिर्भर भारत, मेक इन इंडिया 2.0 अशा धोरणात्मक सुधारणा, मोठे अर्थसंकल्प याद्वारे शासनानने अधिक लक्ष केंद्रीत करून उत्पादन क्षेत्राला भरीव चालना दिली असल्याचे दिसून येत आहे. एकूणच, भारतातील उत्पादनाची थीम वेगाने विकसित होत आहे. Axis India Manufacturing fundद्वारे या क्षेत्राची अफाट क्षमता मिळवण्यासाठी गुंतवणूकदारांसाठी ही योग्य…

End of content

No more pages to load