एसआयपीचे आकर्षण कशामुळे?
म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून विविध कंपन्यांचे समभाग अप्रत्यक्षरीत्या खरेदी करता येतात. प्रत्येक फंडाची योजना विशिष्ट क्षेत्रांतील समभागांमध्ये गुंतवणूक करते. ही क्षेत्रे निश्चित करण्याची, तसेच कंपन्यांची निवड करण्याची जबाबदारी फंड व्यवस्थापकाकडे असते. सामान्य गुंतवणूकदाराच्या वतीने हा व्यवस्थापक फंडाच्या विशिष्ट योजनेत पैसे गुंतवतो. या गुंतवणुकीचे मोजमाप युनिट्सच्या स्वरूपात आपल्यापर्यंत येते. या युनिट्सचे निव्वळ मत्तामूल्य (एनएव्ही) दररोज बदलत राहते. बदलत्या एनएव्हीमुळे युनिटची किंमत वरखाली होते. किंमत वाढलेली असताना युनिट विकले, तर या गुंतवणुकीतून लाभ होतो. हा सगळा खटाटोप तुलनेने कमी जोखमीचा होतो. यासाठीच एसआयपीबद्दलचे आकर्षण वाढत आहे.
त्यामुळे तुम्हीसुद्धा अद्यापी SIP सुरु केली नसल्यास आत्ताच निर्णय घ्या आणि आपली अर्थ स्वातंत्र्याची वाटचाल सुरु करा !!