रिट्स संबंधित थोडीफार माहिती.
प्रत्येकाला जमीन जुमला, घर अशा स्थावर मालमत्तेमध्ये गुंतवणूक करणे यामध्ये बऱ्यापैकी स्वारस्य असते.परंतु प्रत्येक शहरातील वेगवेगळे नियम ,प्रत्येक राज्यातील वेगवेगळे नियम, आणि त्यातील गुंतागुंत पाहता प्रत्येकाला रियल एस्टेटमध्ये स्वतःहून गुंतवणूक करणे सोपे वाटत नाही.तसेच यामध्ये लिक्विडिटी खूप कमी असते , व विक्री करताना सुद्धा खूप काळजी घ्यावी लागते.पण या क्षेत्रामध्ये होत असलेल्या वाढीचा फायदा आपल्याला घेण्यासाठी रिट्स ही एक अत्यंत चांगली सुविधा आपल्याला उपलब्ध झाली आहे.
रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट म्हणजे REITS .
हा ट्रस्ट लिस्टेड कंपन्यामध्ये येत असून यातील गुंतवणूक ही पूर्णतः लिक्विड राहते.आपण जसा शेअरचा व्यवहार करतो तशा पद्धतीने या शेअर्सचा सुद्धा व्यवहार करणे शक्य असते.आपण रिट्सचा एक शेअर घेऊ शकतो किंवा कितीही शेअर्स घेऊ शकतो !! त्यामुळे यातील गुंतवणूक म्हटली तर अमर्यादित पद्धतीची होऊ शकते.
रिट्स ही एक संस्था असून लोकांकडून पैसे गोळा करून रेसिडेन्शियल किंवा कमर्शिअल प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करते.रिट्स कार्यालय , व्यावसायिक संकुले, हॉटेल्स, मॉल, औद्योगिक जागा किंवा हॉस्पिटल्स विकत घेतात आणि त्या मोठ्या आणि नावाजलेल्या कंपन्यांना भाडेतत्त्वावर पुरवून त्यातून आपला आर्थिक फायदा करून घेतात.तसेच अशा मोठ्या व्यावसायिक संकुलांची देखभालसुद्धा या कंपन्याकडून केली जाते.ह्या रिट्सचे आपण शेअर घेतले किंवा युनिट घेतली की त्यामध्ये आपण गुंतवणूक केली असा त्याचा अर्थ होतो;आणि यामध्ये आपल्याला शेअरचा भाव वाढला की जसा फायदा होतो तशाच स्वरूपाचा फायदा हे शेअर्स विकल्यावर होऊ शकतो.
भारतामध्ये याची सुरुवात 2019 साली झाली आहे . सध्या चार कंपन्या रिट्सद्वारे लिस्टेड असून त्यामधील शेअर्सचे व्यवहार आपण करू शकतो. यातून मिळणारा परतावा हा साधारणपणे साडेआठ ते दहा टक्के या रेंजमध्ये असतो.या व्यवहारामधून आपल्याला तोटा होण्याची शक्यता खूप कमी असते. कारण रिट्सच्या जागा या तज्ज्ञ मंडळींमार्फत खरेदी किंवा विक्री केल्या जातात ! आणि सर्व व्यवहारामध्ये पारदर्शकता ठेवली जाते !!
यासंबंधी अधिक माहिती हवी असल्यास आपण आमच्याकार्यालयाशी केव्हाही संपर्क साधू शकाल.मात्र यातून.मिळणारा परतावा हा कन्सिस्टंट असतो हे मात्र निश्चित!!
धन्यवाद.
प्रदीप जोशी