आता हे वर्ष संपणार आहे आणि २०२४ च्या सुरुवातीची तयारी सुरू झाली आहे. शेअर बाजारही यासाठी तयारीला लागला असून पुढील वर्षीही आयपीओ बाजारात खळबळ माजवण्याची पूर्ण तयारी सुरू आहे.
बाजारातून मिळालेल्या आकडेवारीनुसार सुमारे ५८ कंपन्या पुढील वर्ष २०२४ मध्ये त्यांचे आयपीओ लॉन्च करण्याच्या तयारीत असून यापैकी २७ कंपन्यांना सेबीकडून हिरवा कंदील दाखवण्यात आला असताना या कंपन्या बाजारातून २९ हजार कोटी रुपये भरण्यासाठी प्रयत्नशील असतील. याशिवाय आणखी २९ कंपन्या मंजुरीसाठी रांगेत आहेत.
पुढील वर्षीही म्हणजे २०२४ मध्ये अनेक लहान-मोठ्या कंपन्या आयपीओ लॉन्च करण्यासाठी रांगेत उभे आहेत. सर्वात मोठ्या नावांमध्ये ओला इलेक्ट्रिक पहिल्या क्रमांकावर, तर ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगी देखील आयपीओ लॉन्च करण्याची शक्यता आहे. नवीन वर्षात आयपीओ लाँच करण्याच्या तयारीत असलेल्या कंपन्यांच्या यादीत कपड्यांची मोठी कंपनी FirstCry चे नाव देखील आघाडीवर आहे. उल्लेखनीय म्हणजे ओला इलेक्ट्रिकने गेल्या आठवड्यातच बाजार नियामक सेबीकडे DRHP दाखल केल्यास वृत्त आहे.
या कंपन्याही IPO साठी रांगेत
ओला, स्वीगी आणि FirstCry व्यतिरिक्त अनेक कंपन्याही प्रारंभिक सार्वजनिक ऑफर लॉन्च करण्यासाठी रांगेत आहेत. यामध्ये Ebixcash, टाटा प्ले, इंडिजीन, ओरवेल स्टेज (OYO), गो डिजिट, जनरल इंश्युरन्स आणि TBO Tek सारख्या कंपन्यांची नावे समाविष्ट आहेत. एकंदरीत २०२३ प्रमाणेच नवीन वर्षातही आयपीओ मार्केटमध्ये हिरवळ असेल आणि गुंतवणूकदारांना कमाईच्या अनेक संधी मिळतील असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.