एन एफ ओ — technology संबंधी पहाच —

सन 2000 च्या आसपास मी माझे पहिले डिमॅट अकाउंट सुरू केले आणि त्यावेळी मला अकाऊंट ओपन करताना.साधारण 69 ठिकाणी सह्या कराव्या लागल्या होत्या. त्यानंतर शेअरखानचे डिमॅट अकाउंट ओपन केले त्यावेळी साधारणपणे अशाच 38 ते 40 ठिकाणी सह्या कराव्या लागल्या! आता मी जेव्हा शेअरखान ब्रांच ऑफिस सुरू केले त्यावेळी सुद्धा प्रत्यक्ष फॉर्म भरून खाते ओपन करणे हे कटकटीचे काम असायचे. कोविड काळापासून अकाउंट ओपनिंग प्रोसेस खूप सोपी झाली आणि आता ऑनलाइन अकाउंट्स ओपन करणे एका चुटकीचे काम झाले.ही तंत्रज्ञानातील प्रगती पाहता आपण यानंतरही अनेक मोठे टप्पे गाठणार आहोत हे निश्चित आहे. सध्या टेक्नॉलॉजी च्या सहकार्याने आपण ओला उबेरने कोठेही क्षणार्धात पोचू…

एसएमई मंचावरील सर्वात मोठा ‘आयपीओ’

उल्लू डिजिटल या समाजमाध्यम कंपनीने, प्रारंभिक समभाग विक्रीद्वारे (आयपीओ) निधी उभारण्यासाठी मुंबई शेअर बाजाराच्या सूक्ष्म, लघु व मध्यम अर्थात ‘बीएसई एसएमई’ मंचाकडे मसुदा प्रस्ताव दाखल केला आहे. मसुदा प्रस्तावात दिलेल्या माहितीनुसार, या माध्यमातून कंपनी सुमारे ६२.६ लाख समभागांची विक्री करणार असून, त्यायोगे १३५ ते १५० कोटी रुपयांचा निधी उभारण्याचा तिचा मानस आहे. या ‘आयपीओ’ला मंजुरी मिळाल्यास, ही आतापर्यंतची कोणाही एसएमई कंपनीकडून या माध्यमातून होणारी सर्वात मोठी भांडवल उभारणी ठरेल. याआधी स्पेक्ट्रम टॅलेंट मॅनेजमेंटने ‘आयपीओ’च्या माध्यमातून एसएमई मंचावर १०५ कोटी रुपयांची आजवरची सर्वाधिक निधी उभारणी केली आहे. त्यापाठोपाठ आशका हॉस्पिटल्स १०१.६ कोटी रुपये, बावेजा स्टुडिओ ९७ कोटी रुपये, खजांची ज्वेलर्स ९७…

डिझास्टर रिकव्हरी सेशन म्हणजे नेमकं काय?

२ मार्च म्हणजे नव्या महिन्याचा पहिला शनिवार असूनही शेअर बाजार सुरू राहणार असून बाजारात स्पेशल ट्रेडिंग सत्र आयोजित केले जाणार आहे. सर्वसाधारणपणे शनिवार आणि रविवारच्या दिवशी राष्ट्रीय शेअर बाजार (NSE) व मुंबई शेअर बाजार (BSE) मध्ये कामकाज बंद असते मात्र, यंदा तसं होणार नाही. नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) द्वारे २ मार्च (शनिवार), २०२४ रोजी एक विशेष लाइव्ह ट्रेडिंग सत्र आयोजित केले जाईल ज्यामध्ये, इंट्राडे डिझास्टर रिकव्हरी (DR) साइटवर स्विच केले जाईल. कोणतीही अनपेक्षित घटना घडल्यास एक्सचेंजेस मजबूत करण्यासाठी विशेष सत्र आयोजित केले जात आहे, ज्यामुळे त्यांच्या कामकाजावर परिणाम होऊ शकतो. बुधवारी देशातील दोन्ही प्रमुख स्टॉक एक्सचेंजने परिपत्रक जारी करून २…

एक चूक पडेल महागात!

वाढत्या बँकिंगच्या काळात आज प्रत्येक व्यक्तीचे किमान एक तरी बँक खाते असते. तसे काही लोक विशेषतः नोकरदार लोक एकापेक्षा जास्त बँक खाती वापरतात आणि ते देखील एकाधिक बँकांमध्ये असते. परंतु लक्षात घ्या की तुमचे कोणत्याही बँकेत बचत खाते (सेव्हिंग अकाउंट) असले तरी चालू ठेवणे महत्त्वाचे असते आणि तुम्ही या खात्यांमधून पैशांची देवाण-घेवाण करत राहिल्यासच तुमचे बँक खाते चालू राहील. जर एखादा बँक ग्राहक बचत खाते किंवा चालू खाते एका वर्षासाठी वापरत नसल्यास अकाउंट निष्क्रिय होते. तर दोन वर्षे खाते निष्क्रिय असल्यास डॉरमॅन्ट किंवा इनऑपरेटिव्ह खात्यात टाकले जाते. असे झाल्यास ग्राहक त्याचे खाते वापरू शकत नाहीत. अशा परिस्थितीत तुमचे बचत किंवा…

SIP द्वारे गुंतवणुकीचा उच्चांक

इक्विटी म्युच्युअल फंडांत गुंतवणूक करण्याकडे दिवसेंदिवस कल वाढत आहे. जानेवारी महिन्यात या फंडांमध्ये गुंतवणूकदारांनी एकूण २१ हजार ७८० कोटी रुपये गुंतवले आहेत. ही रक्कम गेल्या दोन वर्षांतील सर्वाधिक मासिक गुंतवणूक ठरली आहे. यंदा जानेवारी महिन्यात नियोजनबद्ध गुंतवणुकीचा (सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे एसआयपी) उच्चांक गाठला गेला आहे. ही माहिती म्युच्युअल फंडाची मध्यवर्ती संघटना असलेल्या अॅम्फीने गुरुवारी दिली. डिसेंबर २०२३मध्ये एसआयपीच्या माध्यमातून १७ हजार ६१० कोटी रुपये गुंतवले गेले होते. जानेवारी महिन्यात १८ हजार ८३८ कोटी रुपये एसआयपीद्वारे गुंतवले गेले. इक्विटी म्युच्युअल फंडांमध्ये डिसेंबर २०२३मध्ये १६ हजार ९९७ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती. जानेवारीत त्यात २८ टक्के वाढ झाली आणि २१ हजार…

नव्याने येणारे आय पी ओ पहा

Entero Healthcare Solutions Limited या कंपनीचा  IPO 09 फेब्रुवारी 2024 ते 13 फेब्रुवारी   2024 पर्यन्त उपलब्ध असून त्याचा LOT Size  11 समभागांचा असून त्याची किंमत प्रति शेअर 1258 आहे . Jana Small  Finance bank Ltd या कंपनीचा  IPO 07 फेब्रुवारी 2024 ते 09 फेब्रुवारी   2024 पर्यन्त उपलब्ध असून त्याचा LOT Size  36 समभागांचा असून त्याची किंमत प्रति शेअर 414/ आहे. Rashi Peripherals Ltd या कंपनीचा  IPO 07 फेब्रुवारी 2024 ते 09 फेब्रुवारी   2024 पर्यन्त उपलब्ध असून त्याचा LOT Size  48 समभागांचा असून त्याची किंमत प्रति शेअर 311/-आहे . आय पी ओंची खरेदी आपण online UPI Id वापरुन…

टर्म इन्श्युरन्स — वाचा काय घ्यावी काळजी

टर्म प्लॅन घेताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आजच्या लेखात आम्ही टर्म प्लॅनच्या फायद्यांबद्दल नाही तर ज्या कारणांमुळे क्लेम मिळण्यात अडचण येऊ शकते त्याबद्दल सांगणार आहोत. टर्म इन्शुरन्सबद्दल सर्वप्रथम लक्षात घ्या की प्रत्येक प्रकारच्या डेथ कव्हरेजसाठी संरक्षण प्रदान करत नाही. १. टर्म प्लॅन घेणाऱ्या व्यक्तीला डेथ कव्हरचाही लाभ मिळतो, परंतु पॉलिसीधारकाचा नशेच्या प्रभावाखाली वाहन चालवताना मृत्यू झाला तर टर्म इंश्युरन्सचा लाभ मिळणार नाही. २. पॉलिसीधारकाला ड्रग्ज आणि अल्कोहोलचे व्यसन लागले व त्यामुळे मृत्यू झाला, तर विमा कंपनी टर्म प्लॅनच्या दाव्याची रक्कम देण्यास नकार देऊ शकते. ३. पॉलिसीधारक साहसी खेळांचा शौकीन असल्यास आणि कोणत्याही धोकादायक खेळादरम्यान मृत्यू झाल्यास टर्म…

नव्याने उपलब्ध होणारे एन एफ ओ पहा

NFO संबधी माहिती  म्युच्युअल फंड हाऊसतर्फे जेव्हा एखादी नवी योजना बाजारात आणली जाते त्याला न्यू फंड ऑफर (NFO) असे म्हणतात. आपण जेव्हा असा NFO खरेदी करतो तेव्हा त्याची युनिट्स आपल्यास रु.१० प्रति युनिट या दरानेच प्राप्त होतात. सध्या भारतीय अर्थव्यवस्था यापूर्वी कधी नव्हती तेवढी सक्षम आहे आणि अशावेळी आपण एखाद्या नव्या mutual fund स्कीममध्ये पैसे गुंतविल्यास त्याचा परतावा अत्यंत चांगला मिळू शकतो अशी स्थिती आहे. सध्या बाजारात चार नवे NFO उपलब्ध होत असून त्या संबधी थोडक्यात माहिती खालीलप्रमाणे 1)    Bajaj finserv large and Mid cap fund (बजाज पिंन्सर्व्ह लार्ज अँड मिड कॅप फंड ) -  नावाप्रमाणे हा लार्ज कॅप सेगमेंटमध्ये गुंतवणूक करणारा NFO असून ६ ते २०…

प्रधानमंत्री सूर्योदय

सरकारी सेवेत कार्यरत नसलेल्या प्रत्येक भारतीय नागरिकाला प्रधानमंत्री सूर्योदय योजनेचा लाभ मिळेल. तसेच लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न १.५ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे म्हणजे गरीब वर्ग, मध्यमवर्गीय आणि गरजू या योजनेसाठी पात्र ठरतील. अर्जदाराकडे आधार कार्ड, पत्त्याचा पुरावा, वीज बिल, बँक पासबुक, पासपोर्ट आकाराचा फोटो किंवा रेशन कार्ड यांसारखी कागदपत्रे असणे आवश्यक आहे. सूर्योदय योजनेसाठी अर्ज कसा करायचा? प्रधानमंत्री सूर्योदय योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी https://solarrooftop.gov.in/ या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. यानंतर होम पेजवर Apply पर्याय निवडा. वापरकर्त्याने राज्य आणि जिल्ह्यानुसार सर्व माहिती द्यावी प्रविष्ट करावी आणि वीजबिल क्रमांक दिल्यानंतर वीज खर्चाची माहिती व मूलभूत माहिती, सोलर पॅनलचा तपशील प्रविष्ट करावा.

मोबाइलच्या सुट्या भागांवरील आयात शुल्कात कपात

मोबाइल फोनच्या उत्पादनासाठी लागणाऱ्या सुट्या भागांच्या आयात शुल्कात कपात करण्याचा निर्णय केंद्र सरकारने बुधवारी अंतरिम अर्थसंकल्पाच्या पूर्वसंध्येला घेतला. हे आयात शुल्क आता १५ टक्क्यांवरून १० टक्क्यांवर आणण्यात आले आहे. या निर्णयाचा फायदा ॲपल आणि शाओमी कंपन्यांना भारतात मोबाइल हँडसेटची निर्मिती करण्यासाठी होईल आणि त्यांच्याकडून ग्राहकांना किमतीत ३ ते ५ टक्क्यांपर्यंत सवलत मिळणे अपेक्षित आहे. मोबाइलची बॅटरी, पाठीमागील आवरण, इतर तांत्रिक प्लास्टिक आणि धातूचे सुटे भाग, जीएसएम अँटेना आणि इतर सुट्या भागांवरील आयात शुल्कात केंद्राकडून कपात करण्यात आली आहे. या सुट्या भागांवरील आयात शुल्क १० टक्क्यांवर आणण्यात आल्याचे परिपत्रक केंद्रीय अर्थमंत्रालयाने बुधवारी काढले. या सुट्या भागांच्या उत्पादनासाठी लागणाऱ्या कच्च्या मालावरील आयात…

End of content

No more pages to load