एसआयपी कुणी करावी?
प्रथमच शेअर बाजारात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांनी एसआयपी आवर्जून करावी. त्याचप्रमाणे वेतनधारक, नोकरदार किंवा ज्यांचे उत्पन्न ठराविक तारखेला येणारे आहे, अशांनीही एसआयपी करावी. दीर्घकाळ नियमित गुंतवणुकीची सवय स्वतःला लावून घेण्यासाठी एसआयपी करावी.

शेअर बाजारात डिमॅट खात्यांची संख्या वाढण्यास करोनासंसर्ग आणि लॉकडाउन कारणीभूत ठरले. लॉकडाउन किंवा ‘वर्क फ्रॉम होम’च्या काळात लोकांचा वेळ वाचू लागला. या वेळेचा सदुपयोग अनेकांनी शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी किंवा शेअर बाजार शिकण्यासाठी केला. यामुळे म्युच्युअल फंडांकडे ओढा वाढला. साहजिकच हा ओघ एसआयपीच्या माध्यमातून वाढू लागला. यावर्षी एप्रिल ते जुलै या काळात ६.८० कोटी एसआयपी खाती झाली असून याद्वारे ५८ हजार ४५६ कोटी रुपयांची गुंतवणूक म्युच्युअल फंडांत आली. व्यापक स्तरावर विचार करता काही तोटे असले, तरी दीर्घकाळ गुंतवणूक करण्यासाठी चिंतामुक्त पर्याय म्हणून एसआयपीकडे पाहता येते. अर्थात, असे करण्यापूर्वी आपण जो म्युच्युअल फंड निवडणार आहोत, त्याची माहिती घेण्यास विसरू नये.

फायदे कोणते?
सर्वांत मोठा फायदा म्हणजे रोज चढउताराचा मागोवा घेत बसावे लागत नाही. दरमहा ठराविक रक्कम म्युच्युअल फंड गुंतवत राहतो. त्यामुळे बाजारातील चढउतारांची चिंता वहावी लागत नाही. एसआयपीमुळे नियमित गुंतवणुकीची सवय लागते. खर्चण्यायोग्य पैशांच्या (डिस्पोझेबल इन्कम) गुंतवणुकीसाठी एसआयपी उपयोगी पडते. नियमित तारखेला बँक खात्यातून रक्कम गुंतवण्याची व्यवस्था करता येते. किमान ५०० रुपयांपासून सुरुवात करता येत असल्याने ऐपतीनुसार दरमहा गुंतवणुकीची रक्कम निश्चित करता येते. होते. यास्तव एसआयपी ‘कॉस्ट इफेक्टिव्ह’ ठरते. कारण चलनवाढीसारख्या आर्थिक घडामोडींचा यावर परिणाम होत नाही. याखेरीज, एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडाकडे दिली जाणारी रक्कम अप्रत्यक्षरित्या विविध क्षेत्रांतील कंपन्यांत गुंतवली जाते.

ही गुंतवणूक फंडाने केलेल्या अभ्यासानुसार होत असल्यामुळे याचे व्यवस्थापन काटेकोर होते. याचा दीर्घकालीन लाभ नक्की मिळतो.

अभिप्राय द्या!