स्टेशनरी आणि कला उत्पादने कंपनी डोम्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या शेअर्सने आज देशांतर्गत बाजारात दमदार प्रवेश केला. कंपनीच्या आयपीओला गुंतवणूकदारांकडून जोरदार प्रतिसाद मिळाला होता आणि एकूण ९९ पेक्षा जास्त वेळा सब्स्क्राइब होऊन बंद झाला. आयपीओ अंतर्गत ७९० रुपये किमतीला शेअर्स जारी करण्यात आले होते तर आज बीएसईवर १,४०० रुपयांपासून शेअरचा प्रवेश झाला आहे. म्हणजे आयपीओ गुंतवणूकदारांना ७७% लिस्टिंग नफा मिळाला असून लिस्टिंगनंतरही शेअरमधील तेजी कायम आहेत.
- Post published:December 20, 2023
- Post category:घडामोडी
- Post comments:0 Comments