आता डिसेंबर महिना संपत आलाय आणि सर्वांनाच नव्या वर्षाचे वेध लागलेत !

या नव्या वर्षाच्या कालावधीत आपल्या पार्लमेंटच्या निवडणुकाही होणार आहेत आणि त्याची झलक आपल्याला तीन राज्यांच्या निवडणुकांमधून दिसून आली आहे !!

साधारणतः बीजेपी गव्हर्नमेंटच पुन्हा कंटिन्यू होईल अशा स्वरूपाच्या बातम्या आपल्याला दिसत आहे आणि या दरम्यानच या नव्याने येणाऱ्या 2024 सालसाठीच्या काही चांगल्या समभागांची यादी आपल्याला देण्याचा मोह मला आवरत नाही !!
या दृष्टीने मी काही महत्त्वाचे आणि चांगले परफॉर्म करतील असे दहा स्टॉक्स आपल्या पोर्टफोलिओमध्ये असावेत असे आपल्याला सुचवीत आहे त्यापैकी पहिला समभाग आहे
मॅक्स हेल्थकेअर
याचा भाव 678 रुपये चालू असून त्याचे नजीकचे उद्दिष्ट सातशे रुपये गृहीत धरण्यात येत आहे ! ही कंपनी हेल्थकेअर संबंधात काम करणारी कंपनी असून या कंपनीची नफावृद्धी पुढील वर्षात साधारणपणे 17 ते 18 टक्के होऊ शकते असे यांचे फंडामेंटल दिसत आहेत त्यामुळे हा समभाग पुढील वर्षासाठी आपण आपल्या पोर्टफोलिओमध्ये ठेवावा अशी अपेक्षा आहे!
दुसरा महत्त्वाचा स्टॉक्स हा हिरो मोटो कॉर्प कंपनीचा आहे !आजचा त्याचा भाव 3715 रुपये असून भविष्यात हा भाव साडेचार हजार रुपये पर्यंत वाढू शकतो असे दिसत आहे ! ही भारतातील दुचाकी निर्माण करणारी खूप आघाडीचे कंपनी आहे आणि दुचाकीच्या डिमांड मध्ये होत असलेली वाढ पाहता या कंपनीचे भवितव्य खूप छान आहे , तसेच ही कंपनी भविष्यात आपले इलेक्ट्रिक वाहनासंबंधी धोरण सुद्धा चांगल्या पद्धतीने राबवण्यासाठी सुसज्ज झालेली दिसत आहे त्यामुळे हा स्टॉक आपल्या पोर्टफोलिओमध्ये असावा असे आमचे मत आहे
त्याचा आजचा भाव 3626 रुपये असून येत्या वर्षात हा 4100 पर्यंत जाईल असे दिसतआहे !
कंपनीची व्याप्ती , कंपनीचे ऑर्डर बुक आणि दीर्घकालीन मागण्यासंबंधी कंपनीची असलेली स्ट्रॅटेजी पाहता ही कंपनी आपले उद्दिष्ट सहा महिन्यातच गाठू शकते अशी आजची स्थिती दिसते
त्यानंतरचा  समभाग इन्शुरन्स कंपनीच्या आयसीआयसीआयग्रुपचा लोंबार्डचा असून त्याचा आजचा भाव 1450 रुपये आहे रिटेल हेल्थ व्यवसायाचा उच्चहिस्सा पाहता हा भाव सोळाशे रुपयांपर्यंत येत्या वर्षभरात जाऊ शकतो असे दिसत आहे!
त्यानंतर स्टॉक keyns कंपनीचा आम्ही सुचवतो. ही कंपनी इंटरनेट आणि इंटिग्रेटेड इलेक्ट्रॉनिक्स उत्पादक कंपनी आहे या कंपनीची ऑर्डर बुक पाहता 2361 रुपये असलेला हा समभाग पुढील वर्षात3200 रुपये पर्यंत निश्चितपणे जाऊ शकेल !
त्यानंतर खाद्य व्यवसायातील कंपनी झोमॅटो ही असून त्याचा आजचा भाव 119 रुपये असून भविष्यात म्हणजेच पुढील वर्षाच्या पाच सहा महिन्यात हा भाव 135 रुपयांचा उद्दिष्ट निश्चितपणे गाठू शकतो असे दिसत आहे
यानंतर आपल्या पोर्टफोलिओ मध्ये पुढील वर्षासाठी आम्ही आयटीसी ही कंपनी सुचवत असून तिचा भाव 535 रुपये पर्यंत निश्चितपणे जाऊ शकतो असे आजचे चित्र आहे आणि
आणि या यादीतील शेवटचा समभाग एपीएल अपोलो हा सुचवण्यात येत असून आजच्या भावापेक्षा तो साधारणपणे पुढील वर्षात 300 ते 400 रुपयांची वृद्धी दाखवू शकतो अशी आजची स्थिती आहे डिसेंबर 23 नंतर या कंपनीकडे मागण्यांचा ओघ वाढवण्याची शक्यता असल्यामुळे अर्थ 24 मध्ये विक्री उलाढाल सुद्धा वाढू शकते आणि त्यामुळे या कंपनीच्या समभागाच्या किमतीचे उद्दिष्ट चारशे रुपये पर्यंत वाढू शकते असे दिसत आहे!!

आपण 2024 साठी वरील समभाग आपल्या फोलिओ मध्ये असण्याच्या दृष्टीने आपल्या गुंतवणूक सल्लागाराशी पूर्णतः चर्चा करून या समभागांमध्ये गुंतवणूक करावी का ? याचा निर्णय स्वतः घेणे अपेक्षित आहे हे सुचविलेले समभाग आजचे फंडामेंटल पाहून सुचवण्यात येत आहेत पण जागतिक मंदी ,क्रूडचे कमी होणारे किंवा वाढणारे भाव , युद्धजन्य स्थिती आणि इतर राजकीय बाबी पाहूनच आपण यातील गुंतवणूक किती दिवस ठेवावी यासंबंधीचा निर्णय घेणे आवश्यक ठरते !!
धन्यवाद
प्रदीप जोशी

अभिप्राय द्या!