ICICI Securities: शेअर बाजारातून डिलिस्ट होणार

खाजगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बँकेने माहिती दिली की, 'नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंजने (BSE) आयसीआयसीआय सिक्युरिटीजचे शेअर्स डी-लिस्टिंग करण्यास मान्यता दिली आहे. डी-लिस्टिंग म्हणजे बाजारातून संबधित शेअर्स बाहेर होणे. बँकेला NSE आणि BSE कडून अनुक्रमे २८ नोव्हेंबर २०२३ आणि २९ नोव्हेंबर २०२३ रोजी 'ना हरकत' पत्रे प्राप्त झाली असून यानंतर संबंधित कंपनीचे शेअर्स स्टॉक एक्स्चेंजमध्ये खरेदी किंवा विक्री करू शकणार नाही. कंपनी ही कारवाई स्वेच्छेने करते किंवा काही वेळा स्टॉक एक्स्चेंजकडून निर्णय घेतला जातो. शेअरचे डीलिस्टिंग म्हणजे काय? सामान्य गुंतवणूकदारांकडून निधी उभारण्यासाठी कंपन्या शेअर बाजारात प्रवेश करतात. यासाठी साधारणपणे IPO मार्गाचा अवलंब केला जातो, त्यानंतर संबंधित कंपनीच्या शेअर्सचे…

गोल्ड बाँडचे गुंतवणूकदार झाले श्रीमंत

सार्वभौम गोल्ड बाँड योजना गुंतवणूकदारांसाठी सुरक्षित गुंतवणूक असल्याचे ठरली असून अनेक पारंपारिक साधनांपेक्षा ही सरकारी योजनेपेक्षा चांगले परतावा देत आहे. सार्वभौम गोल्ड बाँडचा पहिला हप्ता अवघ्या काही दिवसांत मॅच्युअर होणार असून पहिल्या हप्त्याच्या गुंतवणुकदारांना मिळालेल्या उत्कृष्ट कमाईने सार्वभौम गोल्ड बाँडला गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय म्हणून स्थापित केले आहे. गोल्ड बाँडचे गुंतवणूकदार झाले श्रीमंत सार्वभौम गोल्ड बाँडची पहिली मालिका ३० नोव्हेंबर २०२३ रोजी मॅच्युअर होत असून २६ नोव्हेंबर २०१५ रोजी रोख्यांची पहिली मालिका २,६८४ रुपये प्रति ग्रॅमच्या दराने जारी करण्यात आली होती. तर सध्या सोन्याचा भाव ६,१०० रुपये प्रति ग्रॅम आहे. अशा परिस्थितीत ज्या गुंतवणूकदारांनी सार्वभौम गोल्ड बाँडच्या पहिल्या मालिकेत एक…

IRRA प्लॅटफॉर्म लाँच, जाणून घ्या कसा होईल फायदा

शेअर बाजारातील गुंतवणूकदार आणि ट्रेडर्सचे किमान नुकसान व्हावे यासाठी सेबी सातत्याने प्रयत्नशील असते. या संदर्भात सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या (सेबी) अध्यक्षा माधबी पुरी बुच यांनी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (BSE) मध्ये इन्व्हेस्टर रिस्क रिडक्शन ऍक्सेस (IRRA) प्लॅटफॉर्म लाँच केला आहे जो गुंतवणूकदार आणि ट्रेडर्सला तांत्रिक अडचणींमुळे होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षण देईल. जोखीम कमी करणे हा आर्थिक बाजारातील एक नेहमीचाच विषय असतो आणि विविध प्रकारच्या जोखमींचे निराकरण करण्यासाठी नियामकांकडून सतत प्रयत्न केले जातात. अनेक वेळा अशी प्रकरणे समोर येतात जेव्हा गुंतवणूकदार आणि व्यापाऱ्यांचे तांत्रिक बिघाडांमुळे मोठे नुकसान होते. गुंतवणूकदारांना तोट्यापासून वाचवणार! IRRA प्लॅटफॉर्म हा सेबीच्या मार्गदर्शनाखाली मार्केट इन्फ्रास्ट्रक्चर इन्स्टिट्यूशन्स (MIIs) द्वारे…

जागतिक बँक गोल्डमॅनने भारतीय शेअर्सचे रेटिंग वाढवले

जागतिक इन्व्हेस्टमेंट (गुंतवणूक) बँक गोल्डमन सॅक्सचा भारतीय शेअर बाजारावरील विश्वास कायम राहिला आहे. याच कारणामुळे भारतीय शेअर्सचे रेटिंग वाढवले असून हाँगकाँगमध्ये खरेदी केलेल्या चिनी शेअर्सचे रेटिंग घटवले आहेत. गोल्डमॅनच्या आशियाई बाजारावरील अहवालात टिमोथीसह अनेक रणनीतीकारांचा असा विश्वास आहे की मॅक्रो पातळीनुसार मूल्यांकन आता योग्य पातळीवर आहे, त्यामुळे परतावा कमाईवर अवलंबून असू शकतो. गोल्डमनने म्हटले की आशियाई बाजारपेठेत भारतात संरचनात्मक वाढीच्या चांगल्या शक्यता आहेत आणि कमाई मध्यम किशोरवयीन गतीने म्हणजेच १५-१७% तेजी दिसू शकते. देशांतर्गत वाढीवर लक्ष केंद्रित केल्यामुळे विशेषतः मेक इन इंडिया, लार्ज-कॅप कंपाउंडर्स आणि मिड-कॅप मल्टीबॅगर्ससह अल्पकालीन आणि दीर्घकालीन गुंतवणूक संधीसह गुंतवणूकदारांना अनेक अल्फा-जनरेटिंग थीम सापडत आहेत. तसेच भारतीय…

बोनसचा वापर

९ नोव्हेंबरपासून दिवाळी सुरू होईल, तर १२ नोव्हेंबर रोजी (रविवारी) लक्ष्मीपूजन पार पडेल. दिवाळीचा सण दिव्यांसह आनंदाचाही सण आहे. लोक एकमेकांना भेटवस्तू आणि मिठाई देऊन दिवाळी साजरी करतात. तुम्ही कुठे काम करत असाल तर दिवाळीनिमित्त तुम्हाला दिवाळी बोनसही मिळाला असेल. अशा स्थितीत जर तुम्ही गृहकर्ज घेतले असेल तर यावर्षी दिवाळीला मिळालेला बोनस कपडे किंवा इतर गोष्टींवर खर्च करण्याऐवजी तुमच्या कर्जाच्या प्री-पेमेंटवर वापरू शकता. आर्थिक मूल्यांकन दिवाळी बोनसमधून गृहकर्जाचे प्रीपेमेंट करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक स्थितीचे मूल्यांकन करा. तुमच्यावर मोठ्या आर्थिक जबाबदाऱ्या असतील तर तुम्ही तुमचा दिवाळी बोनस तिथे वापरावा. प्रीपेमेंट रकमेची गणना करा कर्जाच्या प्रीपेमेंट रकमेबद्दल आणि तुमच्या गृहकर्जासाठी तुम्ही किती रक्कम…

फिनकेअर बँकेचे AU स्मॉल फायनान्स बँकेत विलिनीकरण

देशातील दोन सुप्रसिद्ध स्मॉल फायनान्स बँकांचे विलीनीकरण होणार आहे. फिनकेअर स्मॉल फायनान्स बँकेचे एयू स्मॉल फायनान्स बँकेत विलिनीकरण होणार असून हे विलिनीकरण १ फेब्रुवारी २०२४ पासून प्रभावी होईल. दोन्ही बँकांच्या संचालक मंडळांनी २९ ऑक्टोबर रोजी सर्व-स्टॉक विलीनीकरण मंजूर केले असून बँकिंग नियमन कायदा, १९४९ च्या कलम ४४ए अंतर्गत मर्जर योजनेसाठी दोन्ही बँकांच्या भागधारकांची, आरबीआय आणि भारतीय स्पर्धा आयोगाची मंजुरी आवश्यक असते. अशा स्थितीत आवश्यक मंजूरी मिळाल्यानंतर फिनकेअर SFB एयू SFB मध्ये विलीन केले जाईल.

वायर आणि केबल कंपनीचे शेअर्स ५,२५५.७० रुपयांवर —

शेअर बाजारात स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्यासोबत कंपन्यांच्या आयपीओ (IPO) मध्येही गुंतवणूक करणारे बरेच लोक आहेत. बाजारात आत्तापर्यंत अनेक आयपीओ आलेत ज्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना लॉटरी लागली. असाच एक आयपीओ पॉलीकॅब इंडिया या वायर आणि केबल व्यवसाय कंपनीचा आहे. १६ एप्रिल २०१९ रोजी या कंपनीचा आयपीओ मार्केटमध्ये ५३८ रुपये प्रति शेअरवर सूचिबद्ध झाला होता तर सध्या कंपनीचे शेअर्स ५,२०० रुपयांच्या वर ट्रेंड करत आहेत. पॉलीकॅब ही कंपनी FMEG म्हणजेच फास्ट मूव्हिंग इलेक्ट्रिकल गुड्समध्ये आघाडीवर असून त्यांचा मुख्य व्यवसाय विद्युत तारा (इलेक्ट्रिक वायर) बनवण्याचा आहे. याशिवाय पॉवर केबल, कंट्रोल केबल, इन्स्ट्रुमेंटेशन केबल, सोलर केबल, बिल्डिंग वायर, फॅन, लाइटिंग इत्यादी देखील कंपनीची मुख्य उत्पादने आहेत.…

शेअर बाजारात ट्रेडिंगचा वेळ वाढणार ?

शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांना पुढील काही दिवसात ट्रेडिंग करण्यासाठी अतिरिक्त वाढीव वेळ मिळण्याची शक्यता आहे. इक्विटी डेरिव्हेटिव्ह्जमधील व्यवहार मध्यरात्रीपर्यंत वाढविण्याची चर्चा आहे. जगातील सर्वात मोठे डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज NSE ने स्टॉक इंडेक्स फ्युचर्स आणि ऑप्शन्ससाठी संध्याकाळी ६ ते ९ या वेळेत संध्याकाळचे सत्र सुरू करण्याची सेबीची परवानगी मागितली असून या सत्रात व्यापाऱ्यांनी उत्साहाने सहभाग घेतल्यास स्टॉक डेरिव्हेटिव्हजच्या समावेशासह व्यापाराचे तास रात्री ११.५५ पर्यंत वाढवले जाऊ शकते.

प्लाझा वायर्सच्या शेअर्सची आज देशांतर्गत बाजारात शानदार एंट्री

शेअर बाजारात आज आणखी एक कंपनी लिस्ट झाली आणि पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना जोरदार परतावा दिला. वायर उत्पादक कंपनी प्लाझा वायर्सच्या शेअर्सची आज देशांतर्गत बाजारात शानदार एंट्री झाली. या आयपीओला गुंतवणूकदारांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आणि तो पहिल्याच दिवशी पूर्णपणे भरला होता. एकूण चार दिवसांत तो १६० पेक्षा जास्त पट सबस्क्राइब झाला. आयपीओ अंतर्गत ५४ रुपये किमतीने शेअर्स जारी करण्यात आले होते तर, आज शेअर्सचा ८४ रुपयांच्या किमतीवर व्यवहार सुरू झाला आहे. याचा अर्थ आयपीओ गुंतवणूकदारांना ५५.५६ टक्केचा लिस्टिंग फायदा झाला.

वर्ल्डकप २०२३ —

क्रिकेट जगतातील बहुप्रतीक्षित असा आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ येतंय ५ ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. या विश्वचषकाचे यजमानपद यंदा भारताकडे आहे. भारत देश इतर कोणत्याही देशासोबाबत हा विश्वचषक आयोजित न करता स्वतंत्रपणे आयोजित करत आहे. यामुळे भारतामध्ये विविध ठिकाणी हे सामने होणार आहेत. जगभरातील ९ संघ या स्पर्धेसाठी भारतात दाखल झाले आहेत. याचा परिणाम येथील अनेक क्षेत्र आणि कंपन्यांच्या व्यवसायावरही होणार आहे. यामध्ये हॉटेल्स, एअरलाइन्स, रेस्टॉरंट्स आणि ट्रॅव्हल कंपन्या यांचा समावेश होतो आणि त्यांचे गुंतवणूकदार प्रचंड उत्पन्न मिळवू शकतात. विश्वचषकादरम्यान, क्विक सर्विस रेस्टॉरेंट विभागात चांगली मागणी दिसून येईल. जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष गौरांग शाह सांगतात की, हॉटेल आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात…

End of content

No more pages to load