क्रिकेट जगतातील बहुप्रतीक्षित असा आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ येतंय ५ ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. या विश्वचषकाचे यजमानपद यंदा भारताकडे आहे. भारत देश इतर कोणत्याही देशासोबाबत हा विश्वचषक आयोजित न करता स्वतंत्रपणे आयोजित करत आहे.

यामुळे भारतामध्ये विविध ठिकाणी हे सामने होणार आहेत. जगभरातील ९ संघ या स्पर्धेसाठी भारतात दाखल झाले आहेत. याचा परिणाम येथील अनेक क्षेत्र आणि कंपन्यांच्या व्यवसायावरही होणार आहे. यामध्ये हॉटेल्स, एअरलाइन्स, रेस्टॉरंट्स आणि ट्रॅव्हल कंपन्या यांचा समावेश होतो आणि त्यांचे गुंतवणूकदार प्रचंड उत्पन्न मिळवू शकतात.

विश्वचषकादरम्यान, क्विक सर्विस रेस्टॉरेंट विभागात चांगली मागणी दिसून येईल. जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष गौरांग शाह सांगतात की, हॉटेल आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात सध्या तेजी आहे.

तसेच, प्रवासात वाढ झाल्यामुळे, एअरलाइन्स उद्योगाला देखील महत्त्वपूर्ण लाभ मिळू शकतात. G20 शिखर परिषद आणि त्यानंतरच्या कार्यक्रमांमुळे या सर्व विभागांमध्ये वाढ अपेक्षित आहे. सणासुदीचा हंगाम तसेच क्रिकेट विश्वचषक आणि त्यानंतर लग्नाचा हंगाम सुरू झाल्याने या सर्व क्षेत्रांना दीर्घकाळ फायदा होणार आहे. त्यामुळे या कंपन्यांचे शेअर्स चांगली कामगिरी करू शकतात.

अभिप्राय द्या!