शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांना पुढील काही दिवसात ट्रेडिंग करण्यासाठी अतिरिक्त वाढीव वेळ मिळण्याची शक्यता आहे.
इक्विटी डेरिव्हेटिव्ह्जमधील व्यवहार मध्यरात्रीपर्यंत वाढविण्याची चर्चा आहे. जगातील सर्वात मोठे डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज NSE ने स्टॉक इंडेक्स फ्युचर्स आणि ऑप्शन्ससाठी संध्याकाळी ६ ते ९ या वेळेत संध्याकाळचे सत्र सुरू करण्याची सेबीची परवानगी मागितली असून या सत्रात व्यापाऱ्यांनी उत्साहाने सहभाग घेतल्यास स्टॉक डेरिव्हेटिव्हजच्या समावेशासह व्यापाराचे तास रात्री ११.५५ पर्यंत वाढवले जाऊ शकते.