अल्पबचत योजना तसेच म्युच्युअल फंड फोलीओना नामनिर्देशन अत्याश्यक

वित्त मंत्रालयाने ३१ मार्च २०२३ रोजी एक अधिसूचना जारी केली होती. यामध्ये असे म्हटले होते की, तुम्ही खाते उघडले असेल किंवा लहान बचत योजनांतर्गत गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला केवायसी कागदपत्रे सादर करावी लागतील. पॅन आणि आधार कार्ड देणे बंधनकारक असेल. सरकारच्या अधिसूचनेनुसार, ज्यांनी खाते उघडताना आधार आणि पॅन सबमिट केले नाहीत, त्यांना ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत हे करणे अनिवार्य आहे मात्र, खाते उघडताना कागदपत्रे दिल्यास ती सादर करावी लागणार नाहीत. हीच बाब म्युच्युअल फंडानाही लागू!!

काय आहे ‘UDGAM’ पोर्टल?

देशातील सर्वच बँकांतून दावा न केलेले कोट्यवधी रुपये सध्या पडून आहेत. यापैकी काही रकमेसाठी दावेदार पुढे येतही आहेत. मात्र हे दावेदार ती रक्कम ज्यांच्या खात्यात आहे त्यांचे खरे वारसदार आहेत की नाही, हे पाहणे संबंधित बँकेसाठी मोठीच डोकेदुखी होऊन बसले आहे. तोतया दावेदारांच्या हातात एखाद्या मृत खातेदाराची किंवा ठेवीदाराची लाखो रुपयांची रक्कम जाऊ नये यासाठी यावर उपाय करण्याचा प्रामाणिक प्रयत्न प्रत्येक बँक करते. तरीही विनादावा रक्कम चुकीच्या व्यक्तीकडे जाण्याचा धोका उरतोच हा धोका बऱ्यापैकी कमी करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने विशेष पोर्टल १७ ऑगस्ट रोजी सुरू केलं. याचं नाव आहे - उद्गम (UDGAM म्हणजे अनक्लेम्ड डिपॉझिट्स - देटवे टू ॲक्सेस इन्फर्मेशन). आपल्या…

‘कनेक्टिव्हिटी कॉरिडॉर’ काय आहे?

जी-२० सदस्य राष्ट्रांच्या शिखर परिषदेत भारत, पश्चिम आशिया व युरोप यांना जोडणारी एक दळणवळण मार्गिका (कनेक्टिव्हिटी कॉरिडॉर) लवकरच सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रकल्पात भारतासह संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, युरोपियन संघ, फ्रान्स, इटली, जर्मनी व अमेरिका अशा महत्त्वाच्या देशांचा यात समावेश आहे. व्यापारासाठी दळणवळण आणि पायाभूत सुविधांमधील सहकार्याच्या दृष्टीने हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर या प्रकल्पाचा उद्देश आणि त्या प्रकल्पांतर्गत सहभागी देशांना काय फायदा होणार आहे? हे जाणून घेऊ या…. या प्रकल्पाच्या माध्यमातून पश्चिम आशिया आणि युरोपला रेल्वेमार्ग तसेच बंदरांच्या माध्यमातून जोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यामध्ये डिजिटल कनेक्टिव्हीटी प्रस्थापित करणे तसेच या प्रकल्पात सहभागी असणाऱ्या…

रिलायन्सची नव्या क्षेत्रात एंट्री

देशातील सर्वात श्रीमंत मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वातील रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) आता एका नवीन क्षेत्रात पाऊल ठेवणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या अलीकडे झालेल्या ४६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) त्यांनी मोठी घोषणा केली. त्यांच्या या घोषणेने आता एलआयसीसह (LIC) देशातील सर्व विमा कंपन्यांसमोर आव्हान आणखी वाढले असेल. रिलायन्स लवकरच विमा क्षेत्रात उतरणार असल्याची मुकेश अंबानी यांनी घोषणा केली. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसद्वारे ग्राहकांना विमा उत्पादने पुरवली जातील. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या विलगीकरणानंतर अलीकडेच जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसची स्थापना करण्यात आली. त्यानंतर जिओ फायनान्शियल देशांतर्गत शेअर बाजारात सूचिबद्ध करण्यात आले असून आता कंपनीत नव्या सेवेची भर पडणार आहे. जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या माध्यमातून लोक जीवन विमा, सामान्य विमा…

चांद्रयान ३ आणि शेअर बाजार

चांद्रयान-३ आपल्या मिशनच्या अगदी जवळ आले आहे.  गुंतवणूकदारांच्या अपेक्षाही यामुळे वाढत आहेत. चांद्रयान-३ च्या या प्रवासात भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) व्यतिरिक्त अनेक कंपन्यांनीही मोठी भूमिका बजावली आहे. मिशन यशस्वी झाल्यास या कंपन्यांच्या शेअर्समध्ये बंपर उसळी येण्याची शक्यता आहे. ज्या गुंतवणूकदारांनी या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली आहे. ते चांगलेच मालामाल होणार आहेत. या शेअर्समध्येही काही काळ सातत्याने वाढ होताना दिसत आहे. जर भारताचे अंतराळ यान चंद्रावर यशस्वीरित्या उतरले तर ते देशातील खाजगी अवकाश कंपन्यांसाठी गुंतवणुकीचे नवीन मार्ग आणि संधी उघडतील. या मिशनशी संबंधित ५ कंपन्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊया. लार्सन आणि turbo L&T च्या एरोस्पेस मॅन्युफॅक्चरिंग सुविधेने चांद्रयान-३ साठी…

अधिक मास – सत्पात्री दान आणि गुंतवणूक

बहुतेक सर्वाना समाजातील गरजू वंचित आणि दुर्बल घटकांच्या मदतीसाठी दान करण्याची इच्छा असते. दान सत्पात्री करावे अशीही  भावना असते ,गरजूपर्यंत आपले दान कसे पोहोचावे याची अनेकांना साशंकता असते. आणि यासाठी म्युच्युअल फंड हाऊस तर्फे charity फंड्स तयार केले जातात, असाच एक charity फंड एचडीएफसी म्युच्युअल फंड हाऊसने  सुरू केला आहे.  त्याचे नाव आहे एचडीएफसी charity फंड फॉर कॅन्सर!!  या फंडाच्या  नावातच कॅन्सर  आहे !! अर्थात ही close ended योजना असून गेल्याच आठवड्यात ही योजना सुरू झाली असून नऊ ऑगस्ट रोजी बंद होणार आहे . ही तीन वर्षे कालावधीची फिक्स मॅच्युरिटी पद्धतीची योजना आहे. यामध्ये डिव्हीडंड हा एकच पर्याय आहे. आणि…

ऑगस्ट महिन्यात येणारे आय.पी.ओ. पहा !!!

एसबीएफसी फायनान्स आयपीओ बिगर बँकिंग वित्तीय कंपनी एसबीएफसी फायनान्सचा आयपीओ ३ ऑगस्ट रोजी खुला होणार असून हा आयपीओ ७ ऑगस्टला बंद होईल. आयपीओ २ ऑगस्ट रोजी अँकर गुंतवणूकदारांसाठी खुला होईल. कंपनीने यासाठी ५४-५७ रुपये प्रति शेअर किंमत बँड निश्चित केला असताना आयपीओ अंतर्गत ६०० कोटी रुपयांचे नवीन इक्विटी शेअर्स जारी केले जातील. याशिवाय, ४२५ कोटी रुपयांचे शेअर्स ऑफर फॉर सेल (OFS) अंतर्गत विकले जातील. कंपनीने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सेबीकडे आयपीओ कागदपत्रे दाखल केली होती. कॉन्कॉर्ड बायोटेक आयपीओ अहमदाबादस्थित फार्मा कंपनी कॉनकॉर्ड बायोटेकचा आयपीओ ४ ऑगस्ट रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला होईल. गुंतवणूकदार ८ ऑगस्टपर्यंत यात गुंतवणूक करू शकतील. आयपीओमध्ये २.०९ कोटी इक्विटी…

अत्यंत महत्त्वाची सुविधा

आपल्यापैकी बरेच जण आपल्या जीवन विम्याचे प्रीमियम त्रैमासिक किंवा अर्धवार्षिक किंवा वार्षिक स्वरूपाचे ठेवतात. एलआयसी तर्फे प्रीमियम भरण्याची सूचना साधारणपणे एक महिना आधी प्राप्त झालेली असते .आणि बरेच जण सूचना  मिळूनही आपला प्रीमियम भरताना आज भरू उद्या भरू असे करत विसरून जातात. अशा विसरलेल्या  प्रीमियम साठी दंड भरून प्रीमियम भरण्याचे सुविधा एलआयसी कार्यालय देते. पण यापेक्षा अत्यंत सोपी सुविधा फंड बाजारतर्फे देण्यात आली आहे.  यासाठी आपण फक्त प्रीमियमच्या  प्रमाणात एक एस आय पी म्युच्युअल फंडामध्ये सुरू करायची. पॉलिसी डिटेल्स, प्रीमियमची तारीख आणि काही जुजबी माहिती इन्सर्ट केल्यावर आपल्या एस आय पी  तर्फे जमा  झालेल्या रकमेतून आपला प्रीमियम ऑटोमॅटिकली आपल्या पॉलिसीला…

जागतिक स्तरावर HDFC अमेरिका, चीन बँकेच्या वरचढ

बँकिंग क्षेत्रात आता भारतही जगभरातील अर्थव्यवस्थेला  टक्कर देत आहे. भारतातून एक बँक उदयास आली आहे जिने अमेरिका आणि चीनच्या सर्वात मोठ्या बँकांनाही स्पर्धा दिली आहे. HDFC बँकेचे HDFC लिमिटेडमध्ये विलीनीकरण झाल्यामुळे देशातील सर्वात मोठी खासगी बँक 'एलिट क्लब'मध्ये समाविष्ट झाली आहे. १२.३८ लाख कोटी रुपये मार्केट कॅपसह भारतातील सर्वात मोठी कर्जदाता बँक सोमवारी $१०० अब्ज मार्केट कॅपसह जागतिक एलिट क्लबमध्ये HDFC बँकेने एंट्री घेतली आहे. बँकेच्या मार्केट कॅपने सोमवारी $१५० अब्जचा टप्पा पार करत मॉर्गन स्टॅनली, गोल्डमन सॅक्स आणि बँक ऑफ चायना यांना पिछाडीवर टाकले आहे. जगातील सर्वात मोठ्या कर्जदारांच्या यादीत HDFC बँकेच्या वर जेपी मॉर्गन ($४३८ अब्ज), बँक ऑफ…

कार्पोरेट डिपॉझिट्स

 बजाज फायनान्सतर्फे वेगवेगळ्या मुदतीची कार्पोरेट डिपॉझिट म्हणजेच मुदत ठेवी स्वीकारल्या जातात. आणि त्यातील व्याजदर हे खूप आकर्षक आहेत. या व्याजदरच्या मुदती सुद्धा थोड्या वेगळ्या स्वरूपाच्या आहेत, पंधरा महिने 18 महिने 22 महिने 30 महिने 33 महिने आणि 44 महिने अशा या मुदती आहेत. 44 महिने मुदतीसाठी  बजाज फायनान्स तर्फे 8.60% व्याजदर देण्यात येतो. आणि व्याजदरचा परतावा हा आपल्याला हवा तसा स्वीकारण्याच्या यामध्ये सोयी आहेत. बजाज फायनान्स  या कंपनीमध्ये ठेवी या अत्यंत सुरक्षित समजल्या जातात. बजाज फायनान्सला कंपनीला क्रिसिलने  ट्रिपल ए रेटिंग दिले आहे. यामध्ये गुंतवणुकीची सुविधा हे पूर्णतः ऑनलाइन पद्धतीची आहे त्यामुळे आपण ठेवलेल्या पैशांना ठेवल्या दिवसापासूनचे व्याज मिळणे सुरू…

End of content

No more pages to load