देशातील दोन सुप्रसिद्ध स्मॉल फायनान्स बँकांचे विलीनीकरण होणार आहे. फिनकेअर स्मॉल फायनान्स बँकेचे एयू स्मॉल फायनान्स बँकेत विलिनीकरण होणार असून हे विलिनीकरण १ फेब्रुवारी २०२४ पासून प्रभावी होईल. दोन्ही बँकांच्या संचालक मंडळांनी २९ ऑक्टोबर रोजी सर्व-स्टॉक विलीनीकरण मंजूर केले असून बँकिंग नियमन कायदा, १९४९ च्या कलम ४४ए अंतर्गत मर्जर योजनेसाठी दोन्ही बँकांच्या भागधारकांची, आरबीआय आणि भारतीय स्पर्धा आयोगाची मंजुरी आवश्यक असते. अशा स्थितीत आवश्यक मंजूरी मिळाल्यानंतर फिनकेअर SFB एयू SFB मध्ये विलीन केले जाईल.

अभिप्राय द्या!