शेअर बाजारात स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्यासोबत कंपन्यांच्या आयपीओ (IPO) मध्येही गुंतवणूक करणारे बरेच लोक आहेत. बाजारात आत्तापर्यंत अनेक आयपीओ आलेत ज्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना लॉटरी लागली. असाच एक आयपीओ पॉलीकॅब इंडिया या वायर आणि केबल व्यवसाय कंपनीचा आहे. १६ एप्रिल २०१९ रोजी या कंपनीचा आयपीओ मार्केटमध्ये ५३८ रुपये प्रति शेअरवर सूचिबद्ध झाला होता तर सध्या कंपनीचे शेअर्स ५,२०० रुपयांच्या वर ट्रेंड करत आहेत.
पॉलीकॅब ही कंपनी FMEG म्हणजेच फास्ट मूव्हिंग इलेक्ट्रिकल गुड्समध्ये आघाडीवर असून त्यांचा मुख्य व्यवसाय विद्युत तारा (इलेक्ट्रिक वायर) बनवण्याचा आहे. याशिवाय पॉवर केबल, कंट्रोल केबल, इन्स्ट्रुमेंटेशन केबल, सोलर केबल, बिल्डिंग वायर, फॅन, लाइटिंग इत्यादी देखील कंपनीची मुख्य उत्पादने आहेत. कंपनीने या दरम्यान इतर अनेक व्यवसायांमध्येही गुंतवणूक केली आहे, ज्याचे फायदे त्यांच्या गुंतवणूकदारांना भविष्यात मिळू शकतात.