विश्वचषक गुंतवणुकीचा

ध्या भारतात विश्वचषकाची धामधूम सुरू आहे . भारत-पाक सामन्यासाठी मुंबईहून अहमदाबादसाठी दोन विशेष गाड्या सोडण्याचे नियोजन पूर्ण झाले आहे ! प्रत्येक मॅच ही अंतिम मॅच असल्याप्रमाणे भारतीय संघ सुद्धा चांगल्या पद्धतीत खेळत आहे अशा वेळेस आपणही गुंतवणुकीचा विश्वचषक कसा जिंकावा या संदर्भात काही मार्गदर्शन करण्याचा मोह आवरता घेता येत नाही. भारतीय संघात जसा हार्दिक पांड्या आहे तसा आपण टायटन हा शेअर आपल्या पोर्टफोलिओ मध्ये ठेवणे खूप हिताचे होऊ शकते! भारतीय संघात जसा विराट कोहली आहे तसा आपल्या पोर्टफोलिओ मध्ये आपण बजाज फायनान्स चा शेअर ठेवणे अत्यंत अत्यावश्यक आहे. आपल्या संघात जसे आयत्या वेळेस मदत करणारे अनेक खेळाडू आहेत तसे आपल्या…

शेअर बाजारात ट्रेडिंगचा वेळ वाढणार ?

शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांना पुढील काही दिवसात ट्रेडिंग करण्यासाठी अतिरिक्त वाढीव वेळ मिळण्याची शक्यता आहे. इक्विटी डेरिव्हेटिव्ह्जमधील व्यवहार मध्यरात्रीपर्यंत वाढविण्याची चर्चा आहे. जगातील सर्वात मोठे डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज NSE ने स्टॉक इंडेक्स फ्युचर्स आणि ऑप्शन्ससाठी संध्याकाळी ६ ते ९ या वेळेत संध्याकाळचे सत्र सुरू करण्याची सेबीची परवानगी मागितली असून या सत्रात व्यापाऱ्यांनी उत्साहाने सहभाग घेतल्यास स्टॉक डेरिव्हेटिव्हजच्या समावेशासह व्यापाराचे तास रात्री ११.५५ पर्यंत वाढवले जाऊ शकते.

प्लाझा वायर्सच्या शेअर्सची आज देशांतर्गत बाजारात शानदार एंट्री

शेअर बाजारात आज आणखी एक कंपनी लिस्ट झाली आणि पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना जोरदार परतावा दिला. वायर उत्पादक कंपनी प्लाझा वायर्सच्या शेअर्सची आज देशांतर्गत बाजारात शानदार एंट्री झाली. या आयपीओला गुंतवणूकदारांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आणि तो पहिल्याच दिवशी पूर्णपणे भरला होता. एकूण चार दिवसांत तो १६० पेक्षा जास्त पट सबस्क्राइब झाला. आयपीओ अंतर्गत ५४ रुपये किमतीने शेअर्स जारी करण्यात आले होते तर, आज शेअर्सचा ८४ रुपयांच्या किमतीवर व्यवहार सुरू झाला आहे. याचा अर्थ आयपीओ गुंतवणूकदारांना ५५.५६ टक्केचा लिस्टिंग फायदा झाला.

आजच्या गुंतवणुकीच्या संधी

आजच्या गुंतवणुकीच्या संधी गेल्या वेळचा अर्थसंकल्प सादर झाल्यापासून भारतीय बाजारात नवनव्या गुंतवणुकीच्या संधी दिसत आहेत आणि त्यासंबधी थोडक्यात का असेना माहिती देण्यासाठी हा लेख लिहित आहे! 1 )भारताचे चांद्रयान यशस्वीरित्या लँड झाल्यावर L&T, BEL, BHEL यासारख्या कंपन्यामधील गुंतवणुकीने एक दोन आठवड्यातच 5% पेक्षा जास्त परतावा दिला आहे.आणि याहीपुढे एखादी चांगली संधी मिळाल्यास हे समभाग आपल्याला अनपेक्षितपणे खूप चांगला परतावा देतील हे निश्चित. 2)सध्या भारतात क्रिकेटचा वर्ल्डकप महोत्सव सुरु झाला आहे.त्यामुळे lemontree सारख्या हॉटेल्सचे समभाग आणि त्याच बरोबर Godrejcp, Tata Consumer इत्यादी समभागामध्ये खूप मोठी रॅली दिसू शकते. 3)संरक्षण क्षेत्रमध्ये कार्यरत असलेल्या कंपन्यांना “आत्मनिर्भर भारत” या घोषनेनंतर अनेक ऑर्डर्स मिळालेल्या दिसत…

वर्ल्डकप २०२३ —

क्रिकेट जगतातील बहुप्रतीक्षित असा आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ येतंय ५ ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. या विश्वचषकाचे यजमानपद यंदा भारताकडे आहे. भारत देश इतर कोणत्याही देशासोबाबत हा विश्वचषक आयोजित न करता स्वतंत्रपणे आयोजित करत आहे. यामुळे भारतामध्ये विविध ठिकाणी हे सामने होणार आहेत. जगभरातील ९ संघ या स्पर्धेसाठी भारतात दाखल झाले आहेत. याचा परिणाम येथील अनेक क्षेत्र आणि कंपन्यांच्या व्यवसायावरही होणार आहे. यामध्ये हॉटेल्स, एअरलाइन्स, रेस्टॉरंट्स आणि ट्रॅव्हल कंपन्या यांचा समावेश होतो आणि त्यांचे गुंतवणूकदार प्रचंड उत्पन्न मिळवू शकतात. विश्वचषकादरम्यान, क्विक सर्विस रेस्टॉरेंट विभागात चांगली मागणी दिसून येईल. जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष गौरांग शाह सांगतात की, हॉटेल आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात…

अल्पबचत योजना तसेच म्युच्युअल फंड फोलीओना नामनिर्देशन अत्याश्यक

वित्त मंत्रालयाने ३१ मार्च २०२३ रोजी एक अधिसूचना जारी केली होती. यामध्ये असे म्हटले होते की, तुम्ही खाते उघडले असेल किंवा लहान बचत योजनांतर्गत गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला केवायसी कागदपत्रे सादर करावी लागतील. पॅन आणि आधार कार्ड देणे बंधनकारक असेल. सरकारच्या अधिसूचनेनुसार, ज्यांनी खाते उघडताना आधार आणि पॅन सबमिट केले नाहीत, त्यांना ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत हे करणे अनिवार्य आहे मात्र, खाते उघडताना कागदपत्रे दिल्यास ती सादर करावी लागणार नाहीत. हीच बाब म्युच्युअल फंडानाही लागू!!

काय आहे ‘UDGAM’ पोर्टल?

देशातील सर्वच बँकांतून दावा न केलेले कोट्यवधी रुपये सध्या पडून आहेत. यापैकी काही रकमेसाठी दावेदार पुढे येतही आहेत. मात्र हे दावेदार ती रक्कम ज्यांच्या खात्यात आहे त्यांचे खरे वारसदार आहेत की नाही, हे पाहणे संबंधित बँकेसाठी मोठीच डोकेदुखी होऊन बसले आहे. तोतया दावेदारांच्या हातात एखाद्या मृत खातेदाराची किंवा ठेवीदाराची लाखो रुपयांची रक्कम जाऊ नये यासाठी यावर उपाय करण्याचा प्रामाणिक प्रयत्न प्रत्येक बँक करते. तरीही विनादावा रक्कम चुकीच्या व्यक्तीकडे जाण्याचा धोका उरतोच हा धोका बऱ्यापैकी कमी करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने विशेष पोर्टल १७ ऑगस्ट रोजी सुरू केलं. याचं नाव आहे - उद्गम (UDGAM म्हणजे अनक्लेम्ड डिपॉझिट्स - देटवे टू ॲक्सेस इन्फर्मेशन). आपल्या…

‘कनेक्टिव्हिटी कॉरिडॉर’ काय आहे?

जी-२० सदस्य राष्ट्रांच्या शिखर परिषदेत भारत, पश्चिम आशिया व युरोप यांना जोडणारी एक दळणवळण मार्गिका (कनेक्टिव्हिटी कॉरिडॉर) लवकरच सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रकल्पात भारतासह संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, युरोपियन संघ, फ्रान्स, इटली, जर्मनी व अमेरिका अशा महत्त्वाच्या देशांचा यात समावेश आहे. व्यापारासाठी दळणवळण आणि पायाभूत सुविधांमधील सहकार्याच्या दृष्टीने हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर या प्रकल्पाचा उद्देश आणि त्या प्रकल्पांतर्गत सहभागी देशांना काय फायदा होणार आहे? हे जाणून घेऊ या…. या प्रकल्पाच्या माध्यमातून पश्चिम आशिया आणि युरोपला रेल्वेमार्ग तसेच बंदरांच्या माध्यमातून जोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यामध्ये डिजिटल कनेक्टिव्हीटी प्रस्थापित करणे तसेच या प्रकल्पात सहभागी असणाऱ्या…

अल्पकालीन गुंतवणूक पर्याय

 डेट म्युच्युअल फंड चार प्रकारच्या डेट म्युच्युअल फंडांवर एक नजर टाकूयात. त्यांचा वापर अल्प मुदतीसाठी गुंतवणूक करण्यासाठी करू शकतो. कारण त्यातील अंतर्निहित सिक्युरिटीजची कमाल परिपक्वता १२ महिन्यांपेक्षा अधिक नाही. लिक्विड फंड : "लिक्विड फंड हे नावाप्रमाणेच मुख्यतः अत्यंत लिक्विड मनी मार्केट पर्याय आणि अत्यंत कमी कालावधीच्या कर्ज रोख्यांमध्ये गुंतवणूक करतात. परिणामी अधिक तरलता देऊ करतात. ते ट्रेझरी बिल्स (टी-बिले) सारख्या अत्यंत अल्पकालीन साधनांमध्ये गुंतवणूक करतात. कमर्शियल पेपर (CP), सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट (CD) आणि लेंडिंग अँड बोरोइंग ऑब्लिगेशन्स (CBLO) ज्यात सुरक्षितता आणि उच्च तरलता राखून योग्य परताव्यासाठी ९१ दिवसांपर्यंत परिपक्वता आहे. या लिक्विड फंडांमध्ये विनंतीनंतर एका कामकाजाच्या (T+1) दिवसात प्रक्रिया केली…

रिलायन्सची नव्या क्षेत्रात एंट्री

देशातील सर्वात श्रीमंत मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वातील रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) आता एका नवीन क्षेत्रात पाऊल ठेवणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या अलीकडे झालेल्या ४६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) त्यांनी मोठी घोषणा केली. त्यांच्या या घोषणेने आता एलआयसीसह (LIC) देशातील सर्व विमा कंपन्यांसमोर आव्हान आणखी वाढले असेल. रिलायन्स लवकरच विमा क्षेत्रात उतरणार असल्याची मुकेश अंबानी यांनी घोषणा केली. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसद्वारे ग्राहकांना विमा उत्पादने पुरवली जातील. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या विलगीकरणानंतर अलीकडेच जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसची स्थापना करण्यात आली. त्यानंतर जिओ फायनान्शियल देशांतर्गत शेअर बाजारात सूचिबद्ध करण्यात आले असून आता कंपनीत नव्या सेवेची भर पडणार आहे. जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या माध्यमातून लोक जीवन विमा, सामान्य विमा…

End of content

No more pages to load