चांद्रयान ३ आणि शेअर बाजार
चांद्रयान-३ आपल्या मिशनच्या अगदी जवळ आले आहे. गुंतवणूकदारांच्या अपेक्षाही यामुळे वाढत आहेत. चांद्रयान-३ च्या या प्रवासात भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) व्यतिरिक्त अनेक कंपन्यांनीही मोठी भूमिका बजावली आहे. मिशन यशस्वी झाल्यास या कंपन्यांच्या शेअर्समध्ये बंपर उसळी येण्याची शक्यता आहे. ज्या गुंतवणूकदारांनी या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली आहे. ते चांगलेच मालामाल होणार आहेत. या शेअर्समध्येही काही काळ सातत्याने वाढ होताना दिसत आहे. जर भारताचे अंतराळ यान चंद्रावर यशस्वीरित्या उतरले तर ते देशातील खाजगी अवकाश कंपन्यांसाठी गुंतवणुकीचे नवीन मार्ग आणि संधी उघडतील. या मिशनशी संबंधित ५ कंपन्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊया. लार्सन आणि turbo L&T च्या एरोस्पेस मॅन्युफॅक्चरिंग सुविधेने चांद्रयान-३ साठी…