ध्या भारतात विश्वचषकाची धामधूम सुरू आहे . भारत-पाक सामन्यासाठी मुंबईहून अहमदाबादसाठी दोन विशेष गाड्या सोडण्याचे नियोजन पूर्ण झाले आहे !
प्रत्येक मॅच ही अंतिम मॅच असल्याप्रमाणे भारतीय संघ सुद्धा चांगल्या पद्धतीत खेळत आहे अशा वेळेस आपणही गुंतवणुकीचा विश्वचषक कसा जिंकावा या संदर्भात काही मार्गदर्शन करण्याचा मोह आवरता घेता येत नाही.
भारतीय संघात जसा हार्दिक पांड्या आहे तसा आपण टायटन हा शेअर आपल्या पोर्टफोलिओ मध्ये ठेवणे खूप हिताचे होऊ शकते!
भारतीय संघात जसा विराट कोहली आहे तसा आपल्या पोर्टफोलिओ मध्ये आपण बजाज फायनान्स चा शेअर ठेवणे अत्यंत अत्यावश्यक आहे.
आपल्या संघात जसे आयत्या वेळेस मदत करणारे अनेक खेळाडू आहेत तसे आपल्या पोर्टफोलिओ मध्ये सुद्धा स्टेट बँक एचडीएफसी चे कोणतेही शेअर्स टाटा कन्सुमर्स किंवा टाटा ग्रुपचे कोणतेही शेअर्स असणे अत्यावश्यक आहे.
ज्या लोकांना आपल्या पोर्टफोलिओमध्ये समभाग घेणे किंवा विकणे जमणार नाही त्यांनी किमान नव्याने उपलब्ध झालेले म्युच्युअल फंड्स तरी पहावेत अशी एक विनंती आहे. सध्या गाजत असलेला एडलवाईस मल्टी कॅप फंड हा एक अत्यंत चांगला फंड बाजारात उपलब्ध झाला आहे ! तसेच ज्यांना काही धोका वाटतो आणि बाजाराची रिस्क कमी करावीशी वाटते अशा मंडळीने मल्टी असेट फंड सुद्धा खरेदी करण्यास हरकत नाही
एचडीएफसीने आणलेला डिफेन्स फंड सुद्धा एका नव्या संकल्पनेवर आधारित आहे.
बी एन पी पारिबा आपला नवा एनएफओ स्मॉल कॅप ग्रुप मधून लॉन्च करत आहे त्याचा परफॉर्मन्स सुद्धा लॉन्ग टर्म साठी खूप चांगला मिळेल अशी आमची धारण आहे!
पण ज्या कोणाला शेअर बाजाराशी संबंधित कोणतीच गुंतवणूक करायची नसेल आणि ज्यादा व्याजदर प्राप्त करायचे असतील त्यांच्यासाठी सध्या आरबीआय बँकतर्फे वितरित होत असलेले बॉण्ड हा एक चांगला पर्याय असतो !
पण ज्यांना थोडी रिस्क घ्यायची आहे त्यांना स्टेट गव्हर्मेंट चे बॉण्ड्स किंवा स्टेट गव्हर्नमेंट संबंधित कंपन्यांचे बॉण्ड्स चांगला परतावा देऊ शकतात ! या गुंतवणुकीचा परतावा हा साधारणपणे दहा टक्के ते 12 टक्के या रेंजमध्ये आपल्याला मिळू शकतो म्हणजेच रिस्क नसताना आपण आपल्या गुंतवणुकीतून चांगला परतावा घेण्याची ही संधी आपण सोडू नये असे आमचे मत आहे !
आणि या आणि अशा प्रकारच्या नवगुंतवणुकीतून आपण आपला गुंतवणुकीचा विश्वचषक प्राप्त करावा हे मात्र निश्चित!
या संबंधात प्रत्यक्ष गुंतवणूक करताना आपण कोणीही आपल्या वित्तसल्लागाराचा सल्ला घेण्यात विसरू नये हे मात्र महत्त्वाचे!!
प्रदीप जोशी