महिंद्रा मनुलाइफ फोकस्ड फंड
महिंद्रा मनुलाइफ फोकस्ड फंडाला १९ नोव्हेंबर रोजी तीन वर्षे पूर्ण होत असल्याने या फंडाची दखल घेणे उचित ठरते. मागील तीन वर्षांचा विचार केल्यास हा फंड सातत्याने ‘टॉप’ किंवा ‘अपर मिडल क्वारटाइल’ मध्ये राहिला आहे. या फंडात १९ नोव्हेंबर २०२० मध्ये गुंतविलेल्या १ लाखाचे १६ नोव्हेंबर २०२३ रोजी ‘रेग्युलर ग्रोथ एनएव्ही’नुसार १,९०,३९६ (वार्षिक लाभ २४.०४ टक्के) झाले होते आणि १९ नोव्हेंबर २०२० रोजी पाच हजार रुपयांची ‘एसआयपी’ सुरू केलेल्या १,०८,००० रुपयांच्या गुंतवणुकीचे १६ नोव्हेंबर २०२३ रोजी ‘रेग्युलर ग्रोथ एनएव्ही’नुसार २,३६,७३४ झाले (वार्षिक लाभ १८.६६ टक्के) आहेत. मॉर्निंगस्टार एखाद्या फंडाला तीन वर्षांनंतर ‘स्टार रेटिंग’ बहाल करते. फंडाच्या चमकदार कामगिरीमुळे या फंडाला चार…