वित्त मंत्रालयाने ३१ मार्च २०२३ रोजी एक अधिसूचना जारी केली होती. यामध्ये असे म्हटले होते की, तुम्ही खाते उघडले असेल किंवा लहान बचत योजनांतर्गत गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला केवायसी कागदपत्रे सादर करावी लागतील. पॅन आणि आधार कार्ड देणे बंधनकारक असेल. सरकारच्या अधिसूचनेनुसार, ज्यांनी खाते उघडताना आधार आणि पॅन सबमिट केले नाहीत, त्यांना ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत हे करणे अनिवार्य आहे मात्र, खाते उघडताना कागदपत्रे दिल्यास ती सादर करावी लागणार नाहीत.

हीच बाब म्युच्युअल फंडानाही लागू!!

अभिप्राय द्या!