नव्याने उपलब्ध होणारे एन एफ ओ पहा

NFO संबधी माहिती  म्युच्युअल फंड हाऊसतर्फे जेव्हा एखादी नवी योजना बाजारात आणली जाते त्याला न्यू फंड ऑफर (NFO) असे म्हणतात. आपण जेव्हा असा NFO खरेदी करतो तेव्हा त्याची युनिट्स आपल्यास रु.१० प्रति युनिट या दरानेच प्राप्त होतात. सध्या भारतीय अर्थव्यवस्था यापूर्वी कधी नव्हती तेवढी सक्षम आहे आणि अशावेळी आपण एखाद्या नव्या mutual fund स्कीममध्ये पैसे गुंतविल्यास त्याचा परतावा अत्यंत चांगला मिळू शकतो अशी स्थिती आहे. सध्या बाजारात चार नवे NFO उपलब्ध होत असून त्या संबधी थोडक्यात माहिती खालीलप्रमाणे 1)    Bajaj finserv large and Mid cap fund (बजाज पिंन्सर्व्ह लार्ज अँड मिड कॅप फंड ) -  नावाप्रमाणे हा लार्ज कॅप सेगमेंटमध्ये गुंतवणूक करणारा NFO असून ६ ते २०…

गुंतवणूक सुरक्षित ठेवणारी व्यवस्था

आजकाल अधूनमधून एखादी बँक दिवाळखोरीत गेली किंवा तिचा रिझर्व्ह बँकेने परवाना रद्द केला असी बातमी पेपर तसेच टीव्हीवर वरचेवर दिसून येते. यात बऱ्याचदा लहान सहकारी बँकांचा समावेश असतो तथापि यात पीएमसी किंवा रुपी बँकेसारखी मोठी सहकारी बँक सुद्धा दिसून येते. नुकतेच रिझर्व्ह बँकेने पेटीम पेमेंट बँकेवरही २९ फेब्रुवारी २०२४ नंतर काही निर्बंध लागू केले आहेत. भविष्यात सुद्धा एखाद्या सहकारी बँक, लघुवित्त बँक, पेमेंट बँक तसेच खाजगी बँकेवरही असी वेळ येऊ शकते. जेव्हा एखाद्या बँकेवर अशी वेळ येते तेव्हा सगळ्यात मोठा परिणाम प्रामुख्याने सबंधित बँकेच्या ठेवीदारांवर होत असतो. यामुळे एकूणच बँक ठेवीदारांचा बँकांवरील विश्वास डळमळीत होते आणि बँक व्यवसाय हा प्रामुख्याने…

प्रधानमंत्री सूर्योदय

सरकारी सेवेत कार्यरत नसलेल्या प्रत्येक भारतीय नागरिकाला प्रधानमंत्री सूर्योदय योजनेचा लाभ मिळेल. तसेच लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न १.५ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे म्हणजे गरीब वर्ग, मध्यमवर्गीय आणि गरजू या योजनेसाठी पात्र ठरतील. अर्जदाराकडे आधार कार्ड, पत्त्याचा पुरावा, वीज बिल, बँक पासबुक, पासपोर्ट आकाराचा फोटो किंवा रेशन कार्ड यांसारखी कागदपत्रे असणे आवश्यक आहे. सूर्योदय योजनेसाठी अर्ज कसा करायचा? प्रधानमंत्री सूर्योदय योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी https://solarrooftop.gov.in/ या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. यानंतर होम पेजवर Apply पर्याय निवडा. वापरकर्त्याने राज्य आणि जिल्ह्यानुसार सर्व माहिती द्यावी प्रविष्ट करावी आणि वीजबिल क्रमांक दिल्यानंतर वीज खर्चाची माहिती व मूलभूत माहिती, सोलर पॅनलचा तपशील प्रविष्ट करावा.

मोबाइलच्या सुट्या भागांवरील आयात शुल्कात कपात

मोबाइल फोनच्या उत्पादनासाठी लागणाऱ्या सुट्या भागांच्या आयात शुल्कात कपात करण्याचा निर्णय केंद्र सरकारने बुधवारी अंतरिम अर्थसंकल्पाच्या पूर्वसंध्येला घेतला. हे आयात शुल्क आता १५ टक्क्यांवरून १० टक्क्यांवर आणण्यात आले आहे. या निर्णयाचा फायदा ॲपल आणि शाओमी कंपन्यांना भारतात मोबाइल हँडसेटची निर्मिती करण्यासाठी होईल आणि त्यांच्याकडून ग्राहकांना किमतीत ३ ते ५ टक्क्यांपर्यंत सवलत मिळणे अपेक्षित आहे. मोबाइलची बॅटरी, पाठीमागील आवरण, इतर तांत्रिक प्लास्टिक आणि धातूचे सुटे भाग, जीएसएम अँटेना आणि इतर सुट्या भागांवरील आयात शुल्कात केंद्राकडून कपात करण्यात आली आहे. या सुट्या भागांवरील आयात शुल्क १० टक्क्यांवर आणण्यात आल्याचे परिपत्रक केंद्रीय अर्थमंत्रालयाने बुधवारी काढले. या सुट्या भागांच्या उत्पादनासाठी लागणाऱ्या कच्च्या मालावरील आयात…

अंतरिम अर्थसंकल्प

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आहे. सर्वसामान्यांचं लक्ष लागून राहिलेल्या कर रचनेत त्यांनी कोणताही बदल केलेला नाही. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कररचनेमध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. प्राप्तिकराच्या रचनेत बदल होणा नसल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. त्यामुळे करदात्यांसाठी परिस्थिती जैसे थेच असेल. आम्ही अंतरिम अर्थसंकल्पाची परंपरा कायम राखत आहोत, असं अर्थमंत्री सीतारामन म्हणाल्या. अंतरिम अर्थसंकल्पात लोकानुनय करणाऱ्या घोषणा केल्या जात नाहीत. त्यामुळेच मोदी सरकारनंही निवडणुकीआधीच्या अर्थसंकल्पात लोकानुनयी घोषणा टाळल्या. कर रचनेत कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. वार्षिक ७ लाखांपर्यंतचं उत्पन्न असलेल्यांना कोणताही कर भरावा लागणार नाही. रेल्वेचे ४० हजार डबे 'वंदे भारत'प्रमाणे करण्याची घोषणा निर्मला सीतारमन…

बजेटआधी खरेदी करावे असे स्टॉक्स

बजेटआधी खरेदी करावे असे स्टॉक्स तुम्हालाही स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करून वर्षभरात भरघोस परतावा मिळवायचा असेल, तर आज आम्ही तुम्हाला अशा पाच शेअर्सबद्दल सांगत आहोत. ज्यामध्ये बजेटच्या आधी गुंतवणूक करून येत्या एका वर्षात जवळपास २९% परतावा मिळवू शकता. मिश्रा धातू निगम लिमिटेडच्या स्टॉकमध्ये तज्ज्ञांनी तेजीचा अंदाज वर्तवता आहे. सरकारी मालकीची कंपनी सुपरॲलॉय, टायटॅनियम, विशेष-उद्देशीय स्टील यासारख्या धातूंचे उत्पादन करते आणि भारतातील टायटॅनियम मिश्र धातुची एकमेव उत्पादक आहे. सरकारने संरक्षणासाठी प्रचंड अर्थसंकल्पाची तरतूद केल्यास कंपनीला फायदा होईल आणि शेअरची किंमत ५२५-५०० रुपयांपर्यंत वाढू शकते. तसेच आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडच्या शेअरची किंमतही १,६५० ते १,७०० रुपयांवर उसळी घेण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पात…

कॅशलेस विमा – आरोग्य विमा पॉलिसीधारकांना मोठी भेट

करोनानंतर आरोग्य विम्याविषयी मोठी जागरुकता पाहायला मिळाली असून या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात उलाढाल झाली. पण अजूनही आरोग्य विमा घेतलेल्या व्यक्ती नेटवर्क नसलेल्या रुग्णालयात उपचार घेत असेल तर त्याला कॅशलेस उपचाराचा लाभ मिळत नाही. अशा व्यक्तीला अगोदर उपचाराची संपूर्ण रक्कम भरावी लागते नाही तर रिइंबरमेंटची प्रक्रिया पूर्ण करावी लागते, त्यामुळे उपचारादरम्यान आर्थिक बोजा वाढतो. पण आता सर्व संपणार आहे. देशातील प्रत्येक आरोग्य विमाधारकाला आता कोणत्याही रुग्णालयात कॅशलेसची सुविधेचा लाभ मिळणार आहे. कोणत्याही रुग्णालयात कॅशलेस उपचार आरोग्य विम्याच्या क्षेत्रात मोठी क्रांती सुरू झाली असून आता आरोग्य विम्यामध्ये एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे, जो सामान्य विम्याचा एक भाग आहे. जनरल इन्शुरन्स कौन्सिल…

भारतीय शेअर बाजारात मोठी पडझड होणार आहे का?

येत्या दिवसात भारतीय शेअर बाजारात मोठी पडझड होणार आहे का? अशी शंका सातत्याने विचारात घेतली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून परदेशी गुंतवणूकदार भारतीय स्टॉक मार्केटवर फिदा झाले होते आणि एका पाठोपाठ एक त्यांनी गुंतवणूकीचा धडाका लावला, पण आता परदेशी गुंतवणूकदारांनी अचानक पैसे काढण्यास सुरुवात केली आहे. विदेशी गुंतवणूकदार म्हणजे FPI ने या महिन्याच्या (जानेवारी) पहिल्या तीन आठवड्यांत भारतीय बाजारातून आतापर्यंत १३,००० कोटी रुपयांहून अधिक पैसे काढले आहेत. आकडेवारीनुसार, विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी या महिन्यात (१९ जानेवारीपर्यंत) भारतीय शेअर्समधून १३,०४७ कोटी रुपये काढले असून १७ ते १९ जानेवारी दरम्यान २४,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे शेअर्स विकले. यापूर्वी डिसेंबरमध्ये एफपीआयने शेअर्समध्ये ६६,१३४ कोटी…

मंदिर बनवलेल्या कंपनीचे शेअर तेजी पकडणार

आज मंदिरात प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अनेक मान्यवर या सोहळ्यात सहभागी झाले. दरम्यान, डिझाईन इंजिनिअरिंग आणि निर्माण समूह लार्सन अँड टुब्रोने (L&T) एक निवेदन जारी केलं, ज्यानंतर कंपनीच्या स्टॉकमध्ये तेजीची शक्यता वर्तवली जात आहे. कंपनीने काय म्हटलं? "श्री रामजन्मभूमी मंदिराची रचना आणि उभारणीची आम्हाला संधी दिल्याबद्दल आम्ही सरकारचं मनापासून आभार व्यक्त करतो," एल अँड टीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक एसएन सुब्रमण्यन म्हणाले. एल अँड टी भारतातील २३ अब्ज डॉलरची मल्टीनॅशनल कंपनी असून इंजिनिअरिंग, खरेदी आणि बांधकाम (EPC) प्रकल्प, उच्च-तंत्र उत्पादन आणि सेवांमध्ये सेवा पुरवते. कंपनीचा व्यवसाय जगातील ५० हून अधिक देशांमध्ये पसरलेला…

या उत्पन्नावर लागत नाही एक रुपयाचाही कर

नवीन आर्थिक वर्ष सुरू होताच पगारदार लोक इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची लगबग सुरू करतात. दरवर्षी आयकर रिटर्न भरण्यापूर्वी नियोक्ता किंवा तुमच्या कंपनीला गुंतवणुकीचा पुरावा द्यावा लागतो. नोकरदार लोकांसाठी हा काळ विशेषतः महत्वाचा असून आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी गुंतवणूक करून त्याचा पुरावा सादर करणे खूप महत्वाचे असते. देशभरात वेगवेगळ्या प्रकारच्या उत्पन्नावर कर भरावा लागतो, परंतु तुम्हाला माहिती आहे का की असे काही उत्पन्न आहेत ज्यावर कर आकारला जात नाही. शेतीतून मिळणारे उत्पन्न पूर्णपणे करमुक्त असून तुम्ही एखाद्या कंपनीत भागीदार असल्यास नफा वाटणी म्हणून मिळणारी रक्कम करमुक्त आहे कारण, कंपनीने त्यावर आधीच कर भरला असतो. त्याच वेळी, तुमच्या काही गुंतवणुकीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर कोणताही…

End of content

No more pages to load