करोनानंतर आरोग्य विम्याविषयी मोठी जागरुकता पाहायला मिळाली असून या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात उलाढाल झाली. पण अजूनही आरोग्य विमा घेतलेल्या व्यक्ती नेटवर्क नसलेल्या रुग्णालयात उपचार घेत असेल तर त्याला कॅशलेस उपचाराचा लाभ मिळत नाही. अशा व्यक्तीला अगोदर उपचाराची संपूर्ण रक्कम भरावी लागते नाही तर रिइंबरमेंटची प्रक्रिया पूर्ण करावी लागते, त्यामुळे उपचारादरम्यान आर्थिक बोजा वाढतो. पण आता सर्व संपणार आहे. देशातील प्रत्येक आरोग्य विमाधारकाला आता कोणत्याही रुग्णालयात कॅशलेसची सुविधेचा लाभ मिळणार आहे.

कोणत्याही रुग्णालयात कॅशलेस उपचार
आरोग्य विम्याच्या क्षेत्रात मोठी क्रांती सुरू झाली असून आता आरोग्य विम्यामध्ये एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे, जो सामान्य विम्याचा एक भाग आहे. जनरल इन्शुरन्स कौन्सिल (GIC) ने कॅशलेस सर्वत्र मोहीम सुरू केली आहे ज्याअंतर्गत आता पॉलिसीधारकांना कोणत्याही रुग्णालयात कॅशलेस उपचार करून घेण्याचे स्वातंत्र्य मिळेल. म्हणजे आता कोणतेही रुग्णालय नेटवर्कच्या बहाण्याने रुग्णाला उपचार नाकारू शकणार नाही.

अभिप्राय द्या!