आज मंदिरात प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अनेक मान्यवर या सोहळ्यात सहभागी झाले. दरम्यान, डिझाईन इंजिनिअरिंग आणि निर्माण समूह लार्सन अँड टुब्रोने (L&T) एक निवेदन जारी केलं, ज्यानंतर कंपनीच्या स्टॉकमध्ये तेजीची शक्यता वर्तवली जात आहे.

कंपनीने काय म्हटलं?
“श्री रामजन्मभूमी मंदिराची रचना आणि उभारणीची आम्हाला संधी दिल्याबद्दल आम्ही सरकारचं मनापासून आभार व्यक्त करतो,” एल अँड टीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक एसएन सुब्रमण्यन म्हणाले. एल अँड टी भारतातील २३ अब्ज डॉलरची मल्टीनॅशनल कंपनी असून इंजिनिअरिंग, खरेदी आणि बांधकाम (EPC) प्रकल्प, उच्च-तंत्र उत्पादन आणि सेवांमध्ये सेवा पुरवते. कंपनीचा व्यवसाय जगातील ५० हून अधिक देशांमध्ये पसरलेला आहे.

अशा स्थितीत, मार्केट एक्सपर्टनुसार राममंदिराची निर्मिती केलेल्या स्टॉकमध्ये आगामी काळात तेजीचे वादळ दिसून येईल शेअरची किंमत ४,४०० रुपयांपर्यंत जाऊ शकते. UBS ने कंपनीच्या स्टॉकवर ४,४– रुपयांच्या लक्ष्य किमतीसह ‘बाय’ रेटिंग दिली. तसेच इलारा कॅपिटलने ३,७५० रुपयांच्या लक्ष्य किमतीसह शेअरवर खरेदीची शिफारस केली असून प्रभुदास लीलाधर म्हणाले की दीर्घमुदतीत शेअरने मजबूत वाढ नोंदवली. ट्रेंड ब्रेस्ट फिबोनाची एक्सटेंशन तुलनुसार शेअर ४,३४० रुपये ते ४,४०० रुपयांच्या वर जाऊ शकतो.

अभिप्राय द्या!