राममंदिर खुले होण्याआधी या कंपन्यांचे शेअर तेजीत
अयोध्येतील राममंदिराचे उद्घाटन २२ जानेवारीला होणार आहे. अयोध्येत याची जोरदार तयारी सुरू आहे. त्याच बरोबर संपूर्ण देशभरात उत्सवाचे वातावरण आहे. प्रतिष्ठापनेला फक्त ३ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. मंदिर खुले होण्याआधी शेअर बाजारात अशा काही कंपन्या आहेत ज्यांचे शेअर तेजीत आहेत. यात हॉटेल, एअरलाइन्स आणि रेल्वेशी संबंधित शेअर्सचा समावेश आहे. रेल्वेचे ऑनलाइन बुकिंग करणाऱ्या IRCTCचा शेअर गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. पुढील काही महिन्यात लाखो भक्त अयोध्येत जाण्याची शक्यता आहे. यामुळेच IRCTCच्या शेअरमध्ये तेजी आली आहे. गेल्या एका महिन्यात शेअरमध्ये २३ टक्के इतकी वाढ झाली आहे. आज देखील हा शेअर ५ टक्के वाढीसह ९८३.८० वर पोहोचला. राम मंदिराचे प्रोजेक्ट- नोव्हेंबर २०२०…