एन एफ ओ — technology संबंधी पहाच —

सन 2000 च्या आसपास मी माझे पहिले डिमॅट अकाउंट सुरू केले आणि त्यावेळी मला अकाऊंट ओपन करताना.साधारण 69 ठिकाणी सह्या कराव्या लागल्या होत्या. त्यानंतर शेअरखानचे डिमॅट अकाउंट ओपन केले त्यावेळी साधारणपणे अशाच 38 ते 40 ठिकाणी सह्या कराव्या लागल्या! आता मी जेव्हा शेअरखान ब्रांच ऑफिस सुरू केले त्यावेळी सुद्धा प्रत्यक्ष फॉर्म भरून खाते ओपन करणे हे कटकटीचे काम असायचे. कोविड काळापासून अकाउंट ओपनिंग प्रोसेस खूप सोपी झाली आणि आता ऑनलाइन अकाउंट्स ओपन करणे एका चुटकीचे काम झाले.ही तंत्रज्ञानातील प्रगती पाहता आपण यानंतरही अनेक मोठे टप्पे गाठणार आहोत हे निश्चित आहे. सध्या टेक्नॉलॉजी च्या सहकार्याने आपण ओला उबेरने कोठेही क्षणार्धात पोचू…

फिनटेकमधले हे बदल आणि आर्थिक गणित

पर्सनल फायनान्समधील  AI, ML आणि ब्लॉकचेन यांच्यामुळे झालेल्या तांत्रिक क्रांतीने वैयक्तिक वित्त क्षेत्रात नवीन युगाची सुरुवात झाली आहे. या नवकल्पना आर्थिक सेवांना अधिक समावेशक, कार्यक्षम आणि वैयक्तिकृत बनवण्याचा प्रयत्न करत आहेत ज्यामुळे भविष्यात पैशाचे व्यवस्थापित करणे ही बाब आपल्या दैनंदिन जीवनात अखंडपणे केली जाईल. Decentralized Finance(DeFi) यामुळे वापरकर्त्यांना मध्यस्थांशिवाय कर्ज घेणे, कर्ज देणे, व्यापार करणे आणि गुंतवणूक करणे शक्य होते. हा ट्रेंड वित्ताचे लोकशाहीकरण करत आहे. एम्बेडेड फायनान्स आर्थिक सेवांना गैर-आर्थिक ॲप्स आणि वेबसाइट्समध्ये समाकलित करते. हा ट्रेंड विविध उद्योगांमधील रेषा अस्पष्ट करत आहे, ज्यामुळे कंपन्यांना त्यांच्या ग्राहकांना थेट आर्थिक उत्पादने ऑफर करता येतात. पेमेंट प्रक्रिया आणि कर्ज देण्यापासून ते…

एसएमई मंचावरील सर्वात मोठा ‘आयपीओ’

उल्लू डिजिटल या समाजमाध्यम कंपनीने, प्रारंभिक समभाग विक्रीद्वारे (आयपीओ) निधी उभारण्यासाठी मुंबई शेअर बाजाराच्या सूक्ष्म, लघु व मध्यम अर्थात ‘बीएसई एसएमई’ मंचाकडे मसुदा प्रस्ताव दाखल केला आहे. मसुदा प्रस्तावात दिलेल्या माहितीनुसार, या माध्यमातून कंपनी सुमारे ६२.६ लाख समभागांची विक्री करणार असून, त्यायोगे १३५ ते १५० कोटी रुपयांचा निधी उभारण्याचा तिचा मानस आहे. या ‘आयपीओ’ला मंजुरी मिळाल्यास, ही आतापर्यंतची कोणाही एसएमई कंपनीकडून या माध्यमातून होणारी सर्वात मोठी भांडवल उभारणी ठरेल. याआधी स्पेक्ट्रम टॅलेंट मॅनेजमेंटने ‘आयपीओ’च्या माध्यमातून एसएमई मंचावर १०५ कोटी रुपयांची आजवरची सर्वाधिक निधी उभारणी केली आहे. त्यापाठोपाठ आशका हॉस्पिटल्स १०१.६ कोटी रुपये, बावेजा स्टुडिओ ९७ कोटी रुपये, खजांची ज्वेलर्स ९७…

डिझास्टर रिकव्हरी सेशन म्हणजे नेमकं काय?

२ मार्च म्हणजे नव्या महिन्याचा पहिला शनिवार असूनही शेअर बाजार सुरू राहणार असून बाजारात स्पेशल ट्रेडिंग सत्र आयोजित केले जाणार आहे. सर्वसाधारणपणे शनिवार आणि रविवारच्या दिवशी राष्ट्रीय शेअर बाजार (NSE) व मुंबई शेअर बाजार (BSE) मध्ये कामकाज बंद असते मात्र, यंदा तसं होणार नाही. नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) द्वारे २ मार्च (शनिवार), २०२४ रोजी एक विशेष लाइव्ह ट्रेडिंग सत्र आयोजित केले जाईल ज्यामध्ये, इंट्राडे डिझास्टर रिकव्हरी (DR) साइटवर स्विच केले जाईल. कोणतीही अनपेक्षित घटना घडल्यास एक्सचेंजेस मजबूत करण्यासाठी विशेष सत्र आयोजित केले जात आहे, ज्यामुळे त्यांच्या कामकाजावर परिणाम होऊ शकतो. बुधवारी देशातील दोन्ही प्रमुख स्टॉक एक्सचेंजने परिपत्रक जारी करून २…

आज व्हॅलेंटाईन डे!!

आज व्हॅलेंटाईन डे!! आज आपल्या वॅलेन्टाईनला आपण नव्या स्वरूपाच्या गिफ्ट देऊन अर्थसाक्षर करण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकायला शिकवा ! अशा वेगळ्या स्वरूपाच्या चार गिफ्ट्स मी आज सांगणार आहे ! १ ) आपल्या वॅलेंटाईनच्या नावे डिमॅट खाते उघडून त्याचा पासवर्ड द्यावा की ज्यामुळे equity इन्व्हेस्टमेंट संबंधी माहिती घ्यायला सुरवात होऊ शकेल ! २ ) बरेच लोक आज दागिने खरेदी करून गिफ्ट देतात पण मी आपल्याला आज *गोल्ड बॉण्ड खरेदी करून गिफ्ट द्यावी असे सुचवत आहे ! ते सांभाळणे सोपे असून विक्री करून पैसे उपलब्ध करणे सोपे असते ! ३) आपले कुटुंबीय हेही आपले एका तऱ्हेने वॅलेन्टाईनच असतात , त्यांना वेळ देऊन…

गोल्ड बॉंड – आधुनिक सोने खरेदी

गोल्ड बॉंड - आधुनिक सोने खरेदी भारतीय लोकांना कोणत्याही शुभप्रसंगी सोने खरेदी करण्याची पारंपारिक सवय आहे. पण प्रत्यक्ष खरेदी केलेल्या सोन्यामधील गुंतवणूक सोने विकून गरजेच्या वेळी सोडवून घेणे थोडेसे गुंतागुंतीचे असते किवा अशा अत्यंत गरजेच्या वेळी “सोनेतारण कर्ज घेणे" आवश्यक ठरते. नेमकी हीच गरज ओळखून भारत सरकारने “Sovereign Gold bonds” ही योजना सर्वसामान्यांसाठी सुरु केली आहे. यामध्ये कोणतीही व्यक्ती १ ग्रॅम पासून ४ किलोपर्यंतचे सोने खरेदी करू शकतो व हे सोने प्रत्यक्ष हातात न देता ते आपल्या demat खात्यात जमा होते. आणि ५ वर्षानंतर केव्हाही आपण त्यावेळी जो बाजारभाव असेल त्याप्रमाणे त्याची विक्री करू शकतो आणि कोणतीही वजावट न होता…

एक चूक पडेल महागात!

वाढत्या बँकिंगच्या काळात आज प्रत्येक व्यक्तीचे किमान एक तरी बँक खाते असते. तसे काही लोक विशेषतः नोकरदार लोक एकापेक्षा जास्त बँक खाती वापरतात आणि ते देखील एकाधिक बँकांमध्ये असते. परंतु लक्षात घ्या की तुमचे कोणत्याही बँकेत बचत खाते (सेव्हिंग अकाउंट) असले तरी चालू ठेवणे महत्त्वाचे असते आणि तुम्ही या खात्यांमधून पैशांची देवाण-घेवाण करत राहिल्यासच तुमचे बँक खाते चालू राहील. जर एखादा बँक ग्राहक बचत खाते किंवा चालू खाते एका वर्षासाठी वापरत नसल्यास अकाउंट निष्क्रिय होते. तर दोन वर्षे खाते निष्क्रिय असल्यास डॉरमॅन्ट किंवा इनऑपरेटिव्ह खात्यात टाकले जाते. असे झाल्यास ग्राहक त्याचे खाते वापरू शकत नाहीत. अशा परिस्थितीत तुमचे बचत किंवा…

SIP द्वारे गुंतवणुकीचा उच्चांक

इक्विटी म्युच्युअल फंडांत गुंतवणूक करण्याकडे दिवसेंदिवस कल वाढत आहे. जानेवारी महिन्यात या फंडांमध्ये गुंतवणूकदारांनी एकूण २१ हजार ७८० कोटी रुपये गुंतवले आहेत. ही रक्कम गेल्या दोन वर्षांतील सर्वाधिक मासिक गुंतवणूक ठरली आहे. यंदा जानेवारी महिन्यात नियोजनबद्ध गुंतवणुकीचा (सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे एसआयपी) उच्चांक गाठला गेला आहे. ही माहिती म्युच्युअल फंडाची मध्यवर्ती संघटना असलेल्या अॅम्फीने गुरुवारी दिली. डिसेंबर २०२३मध्ये एसआयपीच्या माध्यमातून १७ हजार ६१० कोटी रुपये गुंतवले गेले होते. जानेवारी महिन्यात १८ हजार ८३८ कोटी रुपये एसआयपीद्वारे गुंतवले गेले. इक्विटी म्युच्युअल फंडांमध्ये डिसेंबर २०२३मध्ये १६ हजार ९९७ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती. जानेवारीत त्यात २८ टक्के वाढ झाली आणि २१ हजार…

नव्याने येणारे आय पी ओ पहा

Entero Healthcare Solutions Limited या कंपनीचा  IPO 09 फेब्रुवारी 2024 ते 13 फेब्रुवारी   2024 पर्यन्त उपलब्ध असून त्याचा LOT Size  11 समभागांचा असून त्याची किंमत प्रति शेअर 1258 आहे . Jana Small  Finance bank Ltd या कंपनीचा  IPO 07 फेब्रुवारी 2024 ते 09 फेब्रुवारी   2024 पर्यन्त उपलब्ध असून त्याचा LOT Size  36 समभागांचा असून त्याची किंमत प्रति शेअर 414/ आहे. Rashi Peripherals Ltd या कंपनीचा  IPO 07 फेब्रुवारी 2024 ते 09 फेब्रुवारी   2024 पर्यन्त उपलब्ध असून त्याचा LOT Size  48 समभागांचा असून त्याची किंमत प्रति शेअर 311/-आहे . आय पी ओंची खरेदी आपण online UPI Id वापरुन…

टर्म इन्श्युरन्स — वाचा काय घ्यावी काळजी

टर्म प्लॅन घेताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आजच्या लेखात आम्ही टर्म प्लॅनच्या फायद्यांबद्दल नाही तर ज्या कारणांमुळे क्लेम मिळण्यात अडचण येऊ शकते त्याबद्दल सांगणार आहोत. टर्म इन्शुरन्सबद्दल सर्वप्रथम लक्षात घ्या की प्रत्येक प्रकारच्या डेथ कव्हरेजसाठी संरक्षण प्रदान करत नाही. १. टर्म प्लॅन घेणाऱ्या व्यक्तीला डेथ कव्हरचाही लाभ मिळतो, परंतु पॉलिसीधारकाचा नशेच्या प्रभावाखाली वाहन चालवताना मृत्यू झाला तर टर्म इंश्युरन्सचा लाभ मिळणार नाही. २. पॉलिसीधारकाला ड्रग्ज आणि अल्कोहोलचे व्यसन लागले व त्यामुळे मृत्यू झाला, तर विमा कंपनी टर्म प्लॅनच्या दाव्याची रक्कम देण्यास नकार देऊ शकते. ३. पॉलिसीधारक साहसी खेळांचा शौकीन असल्यास आणि कोणत्याही धोकादायक खेळादरम्यान मृत्यू झाल्यास टर्म…

End of content

No more pages to load