सन 2000 च्या आसपास मी माझे पहिले डिमॅट अकाउंट सुरू केले आणि त्यावेळी मला अकाऊंट ओपन करताना.साधारण 69 ठिकाणी सह्या कराव्या लागल्या होत्या.

त्यानंतर शेअरखानचे डिमॅट अकाउंट ओपन केले त्यावेळी साधारणपणे अशाच 38 ते 40 ठिकाणी सह्या कराव्या लागल्या! आता मी जेव्हा शेअरखान ब्रांच ऑफिस सुरू केले त्यावेळी सुद्धा प्रत्यक्ष फॉर्म भरून खाते ओपन करणे हे कटकटीचे काम असायचे.

कोविड काळापासून अकाउंट ओपनिंग प्रोसेस खूप सोपी झाली आणि आता ऑनलाइन अकाउंट्स ओपन करणे एका चुटकीचे काम झाले.ही तंत्रज्ञानातील प्रगती पाहता आपण यानंतरही अनेक मोठे टप्पे गाठणार आहोत हे निश्चित आहे.

सध्या टेक्नॉलॉजी च्या सहकार्याने आपण ओला उबेरने कोठेही क्षणार्धात पोचू शकतो.सुट्या पैशांची चिंता जीपेसारख्या ॲपमुळे जवळ नाहीशी झाली आहे . बँकेचे सर्व व्यवहार आपण टेबलवरच करतो. रेल्वे बुकिंग , रेल्वेची खानपान सेवा कॅन्सलेशन,फ्लाइट बुकिंग यासारख्या गोष्टी आपण मोबाईलवर करतो. ईकॉमर्समुळे जगभरात प्राप्त होणारी कोणतीही गोष्ट कशीही शोधून आपण आपल्या घरी मागवू शकतो.हे पाहता टेक्नोलॉजीही आपल्या घरापर्यंतच नाही तर अगदी किचनपर्यंतसुद्धा पोहोचली आहे.
अशा स्थितीत गुंतवणुकीतसुद्धा विविधता आणण्याच्या दृष्टीने नव्याने दोन एनएफओ बाजारामध्ये गेल्या आठवड्यापासून उपलब्ध झाले आहेत! पहिला फंड आहे एडेलवाईस टेक्नोलॉजी फंड आणि दुसरा आहे कोटकचा टेक्नोलॉजी फंड!!
या दोन्ही फंडातील गुंतवणूक आपल्याला भविष्यामध्ये चांगला परतावा देऊ शकेल असे निश्चित आहे!!

हे दोन्ही फंड जरी थीम बेस फंड असले असले तरी यातील गुंतवणूक ही अनेक प्रकारच्या टेक्नॉलॉजी संबंधित कंपन्यामध्ये असणार आहे.आणि यामध्ये अनेक प्रकारची विविधताही असणार आहे.

ई कॉमर्स, कंझ्युमर ,बॅंकिंग , एंटरटेनमेंट , ऑटोमोबाइल , शॉपिंग मॉल्स , इलेक्ट्रिक व्हिकल्स इंटरनेट व ओटीटी प्लॅटफॉर्म , रेडियो , टेलिव्हिजन सिनेमा मेकॅनायझेशन इन फॅक्ट्रीज , रोबोटिक्स आणि एआय स्वरूपाच्या कंपन्यामध्ये या फंडामधील गुंतवणूक असणार आहे आणि त्यामुळे आपण कल्पना करू त्यापेक्षासुद्धा जास्त परतावा या कंपन्यातील गुंतवणुकीमुळे आपल्याला मिळू शकणार आहे ,

फक्त त्यासाठी किती कालावधी लागेल हे मात्र आपल्याला सांगता येणार नाही म्हणून लाँगटर्म होरायझन असलेल्या सर्वांनी गुंतवणूक करून आपल्या पोर्टफोलियोमध्ये विविधता आणि त्याबरोबरच चांगला परतावा मिळण्याच्या दृष्टीने पावले उचलावीत असे आमचे मत आहे. ज्यांना आत्ता लॅम्प्सम गुंतविणे धोकादायक वाटते त्यांनी यामध्ये एसआयपीद्वारे गुंतवणूक करण्णे हिताचे आहे.
यासंबंधी अधिक माहिती हवी असल्यास आपण केव्हाही आमच्याशी संपर्क साधू शकताआणि यातील खरेदी महिनाअखेरीपर्यंत सुरू असल्याने आपण आपल्या सल्लागाराशी चर्चा करूनसुद्धा यामध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेणे जास्त हितावह होणार आहे.
धन्यवाद !!
प्रदीप जोशी

अभिप्राय द्या!