वाढत्या बँकिंगच्या काळात आज प्रत्येक व्यक्तीचे किमान एक तरी बँक खाते असते. तसे काही लोक विशेषतः नोकरदार लोक एकापेक्षा जास्त बँक खाती वापरतात आणि ते देखील एकाधिक बँकांमध्ये असते. परंतु लक्षात घ्या की तुमचे कोणत्याही बँकेत बचत खाते (सेव्हिंग अकाउंट) असले तरी चालू ठेवणे महत्त्वाचे असते आणि तुम्ही या खात्यांमधून पैशांची देवाण-घेवाण करत राहिल्यासच तुमचे बँक खाते चालू राहील. जर एखादा बँक ग्राहक बचत खाते किंवा चालू खाते एका वर्षासाठी वापरत नसल्यास अकाउंट निष्क्रिय होते. तर दोन वर्षे खाते निष्क्रिय असल्यास डॉरमॅन्ट किंवा इनऑपरेटिव्ह खात्यात टाकले जाते. असे झाल्यास ग्राहक त्याचे खाते वापरू शकत नाहीत.

अशा परिस्थितीत तुमचे बचत किंवा चालू खाते डॉरमॅन्ट किंवा इनऑपरेटिव्ह होऊ नये असे तुम्हाला वाटत असेल तर काही महत्त्वाचे व्यवहार सुरू ठेवणे अनिवार्य आहे. तुमच्या बँक खात्यातून व्यवहार सुरू राहिल्यास खाते बंद होण्याची शक्यता राहणार नाही. या व्यवहारांमध्ये जावक बिले, धनादेशाचे (चेक) व्यवहार, रोख ठेवी आणि रोख पैसे काढणे अशा व्यवहारांचा समावेश आहे.

खाते निष्क्रिय झाल्यास काय
तुमच्या एका चुकीमुळे खाते निष्क्रिय झाल्यास ग्राहकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. उदाहरणार्थ निष्क्रिय बँक खात्यातून चेकबुक जारी करता येत नाही तर खात्यातून पैसे काढताना किंवा ठेवींवरही काही निर्बंध घातले जाऊ शकतात. तसेच यासह काही विशिष्ट सेवाच घेऊ शकत नाही.

अभिप्राय द्या!