बहुतेक सर्वाना समाजातील गरजू वंचित आणि दुर्बल घटकांच्या मदतीसाठी दान करण्याची इच्छा असते.

दान सत्पात्री करावे अशीही  भावना असते ,गरजूपर्यंत आपले दान कसे पोहोचावे याची अनेकांना साशंकता असते. आणि यासाठी म्युच्युअल फंड हाऊस तर्फे charity फंड्स तयार केले जातात, असाच एक charity फंड एचडीएफसी म्युच्युअल फंड हाऊसने  सुरू केला आहे. 

त्याचे नाव आहे एचडीएफसी charity फंड फॉर कॅन्सर!!

 या फंडाच्या  नावातच कॅन्सर  आहे !! अर्थात ही close ended योजना असून गेल्याच आठवड्यात ही योजना सुरू झाली असून नऊ ऑगस्ट रोजी बंद होणार आहे .

ही तीन वर्षे कालावधीची फिक्स मॅच्युरिटी पद्धतीची योजना आहे. यामध्ये डिव्हीडंड हा एकच पर्याय आहे. आणि जो योग्य अंतराने दिला जाणार आहे. आणि यातील काही रक्कम कर्करोगग्रस्तांना दिली जाईल (आणि  हा दानाचा भाग आहे !! )

त्यासाठी लाभांशाच्या 50% किंवा 75 टक्के असे दोन पर्याय आहेत. तुम्ही जितकी रक्कम दान कराल तितकीच रक्कम एचडीएफसी म्युच्युअल फंड घालेल .

हा dividend प्रथम गुंतवणूकदारांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल. अशा लाभांशावर गुंतवणूकदारांना त्यांच्या उत्पन्न पातळीनुसार इन्कम टॅक्स द्यावा लागेल. त्यामुळे लाभांशच्या जास्तीत जास्त 75 टक्के इतकीच रक्कम दान करता येते .

यामध्ये कमीत कमी 50 हजार रुपये गुंतवावे लागतात कमाल मर्यादा नाही  !!

अर्ज भरताना वन टाइम mandate भरून आपण किती रक्कम या फंडाकडे दान करणार  आहोत हे बँकेला सांगणे आवश्यक असते. दर सहा महिन्याने ही रक्कम इंडियन कॅन्सर सोसायटीकडे परस्पर जमा होते व आपल्याला 80 G अंतर्गत डिडक्शन सुद्धा मिळते.

कॅन्सरग्रस्त रुग्णाला मदतीसाठी रु. पाच लक्षची मर्यादा आहे. बोन मॅरो उपचाराची गरज असलेल्या रुग्णांसाठी आठ लाख रुपये मर्यादा आहे.

या फंड हाऊसच्या नियमक मंडळामध्ये नवनीत मुनोत आणि आरबीआयचे माजी डेप्युटी गव्हर्नर उषा थोरात यांचा समावेश आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे dividend हा फक्त नफ्याच्या वाटप रकमेमधून दिला जातो. त्यामुळे आपले मुद्दल सुरक्षित राहते आणि तीन वर्षानंतर आपले मुद्दल पुन्हा आपल्याला परत मिळते. म्हणजे यातून डिव्हीडंड द्वारे मिळणाऱ्या उत्पन्नाच्या 75 टक्के रकमेपर्यंतचा हिस्सा आपण कॅन्सर सोसायटी मार्फत अत्यंत गरजू रुग्णांना देऊ शकतो आणि त्याचा वापर कोणत्याही चुकीच्या पद्धतीने होणार नाही याचीही खात्री आपल्याला फंड हाऊस मार्फत मिळते म्हणून सतपात्री दान आणि गुंतवणूक हे दोन्ही फायदे आपण या फंड हाऊस मार्फत घेऊ शकतो.

कोणाला कॅन्सरग्रस्तरुग्णांना मदत करण्याची इच्छा असल्यास अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधावा अशी विनंती !!

सध्या अधिक मास सुरु आहे आणि अधिकस्य अधिकं फलं मिळवण्यासाठी दानशुरांनी या योजनेचा फायदा घ्यावाअशी विनंती  !!

प्रदीप जोशी 9422429103

अभिप्राय द्या!