बँकिंग क्षेत्रात आता भारतही जगभरातील अर्थव्यवस्थेला टक्कर देत आहे. भारतातून एक बँक उदयास आली आहे जिने अमेरिका आणि चीनच्या सर्वात मोठ्या बँकांनाही स्पर्धा दिली आहे.
HDFC बँकेचे HDFC लिमिटेडमध्ये विलीनीकरण झाल्यामुळे देशातील सर्वात मोठी खासगी बँक ‘एलिट क्लब’मध्ये समाविष्ट झाली आहे. १२.३८ लाख कोटी रुपये मार्केट कॅपसह भारतातील सर्वात मोठी कर्जदाता बँक सोमवारी $१०० अब्ज मार्केट कॅपसह जागतिक एलिट क्लबमध्ये HDFC बँकेने एंट्री घेतली आहे. बँकेच्या मार्केट कॅपने सोमवारी $१५० अब्जचा टप्पा पार करत मॉर्गन स्टॅनली, गोल्डमन सॅक्स आणि बँक ऑफ चायना यांना पिछाडीवर टाकले आहे.
जगातील सर्वात मोठ्या कर्जदारांच्या यादीत HDFC बँकेच्या वर जेपी मॉर्गन ($४३८ अब्ज), बँक ऑफ अमेरिका ($२३२अब्ज), चीनचे ICBC ($२२४ अब्ज), चीनची कृषी बँक ($१७१ अब्ज), वेल्स फार्गो ($१६३ अब्ज) आणि HSBC ($१६० अब्ज). त्याच वेळी मॉर्गन स्टॅनली ($१४३ अब्ज) आणि गोल्डमन सॅक्स ($१०८ अब्ज) मार्केट कॅपच्या बाबतीत HDFC पेक्षा लहान झाले आहेत.