एसबीएफसी फायनान्स आयपीओ
बिगर बँकिंग वित्तीय कंपनी एसबीएफसी फायनान्सचा आयपीओ ३ ऑगस्ट रोजी खुला होणार असून हा आयपीओ ७ ऑगस्टला बंद होईल. आयपीओ २ ऑगस्ट रोजी अँकर गुंतवणूकदारांसाठी खुला होईल. कंपनीने यासाठी ५४-५७ रुपये प्रति शेअर किंमत बँड निश्चित केला असताना आयपीओ अंतर्गत ६०० कोटी रुपयांचे नवीन इक्विटी शेअर्स जारी केले जातील. याशिवाय, ४२५ कोटी रुपयांचे शेअर्स ऑफर फॉर सेल (OFS) अंतर्गत विकले जातील. कंपनीने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सेबीकडे आयपीओ कागदपत्रे दाखल केली होती.

कॉन्कॉर्ड बायोटेक आयपीओ
अहमदाबादस्थित फार्मा कंपनी कॉनकॉर्ड बायोटेकचा आयपीओ ४ ऑगस्ट रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला होईल. गुंतवणूकदार ८ ऑगस्टपर्यंत यात गुंतवणूक करू शकतील. आयपीओमध्ये २.०९ कोटी इक्विटी शेअर्सची विक्री ऑफर फॉर सेलमध्ये होईल. अँकर गुंतवणूकदारांसाठी हा आयपीओ एक दिवस आधी म्हणजेच ३ ऑगस्ट रोजी उघडला जाईल.

विन्सिस आयटी आयपीओ
पुणेस्थित आयटी आणि सॉफ्टवेअर सेवा कंपनी विन्सिस आयटी सर्व्हिसेस इंडियाने आयपीओसाठी १२१-१२८ रुपयांचा प्राइस बँड निश्चित केला आहे. हा आयपीओ उद्या १ ऑगस्ट २०२३ रोजी उघडेल आणि ४ ऑगस्ट रोजी बंद होईल. विन्सिसअंतर्गत ३८.९४ लाख शेअर्स जारी केले जातील. बीलाइन कॅपिटल ॲडव्हायझर्स हे मर्चंट बँकर तर लिंक इनटाइम इंडिया रजिस्ट्रार आहेत. कंपनी आयपीओद्वारे ४९.८४ कोटी रुपये उभारणार आहे.

युडीज सोल्युशन्स आयपीओ
प्राइम डेटाबेसवर उपलब्ध असलेल्या डेटानुसार युडीज सोल्युशन्स हा एसएमई आयपीओ आहे. हा आयपीओ ४ ऑगस्ट रोजी उघडेल आणि ८ ऑगस्ट रोजी बंद होईल. कंपनीने आयपीओची किंमत १६२ रुपये प्रति इक्विटी शेअर निश्चित केली असताना कंपनीच्या शेअर्सचे लिस्टिंग एनएसई इमर्ज प्लॅटफॉर्मवर होईल. आयपीओच्या माध्यमातून ४१.८ कोटी रुपये उभारण्याचा कंपनीचा मानस आहे.

अभिप्राय द्या!