गुजरातची कंपनी ज्योती CNC ऑटोमेशनचा आयपीओ उद्या, ९ जानेवारी रोजी किरकोळ गुंतवणूकदारांसाठी उघडणार आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही नवीन वर्षात प्रारंभिक सार्वजनिक ऑफर किंवा IPO मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही या आयपीओचे तपशील जाणून घेतले पाहिजे.
ज्योती सीएनसी ऑटोमेशनबद्दल संपूर्ण माहिती
गुजरातस्थित कंपनी IPO द्वारे १,००० कोटी रुपये उभे करण्याचा प्रयत्न करेल. ९ जानेवारी रोजी कंपनीचा आयपीओ खुला होणार असून ११ जानेवारीपर्यंत लोक बोली लागू शकतील. तर १२ जानेवारीला शेअर वाटपाची तारीख निश्चित करण्यात आली असून १५ जानेवारीला अयशस्वी गुंतवणूकदारांना त्यांचा रिफंड दिला जाईल तर, त्याच दिवशी यशस्वी गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यात शेअर्स ट्रान्सफर केले जातील. याशिवाय १६ जानेवारीला कंपनी एक्सचेंजवर सूचिबद्ध होण्याची शक्यता आहे. लक्षात घ्या की या कंपनीचा आयपीओ पूर्णपणे नवीन आहे म्हणजे ऑफर फॉर सेलद्वारे कोणतेही शेअर्स जारी केले जाणार नाहीत.
ज्योती सीएनसी ऑटोमेशन IPO किंमत बँड
कंपीनीने आयपीओसाठी ३१५ रुपये ते ३३१ रुपये किंमत बँड निश्चित केली असून एका लॉटमध्ये ४५ शेअर्स असतील. तर किरकोळ गुंतवणूकदार किमान एक लॉट आणि जास्तीत जास्त १३ लॉट खरेदी करू शकतील. अशा स्थितीत, इच्छुक लोक किमान १४,८९५ रुपये तर कमाल १,९३,६३५ रुपयांची बोली लावू शकतात. या आयपीओमध्ये १५% उच्च निव्वळ व्यक्तींसाठी, जास्तीत जास्त ७५% पात्र संस्थात्मक खरेदीदार आणि १०% किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.