शेअर बाजारातून मजबूत कमाईची संधी शोधणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मार्केटमधून झटपट कमाई करण्यासाठी मल्टीबॅगर स्टॉकच्या शोधात असणाऱ्यांसाठी कामाची अपडेट आहे. इक्विटी मार्केटमध्ये योग्य शेअर्सची निवड करून त्यात पैसा गुंतवला तर तुम्हाला नक्कीच बंपर रिटर्न मिळतील. गुंतवणूकदारांना श्रीमंत केलेले बाजारात अनेक कंपन्यांचे शेअर्स आहेत. असाच एक शेअर प्रवेग लिमिटेडचा आहे. या टेंट सिटी बनवणाऱ्या कंपनीने एका वर्षात गुंतवणूकदारांना बंपर परतावा दिला असून आता अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वी या स्टॉकने तेजीची वाट धरली आहे.
आता कंपनी अयोध्येतील रामजन्मभूमीजवळ टेंट सिटीचे काम करत आहे. अयोध्येतील राम मंदिराचे नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात उद्घटन होणार असून दिवसागणिक या धार्मिक स्थळाला भेट देणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे, ज्याचा फायदा कंपनीसह गुंतवणूकदारांना होतोय. दरम्यान अयोध्येव्यतिरिक्त कंपनीचे – वाराणसीतील काशी विश्वनाथ, स्टॅच्यू ऑफ युनिटी, कच्छच्या रणजवळ देखील टेंट सिटी आहे.