‘एसआयपी टॉप-अप’ म्हणजे काय ?

‘एसआयपी टॉप-अप’ म्हणजे काय ? ‘एसआयपी’च्या माध्यमातून आपण दरमहा ठरावीक रक्कम म्युच्युअल फंडात गुंतवत असतो. ‘एसआयपी टॉप-अप’मध्ये आपण दर महिन्याला निश्चित केलेल्या ‘एसआयपी’च्या रकमेत वार्षिक आधारावर वाढ करण्याची सूचना म्युच्युअल फंड कंपनीला देतो . साहजिकच आपली दीर्घकालीन उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपल्याला ‘एसआयपी टॉप-अप’ सुविधा अधिक फायदेशीर ठरते. उदा. प्रकाशने  दरमहा २०,००० रुपयांची ‘एसआयपी’ पुढील २० वर्षांकरिता केली आहे. आणि  राकेश  याने देखील २०,००० रुपयांची ‘एसआयपी’ केली आणि दरवर्षी त्यात २,००० रुपयांची वाढ करण्याची सूचना म्युच्युअल फंड कंपनीस दिली. दरवर्षी उत्पन्नात वाढ झाल्यावर गुंतवणुकीतदेखील वाढ केल्यामुळे राकेशला प्रकाशपेक्षा  खूप जास्त फायदा झाला. राकेशने दरवर्षी ‘एसआयपी’ची रक्कम २,००० रुपयांनी वाढवल्यामुळे त्याची एकूण…

दागिने खरेदी करताना—-

सोन्याचे दागिने खरेदी करताना खूप सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, कारण जर तुम्ही निष्काळजीपणा केला तर तुम्ही फसवणुकीला बळी पडू शकता. लग्न असो किंवा सणासुदीच्या काळात सोन्याची मागणी वाढते. काही लोकांना सोने घालण्याची आवड असते, म्हणून ते अशा प्रसंगी सोने खरेदी करतात, तर काही लोक सोन्यात एक गुंतवणूक पर्याय म्हणून खरेदीला प्राधान्य देतात. सोन्याला नेहमीच संकटाचा साथीदार म्हटले जाते. त्यामुळे सोने खरेदी करताना योग्य ती काळजी घेतली पाहिजे कारण कधी तुम्हाला ते विकण्याची किंवा गहाण ठेवण्याची गरज भासली आणि सोन्यात भेसळ आढळली तर तुम्हाला कमी किंमत मिळेल. हॉलमार्क ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अर्थात BIS चे वैशिष्ट्य सोन्याची शुद्धता सुनिश्चित करते. हेच…

 म्युच्युअल फंडामधून आता बाहेर पडावे का?

   गेल्या आठवड्यात सेन्सेक्स आणि निफ्टीने केलेल्या रेकॉर्डब्रेक कामगिरीचे प्रतिबिंब इक्विटी म्युच्युअल फंडात देखील पडले  बहुसंख्या इक्विटी म्युचल फंडांच्या एन ए व्ही देखील त्यांच्या आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीला स्पर्श करून आल्याचे चित्र दिसत आहे.  या तेजीच्या पार्श्वभूमीवर आपण आपली इक्विटी म्युच्युअल फंडातील गुंतवणूक विकून कमावलेला नफा पदरात पाडून घेण्याचा विचार करत असाल तर पुढील मुद्द्यांचा विचार करा. 1)  म्युच्युअल फंडातील गुंतवणूक सुरू करताना आपण ठरविलेले उद्दिष्ट साध्य झाले आहे का हे प्रथम पहा. आणि ते उद्दिष्ट साध्य झाले नसेल तर घाई घाईने आपली गुंतवणूक विकून टाकू नये. 2) म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीची विक्री करून मिळणाऱ्या रकमेचे काय करणार याचा आधी विचार करून…

जागतिक स्तरावर HDFC अमेरिका, चीन बँकेच्या वरचढ

बँकिंग क्षेत्रात आता भारतही जगभरातील अर्थव्यवस्थेला  टक्कर देत आहे. भारतातून एक बँक उदयास आली आहे जिने अमेरिका आणि चीनच्या सर्वात मोठ्या बँकांनाही स्पर्धा दिली आहे. HDFC बँकेचे HDFC लिमिटेडमध्ये विलीनीकरण झाल्यामुळे देशातील सर्वात मोठी खासगी बँक 'एलिट क्लब'मध्ये समाविष्ट झाली आहे. १२.३८ लाख कोटी रुपये मार्केट कॅपसह भारतातील सर्वात मोठी कर्जदाता बँक सोमवारी $१०० अब्ज मार्केट कॅपसह जागतिक एलिट क्लबमध्ये HDFC बँकेने एंट्री घेतली आहे. बँकेच्या मार्केट कॅपने सोमवारी $१५० अब्जचा टप्पा पार करत मॉर्गन स्टॅनली, गोल्डमन सॅक्स आणि बँक ऑफ चायना यांना पिछाडीवर टाकले आहे. जगातील सर्वात मोठ्या कर्जदारांच्या यादीत HDFC बँकेच्या वर जेपी मॉर्गन ($४३८ अब्ज), बँक ऑफ…

कार्पोरेट डिपॉझिट्स

 बजाज फायनान्सतर्फे वेगवेगळ्या मुदतीची कार्पोरेट डिपॉझिट म्हणजेच मुदत ठेवी स्वीकारल्या जातात. आणि त्यातील व्याजदर हे खूप आकर्षक आहेत. या व्याजदरच्या मुदती सुद्धा थोड्या वेगळ्या स्वरूपाच्या आहेत, पंधरा महिने 18 महिने 22 महिने 30 महिने 33 महिने आणि 44 महिने अशा या मुदती आहेत. 44 महिने मुदतीसाठी  बजाज फायनान्स तर्फे 8.60% व्याजदर देण्यात येतो. आणि व्याजदरचा परतावा हा आपल्याला हवा तसा स्वीकारण्याच्या यामध्ये सोयी आहेत. बजाज फायनान्स  या कंपनीमध्ये ठेवी या अत्यंत सुरक्षित समजल्या जातात. बजाज फायनान्सला कंपनीला क्रिसिलने  ट्रिपल ए रेटिंग दिले आहे. यामध्ये गुंतवणुकीची सुविधा हे पूर्णतः ऑनलाइन पद्धतीची आहे त्यामुळे आपण ठेवलेल्या पैशांना ठेवल्या दिवसापासूनचे व्याज मिळणे सुरू…

२०७५ पर्यंत भारताचा जीडीपी अमेरिकेला मागे टाकेल !!

२०७५ पर्यंत भारताचा जीडीपी अमेरिकेला मागे टाकेल, असे इन्व्हेस्टमेंट बँक गोल्डमन सॅक्सने म्हटले आहे. सध्या ब्रिटनला सहाव्या स्थानावर ढकलून भारताने पाचवे स्थान काबीज केले असून भारताचा GDP २०२३ मध्ये $३.७५ ट्रिलियन पर्यंत वाढण्याचा अंदाज आहे, जी २०१४ मध्ये $२ ट्रिलियनच्या तुलनेत मोठी वाढ आहे. या दरम्यान, एक आणखी मोठी बातमी मिळाली आहे, जी प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब आहे. भारताची नांगी जगात वाजणार असून भारत जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू शकते. गोल्डमन सॅक्सने २०७५ पर्यंत भारत ही जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल असा अंदाज व्यक्त केला आहे. गोल्डमन सॅक्सने आपल्या अहवालात म्हटले आहे की २०७५ पर्यंत चीन ५७ ट्रिलियन…

करमुक्त बॉन्ड्स

करमुक्त बॉन्ड्समध्ये गुंतवणुकीचे फायदे करमुक्त म्हणजे टॅक्स फ्री बॉन्ड्समध्ये गुंतवणूक करण्याचे बरेच फायदे आहेत. जर तुम्ही २० ते ३० टक्के टॅक्स स्लॅबमध्ये येत असाल तर तुम्हाला तुमच्या बँक ठेवींमधून ५० हजार रुपये व्याज मिळवण्यावर सुमारे १५ हजार रुपये कर भरावा लागेल. यामुळे तुमच्या हातात फक्त ३५ हजार रुपये येतात. दुसरीकडे, जर तुम्ही हे पैसे बँक ठेवींऐवजी करमुक्त बॉन्डमध्ये गुंतवले, तर त्यातून तुमच्या हातात उरण परतावा येईल, कारण यावर तुम्हाला कोणताही कर भरावा लागणार नाही. कोणत्या बॉन्ड्समध्ये मिळतो चांगला परतावा? करमुक्त बाँड्समध्ये सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या बाँड्सबद्दल बोलायचे झाले तर HUDCO N2 मालिकेत तुम्हाला ८.२% व्याज मिळते, जे दरवर्षी मार्चमध्ये हस्तांतरित केले…

IDFC First Bank आणि IDFC यांचे विलीनीकरण

एचडीएफसी समूहातील जोडगोळीचे अलीकडेच पूर्णत्वाला गेलेल्या विलीनीकरणानंतर भारतीय बँकिंग क्षेत्रात आणखी एका मोठ्या विलीनीकरणाची तयारी सुरू झाली असून, खासगी क्षेत्रातील आयडीएफसी फर्स्ट बँकेत पालक कंपनी आयडीएफसी लिमिटेडला सामावून घेण्याच्या प्रस्तावाला दोन्ही कंपन्यांच्या संचालक मंडळाने सोमवारी सायंकाळी उशिरा संपलेल्या बैठकीत मान्यता दिली. आयडीएफसी फर्स्ट बँकेत होऊ घातलेल्या आयडीएफसी लिमिटेडच्या विलीनीकरणासाठी समभाग विनिमयाचे प्रमाण १०० : १५५ असे निर्धारित करण्यात आले आहे. याचा अर्थ आयडीएफसी लिमिटेडच्या प्रत्येक १०० समभागांमागे आयडीएफसी फर्स्ट बँकेचे १५५ समभाग हे भागधारकांना विलिनीकरणानंतर मिळविता येतील. दोन्ही समभागांचे दर्शनी मूल्य प्रत्येकी १० रुपये आहे, असे आयडीएफसी फर्स्ट बँकेने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. तसेच या विलीनीकरणाचा ग्राहकांवर कोणताही परिणाम…

बीएसईकडून शेअर बायबॅकची घोषणा; ८१६ रुपयांच्या दराने शेअर्स खरेदी !!!

भारतातील आघाडीचा बाजारमंच असलेल्या मुंबई शेअर बाजार अर्थात बीएसईने समभाग पुनर्खरेदीची (बायबॅक) गुरुवारी घोषणा केली आहे. बीएसईने निविदा मार्गाने (टेंडर रूट) ३७५ कोटी रुपये मूल्याच्या समभागांच्या पुनर्खरेदीची मंजुरी दिली. प्रत्येकी ८१६ रुपये किमतीला ही पुनर्खरेदी केली जाणार आहे. बीएसईने यापूर्वी २०१८ सालात १६६ कोटींची आणि २०१९ सालात ४६० कोटींची पुनर्खरेदी करून आपल्या भागधारकांच्या पदरी भरभरून फायदा दिला आहे. बीएसईच्या समभागाच्या गुरुवारच्या ७०५.५० रुपये बंद भावाच्या तुलनेत जवळपास २० टक्के अधिमूल्य भागधारकांना या पुनर्खरेदीतून मिळविता येईल. याआधी कंपनीने सप्टेंबर २०२२ मध्ये एकास दोन समभाग बक्षीस (बोनस) देखील दिले होते. समभाग पुनर्खरेदीअंतर्गत कंपनी शेअरधारकांकडून स्वतःचे समभाग खरेदी करते आणि गुंतवणूकदारांना रोख रक्कम…

खरेदीसाठी काही चांगले समभाग पहा —

सर्वांना नमस्कार, भारतीय शेअर बाजारात आज नव्याने एक उच्चांक स्थापन झाला आहे. अशावेळी अनेकांना कोणते समभाग लॉन्ग टर्म साठी घ्यावेत असा प्रश्न पडतो. बाजार यापेक्षा वर जाईल का?? यापेक्षा खाली आला तर किती खाली येईल? आणि अशावेळी कोणते शेअर्स घ्यावे हे आपल्याला निश्चितपणे समजत नाही यासाठी तज्ञ मंडळींनी विश्लेषण करून पुढील एका वर्षात कोणते shears चांगली पातळी गाठू शकतात ते सांगितले आहे आपल्या माहितीसाठी असे दहा समभाग मी आपल्याला या लेखांमध्ये सांगत आहे.  ॲक्सिस बँक- हा शेअर आता आहे त्यापेक्षा साधारणपणे पुढील वर्षभरात अकराशे रुपये पर्यंत जाऊ शकतो .या बँकेचे आर्थिक परिस्थिती चांगली आहे वसुली आणि  अद्ययावतीकरण चांगले असल्यामुळे यांचा…

End of content

No more pages to load