धन की बात

  आयआयएफएल (इंडिया इन्फोलाइन) ग्रुपने सामान्य व्यक्तीला आर्थिक स्वातंत्र्यासाठी योग्य मार्ग निवडता यावा यासाठी 'आयआयएफएल धन की बात' या वित्तीय ज्ञान प्रदान करणाऱ्या पुढाकाराचे आज अनावरण केले. एका संस्थेद्वारे विनामूल्य आर्थिक ज्ञान प्रदान करणारा हा भारतातील सर्वात मोठा उपक्रम आहे.  आयआयएफएलने  वृत्तपत्र, टेलिव्हिजन, संकेतस्थळ व प्रत्यक्ष कार्याद्वारे २०१८ पर्यंत ५ कोटी लोकांपर्यंत पोहचण्याचे ध्येय ठेवले आहे .सध्या आयआयएफएलची सेवा संपूर्ण भारतात उपलब्ध आहे. आयआयएफएलचे सर्व व्हिडिओ आणि लेखा-जोखा http://dhankibaat.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. यातील तज्ञांच्या मुलाखती झी न्युज चॅनलवर सोमवारी रात्री १० वाजता व शनिवारी दुपारी १.३० वाजता दर्शकांना पाहता येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जन धन योजनेने ३० कोटी भारतीयांना बँकिंग…

अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड

एम्के ग्लोबल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडने  आज एम्के इमर्जिंग स्टार्स फंड हा तिस-या श्रेणीतील अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड (एआयएफ) लाँच केला. सिक्युरिटीज अॅण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया अर्थात सेबीने एम्के इमर्जिंग स्टार्स फंडाला मंजुरी दिली आहे आणि या फंडाचे प्राथमिक उद्दिष्ट भारतीय समभागांत पाच वर्षांसाठी गुंतवणूक करणा-या गुंतवणूकदारांना दीर्घकालीन भांडवली लाभ मिळवून देणे हे आहे. गेल्या साडेचार वर्षांत ईआयएमएलच्या फंड व्यवस्थापन विभागाने २५ टक्क्यांहून अधिक संयुक्त वार्षिक वाढ दराने (सीएजीआर) परतावा मिळवला आहे. एम्के इमर्जिंग स्टार्स फंड हा पाच वर्षांसाठीचा मुदतबंद (क्लोज-एण्डेड) फंड असून दोनशे ते ३०० कोटी रुपयांदरम्यान निधी उभा करण्याचा वायदा यात आहे. बाजारातील भांडवलानुसार क्रमवारी ठरवण्यात आलेल्या १०० कंपन्यांपैकी पहिल्या ३०० कंपन्या ही या फंडांचा गुंतवणुकीची कक्षा (इन्व्हेस्टमेंट…

‘बाय बॅक’ म्हणजे काय ??

इन्फोसिस ही कंपनी आपले समभाग आपणच विकत घेणार आहे . या किंवा अशा प्रकारच्या खरेदीला buy back  म्हणतात. गुंतवणूकदाराला खरेदी केलेला शेअर बाजारामध्ये केव्हाही विकता येतो, पण कंपनीच जेव्हा ते शेअर परत विकत घ्यावयाचे ठरविते त्याला ‘बाय बॅक’ म्हणतात.  कसे केले जाते बाय बॅक? कंपनी एका विशिष्ट किंमतीला, ठरावीक प्रमाणात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे एका विशिष्ट मुदतीत समभाग विकत घायचे ठरविते. जी किंमत ठरलेली असते ती किंमत इच्छुक गुंतवणूकदाराच्या खात्यात जमा होते आणि त्यांच्या डीमॅट खात्यातून ठरलेले शेअर्स वजा होतात. गुंतवणूकदारांनी सर्व शेअर्स बाय बॅक केलेच (परत दिलेच) पाहिजेत असे बंधन नाही. परंतु जर या योजनेखाली शेअर्स विकायचे नसतील तर…

अल्पबचत !!

अजूनही अनेकांचा  पोस्ट ऑफिसच्या योजनेमध्ये गुंतवणूक करून अत्यंत सुरक्षित राहण्याकडे कल असतो .पण NSC , PPF यापेक्षा सुद्धा खाली नमूद केलेली एक चांगली योजना थोडी दुर्लक्षित झालेली जाणवते. सीनियर सिटिझन सेव्हिंग स्कीम (एससीएसएस) व्याजदर : ८.३ टक्के कालावधी : ५ वर्षे टपाल खात्यातर्फे दिली जाणारी आणखी एक लोकप्रिय योजना...या योजनेमुळे निवृत्ती पत्करलेल्यांना उतारवयात चांगले उत्पन्न मिळू शकते. योजनेचा कालावधी पाच वर्षांसाठी असला तरी, त्यानंतर आणखी तीन वर्षे त्यात मुदतवाढ मिळू शकते. योजनेत गुंतवणुकीसाठी दरवर्षीची मर्यादा १५ लाखांची आहे. शिवाय ज्यांचे वय ६० वर्षांपेक्षा अधिक आहे, त्यांनाच योजनेत सहभागी होता येते. ज्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे किंवा सध्या कोणतेही काम करीत नाहीत,…

‘कार्ड पेमेंट’

सणासुदीत ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी 'कार्ड पेमेंट'ची सुविधा दिली जाते. त्यामागे ग्राहकांची सोय व्हावी व विक्रीत वाढ व्हावी, असा दुहेरी उद्देश असतो. 'डेबिट' वा 'क्रेडिट' कार्डद्वारे करण्यात येणाऱ्या खरेदीत 'ईएमआय'चा पर्यायही दिला जातो. मात्र, या पद्धतींचा अवलंब करण्यापूर्वी त्यांची सर्व माहिती करून घेणे आवश्यक आहे. अन्यथा आर्थिक भुर्दंड आणि मनस्ताप होण्याची  शक्यता असते. हे लक्षात घ्याच वस्तू खरेदी करण्यापूर्वी तिची मूळ किंमत आणि कार्ड कंपन्यांद्वारे निर्धारित करण्यात आलेली किंमत यांचा आढावा घ्या. 'ईएमआय'द्वारे वस्तू घेणार असाल, तर मूळ किंमत व व्याजासह आकारण्यात येणारी किंमत यांची तुलना करा. मूळ किमतीमध्ये बराचसा फरक पडत असेल, तर त्यात व्याज व प्रोसेसिंग फीचा समावेश करण्यात…

पैसे वाचवणारा हा पर्याय

"भीम" ऍप - Bharat Interface for Money.. - By Omkar Dabhadkar गेल्या ३ दिवसांत ३ छोटे बिझनेस इन्कम आणि मुलाच्या ट्रीटमेंटचा एक खर्च झाला. चारही व्यवहार प्रयत्नपूर्वक डिजीटल घडवून आणले. चारीवेळा डिजीटल पेमेंटचा सल्ला देतातच समोरून "ठीके, पेटीएम करूया?" हाच पहिला प्रतिसाद आला. चारीवेळा माझ्याकडून "मी पेटीएम नाही, भीम वापरतो" असं उत्तर गेलं - आणि चौघांनी - "आम्ही भीम वापरत नाही" असं सांगितलं. पेटीएम आणि भीम मधले फार महत्वाचे फरक लोकांना माहिती नसल्याचा हा परिणाम आहे. फरक माहित नसल्याने लोकांचं नुकसान होत आहे. पेटीएम हे ई वॉलेट आहे. आपण त्याद्वारे व्यवहार करतो तेव्हा पेटीएम करन्सीमध्ये व्यवहार होतात. परंतु ती करन्सी…

द्या अनोखी दिवाळी भेट !!

This Diwali you can gift happiness to the less fortunate by contributing to St Jude India Childcare Centre's, with whom UTI MF has a tieup. St Jude India Childcare Centre look after children suffering from cancer. 'UTI Canserve' facility is available under UTI Mastershares, UTI Balanced Fund & UTI Spread ( Arbitrage Fund) Fund and you can choose to contribute 50% or 100% of the dividend amount to this charity. You may also like to start a SIP under this option... All contribution to St Jude India Childcare Centre's will be eligible for tax benefits under Section 80 G of…

ओहो !! विसरलो!!!!

अजाणतेपणी आपल्याकडून काही देयके व कर्ज हप्ते भरणे विसरले जाते व त्यापायी खूप नुकसान होऊ शकते , ते टाळण्यासाठी इसीएस अथवा फोन रिमाइंडर आदी सुविधा उपलब्ध आहेत. पण हेही करणे राहून गेल्यास काय नुकसान होऊ शकते ते पाहू . निर्धारीत तारखेला इन्शुरन्स प्रीमियम भरण्याचे लक्षात आले, नाही तर मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. अशावेळी कंपनीकडून साधारणतः १५ ते ३० दिवसांची अतिरिक्त मुदत देण्यात येते. मात्र, त्यानंतरही प्रीमियम भरण्याचे राहून गेल्यास पॉलिसी रद्दबातल होण्याची शक्यता असते. पॉलिसी रद्द होऊन ​जितका काळ लोटला आहे, तितका अधिक प्रीमियम भरावा लागण्याची शक्यता आहे. अतिरिक्त कालावधी उलटून गेल्यानंतर पॉलिसी पुन्हा सुरू ठेवायची असेल,…

‘सिबील’ चा अहवाल म्हणजे काय ??

क्रेडिट स्कोअर क्रेडिट स्कोअर तुमची कर्ज घेण्याची पात्रता ठरवितो. आपण कोणतेही कर्ज घेण्यापूर्वी जसे बँका आपल्या काही गोष्टींची तपासणी करतात. जसे की, मिळकत, गहाण ठेवण्यात येणारी मालमत्ता इत्यादी. त्याच प्रकारे आपण पूर्वी घेतलेल्या कर्जाची परतफेड योग्य वेळी केली आहे किंवा नाही, तसेच सगळे हप्ते वेळेवर भरले अथवा नाही, याची सविस्तर माहिती बँकांजवळ उपलब्ध असते. या माहितीनुसार तुमची कर्ज घेण्याची पात्रता ठरविली जाते. ही माहिती काही ठरावीक संस्थांमार्फत बँकांना देण्यात येते. त्यांना क्रेडिट रेटिंग एजन्सी असे म्हणतात. त्यापैकी सर्वात जुनी व नावाजलेली संस्था म्हणजे ‘सिबील’ ही आहे. क्रेडिट स्कोअर कोणत्या बाबींवर ठरविला जातो ? क्रेडिट स्कोअर देताना क्रेडिट रेटिंग एजन्सी बऱ्याच…

बँकेला सहकार्य

बँक खातेदारांनी हे करावे – एसएमएस alert साठी नोंदणी करावी. कोणताही अनधिकृत व्यवहार आढळून आल्यास त्वरित बँकेला त्याची माहिती द्यावी. बँकेचा टोलमुक्त क्रमांक, ई-मेल आपल्याजवळ कायमचा नोंदवून ठेवावा. केवायसी प्रक्रिया पूर्ण असेल तर तुम्ही बँकेचा कोणताही व्यवहार करा, एटीएममधून पैसे काढा, क्रेडिट कार्डाचे पेमेंट करा किंवा धनादेश जमा करा तुम्हाला बँकेकडून तत्काळ एसएमएस येतो. यामुळे आपल्या नावे कोणी व्यवहार करत असेल तर ते ओळखणे सोपे जाते. त्यासाठी बँकेला सहकार्य करून केवायसी पूर्ण करणे गरजेचे आहे. पिन , OTP सांगण्याची घोडचूक करू नये !!

End of content

No more pages to load