उद्दिष्टे ठरवा !!

आपणास माहीतच आहे की, महागाई ही नेहमीच वाढत असते, दरवर्षी ती सरासरी ७ टक्के दराने वाढते आहे. हे गृहीत धरले तर ४० वर्षांनंतर आपणास दैनंदिन सुखी जीवनासाठी हवी असणारी रक्कम आताच्या तुलनेत ७ पट अधिक असायला हवी. वैद्यक शास्त्रामधील लक्षणीय प्रगतीमुळे भारतीय लोकांचे आयुष्यमान हे सरासरी वाढताना तर दिसते पण दुसरीकडे नवनवीन आजार डोकी वर काढत आहेत आणि त्यामुळे उपचाराचे खर्च वाढताना दिसतात. ते नजीकच्या भविष्यकाळात कमी होण्याची शक्यताही नाही. स्वत:च्या निवृत्तीनंतरच्या सुखी व स्वावलंबी दिवसांसाठी आर्थिक नियोजन करणे ही आजच्या काळाची गरज असून मुख्य म्हणजे हे आता आपल्याला कळू लागले आहे. पण तरीही आपण जी सरासरी बचत करतो त्यातून…

खरेदी करताना —

घर, कार, इलेक्ट्रॉनिक्स अशी महागडी खरेदी करताना आपण प्रचंड संशोधन करतो. मग, इन्शुरन्स पॉलिसी ही तिसऱ्या क्रमांकाची सर्वात महागडी खरेदी करण्याच्या बाबतीत संपूर्ण प्रक्रिया एजंटवर सोपवून आपण  बहुतांशी  निश्चिंत राहतो !! आपल्यापैकी बहुतांश जण, %परतावा, खात्री व वन टाइम पेमेंट% असे शब्द ऐकले की तातडीने हा  अर्ज तुम्हीच भरा आणि सहा कुठे करायची तेवढे फक्त सांगा, असे म्हणतात. परिणामी, आपल्यासाठी चुकीची असलेली किंवा अत्यंत वाईट असलेली, तसेच आपल्याला गरजेची नसलेली इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करण्यामध्ये आपले कष्टाने मिळवलेले पैसे वाया जातात.  आपले दुर्लक्ष होत असल्याचा फायदा घेणाऱ्या आणि आपण कष्टाने मिळवलेल्या पैशांची फसवणूक करणाऱ्या एजंटच्या जाळ्यात आपण अडकू शकतो. या किचकट…

सीमोल्लंघन !!

उद्दिष्टे व गुंतवणूक आपण कोठेही आर्थिक गुंतवणूक करताना सर्वप्रथम कोणत्या उद्दिष्टासाठी गुंतवणूक करायची आणि किती काळ करायची ते ठरवणे महत्त्वाचे आहे. हे झाल्यावर या उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यासाठी आजच्या घडीला नेमका किती खर्च येणार आहे याचा अंदाज घ्यावा. त्यामध्ये महागाईची रक्कम मिळवावी. या उद्दिष्टासाठी तुम्ही नेमकी किती बचत करू शकाल, याचा अंदाज घ्यावा. या बचतीसाठी तुम्ही एकतर एसआयपी वापरू शकता किंवा एकगठ्ठा रक्कम गुंतवू शकता. याशिवाय एकगठ्ठा व एसआयपी अशा दोन्ही प्रकारे गुंतवणूक करू शकता. एकदा तुमची उद्दिष्टे ठरली की त्यापर्यंत जाण्यासाठी योग्य फंड कोणते आहेत याचा मागोवा सल्लागारामार्फात घ्यावा. उदाहरणार्थ, तुम्ही परदेशी सुटी घालवण्याचा विचार करत असाल आणि त्यासाठी पाच लाख…

नवीन फंड केव्हा घ्यावा ?

 आपल्या फ़ोलिओमध्ये नवीन फंडाचा समावेश करताना समान गुंतवणूक रणनीती असलेले फंड टाळणे हिताचे आहे . उदाहणार्थ, आदित्य बिर्ला सनलाइफ फ्रंटलाईन इक्विटी फंड असेल तर फ्रॅकलीन इंडिया ब्लूचीप फंडाचा समावेश करणे योग्य होणार नाही. किंवा गुंतवणुकीत आधीपासून एखादा डायनॅमिक बॉंड फंड असेल तर दुसरा डायनॅमिक बॉंडचा समावेश करण्यापेक्षा opportunity फंडाचा समावेश करणे योग्य धोरण आहे. वाढत्या वयानुसार जोखीम स्वीकारण्याची क्षमता कमी होते. आधी रोखे व समभाग गुंतवणुकीचे प्रमाण ५०:५० असेल तर आता ते ६०:४० करण्याची आवश्यकता आहे. अतिरिक्त उपलब्ध झालेली रक्कम समभाग गुंतवणुकीऐवजी रोखे गुंतवणुकीसाठी वापरणे योग्य ठरते. अथवा समजा समभाग गुंतवणुकीने चांगला परतावा दिल्याने हे गुणोत्तर पूर्वपदावर आणण्यासाठी नवीन गुंतवणूक…

फंड व्यवस्थापक

गुंतवणूकदारासाठी फंड व्यवस्थापक कसे काम करतो? कंपनीची मूल्ये बदलल्यास किंवा तिच्या व्यवसायात काही बदल झाल्यास त्या कंपनीच्या भागांना फटका बसू शकतो. वैयक्तिक गुंतवणूकदाराचा विचार केल्यास, त्याच्याकडे त्याने खरेदी केलेल्या समबागाची वाटचाल कशाप्रकारे होत आहे हे पाहण्यास वेळ नसतो. अशा वेळी बाजारातील विचारांचा प्रभाव पडून गुंतवणूकदार निर्णय घेण्याची शक्यता असते. परंतु म्युच्युअल फंडांकडे तज्ज्ञ फंड व्यवस्थापक असतात, जे प्रत्येक कंपनीच्या वाटचालीवर नियमितपणे लक्ष ठेऊन असतात. त्यामुळे फंड व्यवस्थापक कोणत्याही कंपनीचे भाग एकदम खरेदी करत नाही. प्रत्येक फंड व्यवस्थापकाला प्रत्येक समभागामध्ये किंवा प्रत्येक क्षेत्रात किती रक्कम गुंतवावी याचे बंधन असते. याचा दीर्घकाळात फायदा होतो.  म्युच्युअल फंड किती रोकडसुलभ (लिक्विड) असतात? प्रत्येक भाग…

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती वॉरन बफे…..

१. त्यांनी वयाच्या अवघ्या अकराव्या (११) वर्षी शेअर बाजारात गुंतवणुक करण्यास सुरुवात केली. आणि तरी देखिल आपण खुप उशीरा सुरुवात केली याची त्यांना खंत आहे. २. वृत्तपत्रे विकुन मिळवलेल्या कमाईतून त्यांनी एक छोटीशी शेत जमीन विकत घेतली. वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी. ३. ते आजही मिड टाउन येथील त्यांच्या जुन्या ३ बेडरूमच्या घरात राहतात, जे त्यांनी ५० वर्षांपुर्वी त्यांच्या लग्नाच्या आधी घेतले होते. वॉरन बफे यांच्या मते त्यांना मोठ्या घराची गरज नाही. आजही त्यांचा घराला कुंपणाची भिंत नाही. ४. वॉरन बफे त्यांची कार स्वतःच चालवतात. त्यांना ड्रायव्हर अथवा सुरक्षारक्षकांची गरज नाही. ५. वॉरन बफे जगातील सर्वात मोठ्या विमान कंपनीचे मालक आहेत.…

Mr Investor Ko gussa kyon aata hai

Sonal reached the dispensary in the morning. She was feeling rather unwell. The receptionist informed her that the appointment was for the evening. There had an argument and showdown over this and finally Sonal decided not only to return home but take self medication. By next morning her condition had worsened and she had to be admitted to the hospital. This is a story of scores of investors who knock the doors of the economy but do not participate just because they get into an argument with the gate keeper, Mr Market. Mr Market is unpredictable and volatile in nature.…

लाभांश म्हणजे काय?

लाभांश म्हणजे काय? म्युच्युअल फंड त्याला मिळालेल्या नफ्यातून आपल्या गुंतवणूकदारांच्या युनिटवर लाभांश घोषित करतो. एखाद्या योजनेला मिळालेला नफा याचा अर्थ त्या योजनेतील साधनांची खरेदीपेक्षा अधिक दराने केलेल्या विक्रीतून आलेली कमाई किंवा त्या साधनांवर मिळालेला लाभांश किंवा (डेट फंडांच्या बाबतीत) मिळालेले व्याज होय. साधनांतून मिळालेला परंतु फंडात प्रत्यक्ष जमा न झालेल्या नफ्याचा उपयोग मात्र लाभांशासाठी करता येत नाही. हा नफा एनएव्हीमध्ये मिळवला जातो. याचा काही भाग म्युच्युअल फंडाकडून लाभांश म्हणून घोषित केला जातो. अर्थात, हा पैसा पुन्हा त्याच योजनेत खेळवून त्यापासून नवे शेअर्स किंवा डेट साधने खरेदी करण्याचा पर्याय त्या योजनेच्या फंड व्यवस्थापकाकडे असतो. म्युच्युअल फंड दैनंदिन, मासिक, तिमाही किंवा वार्षिक…

वापरा – free look period

काही वेळा ग्राहक नवी पॉलिसी खरेदी करतात आणि त्यातील नियम व अटी त्यांना अपेक्षित असलेल्या नसल्याचे त्यांच्या लक्षात येते. पूर्वी, ग्राहकांसमोर या चुकीच्या निर्णयाचे परिणाम सहन करण्याशिवाय अन्य पर्याय नव्हता. परंतु, 'आयआरडीए'ने ग्राहकांच्या सोयीसाठी केलेल्या तरतुदीमुळे आता या प्रश्नावर उपाय मिळाला आहे. आयआरडीए मार्गदर्शक तत्त्वांनुसार, इन्शुरन्स कंपन्यांनी ग्राहकांना योजना दिल्यानंतर फ्री लूक पिरिएड पुरवणे आवश्यक आहे. फ्री लूक हा योजनेचे दस्तावेज मिळाल्यापासून १५ दिवसांचा कालावधी असतो. हा कालावधी ग्राहकांना इन्शुरन्स पॉलिसीचे परीक्षण करण्याचा आणि योजनेत नमूद केलेल्या कोणत्याही अटी वा वैशिष्ट्यांबाबत ग्राहक समाधानी नसल्यास ती योजना न घेण्याचा अधिकार देतो. या कालावधी दरम्यान, योजना रद्द करता येते किंवा त्यातील वैशिष्ट्यांमध्ये…

अचानक धनलाभ !!

कष्टाच्या कमाईबाबत बहुतेकजण सतर्क असतात पण अचानक धनलाभ झाल्यास त्या रकमेचे काय करायचे याबाबत अनेकांचा गोंधळ उडतो. या रकमेचे व्यवस्थित नियोजन करण्यात बरेच जण कमी पडतात आणि हा पैसा हातून केव्हा निघून जातो हे कळत सुद्धा नाही. सर्व पैसा हातून गेल्यानंतर शिल्लक राहतो  पश्चाताप. जगभरात लॉटरी, बोनस, विस्थापनातून मिळालेली भरपाई किंवा अन्य कारणांमुळे अचानक धनलाभ झालेल्या व्यक्तींपैकी एकतृतीयांश लोक काही वर्षांतच कंगाल झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे अचानक हाती पैसा आल्यास त्याचे कसे  चांगले नियोजन करायचे ?  स्व:कष्टातून हाती आलेला पैसा खर्च करताना जेवढी काळजी घेतली जाते. त्या तुलनेत अचानक धनलाभातून हाती येणारा पैसा खर्च करण्यात हात मोकळे सोडले जात असल्याची…

End of content

No more pages to load