पतसंस्थेत अथवा सहकारी बँकेत ठेव ठेवताना —

सहकारी बँकेत किंवा पतसंस्थेत  गुंतवणूक करण्याआधी संबंधित संस्थेची आर्थिक स्थिती  कशी आहे, हे तपासून पाहणे आवश्यक आहे. त्याविषयी अनेकांना माहिती नसते. बँकेच्या अनुत्पादक कर्जांचे प्रमाण (एनपीए), भांडवल पर्याप्तता, नफा आणि ठेवींच्या प्रमाणात कर्जवाटपाचे प्रमाण किती आहे, या चार गोष्टींची माहिती घेतल्याशिवाय कोणत्याहीसंस्थेत गुंतवणूक करू नये. अशा संस्थेचे एनपीएचे प्रमाण दहा टक्क्यांच्या आतच असले पाहिजे. भांडवल पर्याप्तता ही नऊ टक्क्यांपेक्षा अधिक असली पाहिजे. बँकेला मागील तीन वर्षांत नफा झालेला असावा, तर कर्जवाटपाचे प्रमाण (सीडी रेशो) जास्तीत जास्त ७० टक्क्यांपर्यंत असावे. हे चारही घटक योग्य प्रमाणात असतील, तरच ती संस्था  गुंतवणूक करण्यास योग्य आहे असे समजावे. बहुतांश वेळा आपण  ठेवींवरचा व्याजदर पाहून…

सुलभता पहा व अनुभवा !!

म्युच्युअल फंडातील गुंतवणूक एक दिवस ते अनेक वर्षे अशा विविध कालावधीसाठी गुंतवणूक करण्याकरता अनेक प्रकारचे म्युच्युअल फंड उपलब्ध आहेत. वित्त बाजार, सरकारी रोखे (जी-सेक), इक्विटी, हायब्रिड अशा प्रकारांतील म्युच्युअल फंड योजना उपलब्ध असतात. म्युच्युअल फंडांमध्ये किमान ५०० रुपये तर कमाल कितीही गुंतवणूक करता येते. तुम्ही यामध्ये ऑनलाइन, ऑफलाइन, फंड हाउसकडे थेट पद्धतीने किंवा एखाद्या प्रतिनिधीमार्फत गुंतवणूक करू शकता. पैसे काढणे खुल्या फंडांच्या बाबतीत पैसे काढून घेण्यासाठी कोणत्याही कामकाज दिवसात अर्ज करता येतो. असा अर्ज केल्यानंतर तुम्हाला एक ते पाच दिवसांत पैसे मिळू शकतात. म्युच्युअल फंडांच्या काही योजनांमधून तुम्ही दोन लाख रुपयांपर्यंत पैसे वर्षात कोणत्याही वेळी काढू शकता. सुरक्षितपणा म्युच्युअल फंडांच्या…

अच्छे दिन !!

आसाम येथे झालेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत जीएसटी कररचनेत महत्त्वपूर्ण बदलांची घोषणा केली आहे. जेटली यांच्या अध्यक्षतेखाली आणि 24 राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या उपस्थितीत गुवाहटी येथे आज जीएसटी परिषदेची बैठक झाली. त्यानुसार दैनंदिन वापरातील 177 वस्तूंवरील जीएसटी आता 18 टक्के करण्यात आला आहे. जो याआधी 28 टक्के आकारला जात होता. मोदी सरकारच्या या महत्त्वपूर्ण बदलामुळे व्यापारी, व्यावसायिक आणि ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. महिला वर्गाला आजच्या निर्णयाचा विशेष फायदा होणार आहे. कारण जीएसटी दर कमी करण्यात आलेल्या वस्तूंमध्ये डिओ, शॅम्पू आणि सौंदर्य प्रसाधनांचा समावेश आहे. मात्र चैनीच्या गोष्टींवरील जीएसटीचा दर सरकारने 28 टक्के कायम ठेवला आहे. 28 टक्के वस्तुंच्या यादीत तंबाखू, सिगारेट आणि…

गुंतवणूकदार म्हणून आपण —-

गुंतवणूकदार म्हणून आपण आर्थिक विश्वात उतरत असू तर, आर्थिक विश्लेषकांकडून वापरल्या जाणाऱ्या आर्थिक संज्ञांचे ज्ञान आपल्याला असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे आर्थिक संकल्पनाही कळणे गरजेचे आहे. यामध्ये प्रामुख्याने EQUITY , DEBT, PROFIT, LOSS,depreciation या शब्दाबरोबरच गुंतवणुकीच्या  अनेक शब्दांच्या भाषा कळणे  अत्यावश्यक आहे !! यासंदर्भातील काही मुद्दे पहा !! कामकाजातून मिळणारे उत्पन्न आर्थिक अहवालातील हा सर्वात महत्त्वाचा घटक. कंपनीच्या विविध कामकाजांमधून मिळणारा एकूण महसूल या घटकामुळे आपल्याला कळतो. उत्पादन करणाऱ्या व व्यापार करणाऱ्या संस्थांनी केलेली विक्री यातून कळते तर, सेवा देणाऱ्या संस्थाच्या बाबतीत सेवा दिल्याबद्दलचा मोबदला यातून कळतो. या घटकावरून कंपनीचा आकार कळतो. कंपनी दोन प्रकारच्या कामकाजामध्ये सक्रिय असेल तर, त्या प्रत्येक…

कट-ऑफ टाइम

कट-ऑफ टाइम म्युच्युअल फंडात गुंतवणूकदार युनिट खरेदी करतात, युनिट विकून त्यांचे पैसे घेतात किंवा एका योजनेकडून दुसऱ्या योजनेकडे युनिट फिरवतात (स्विच करतात) त्यावेळी या प्रत्येक युनिटची किंमत म्हणजेच निव्वळ मत्ता मूल्य (एनएव्ही) होय. एखादा व्यवहार करण्यासाठी कोणत्या वेळी विनंती करण्यात येते त्यावर त्या युनिटची एनएव्ही अवलंबून असते. एनएव्ही मिळण्याची वेळ म्हणजेच कट-ऑफ टाइम होय. लिक्विड फंड, डेट फंड व इक्विटी फंड यांच्यासाठी कट-ऑफ टाइम वेगवेगळा असतो. लिक्विड फंडांसाठी अन्य फंडांपेक्षा वेगळा कट-ऑफ टाइम असतो. दुपारी दोन वाजेपर्यंत होणाऱ्या गुंतवणुकांसाठी युनिट्सचे वाटप आधीच्या दिवसाच्या एनएव्हीनुसार केले जाते. यामुळे आधीच्या दिवसाची एनएव्ही मिळणारे केवळ लिक्विड फंडच असतात. दुपारी तीन वाजेपर्यंत पैसे काढून…

आर्थिक शिस्तीचे धडे

What are some financial tips that everyone should know?   Avoid buying property on loans as it eats most of your earnings unless you have a clear plan for its repayment. It's important to monitor cash flow. Though, the house will be your asset, your liability will be much more. Start a SIP at a very young age. Try to save atleast 15–25 % of your earnings. Avoid buying a car unless you use it everyday . Do not let this sentence scare you. “Mutual fund investment are subject to market risk. Please read the offer documents carefully before investing”.…

बॅलन्स्ड फंड -अधिक माहिती घ्या !!

बॅलन्स्ड फंड हा हायब्रीड फंडाचा एक प्रकार आहे. हे फंड इक्विटी व डेट अशी मिश्र गुंतवणूक करतात. इक्विटी केंद्रीत बॅलन्स्ड फंडांमध्ये इक्विटीचे प्रमाणा ६५ ते ७५ टक्के असते. उर्वरित गुंतवणूक डेट प्रकारात असते. निव्वळ इक्विटी फंडाच्या तुलनेत यांचे जोखमीचे प्रमाण कमी असते. म्युच्युअल फंडांत प्रथमच गुंतवणूक करणाऱ्यांना बॅलन्स्ड फंडात गुंतवणूक करण्याचा सल्ला  व्यवस्थापक  देतात. कार्यपद्धती यामधील इक्विटी हा घटक दीर्घकालीन परतावा देतो तर डेट घटक तुमच्या पोर्टफोलिओला स्थैर्य देतो. यामुळे इक्विटी किंवा डेट यापैकी कोणालाही भांडवल बाजार घसरण्याता फटका बसला तरी गुंतवणूकदारांना जोखीम उचलावी लागत नाही. बाजार वरच्या दिशेने वाटचाल करत असताना फंड व्यवस्थापकांना कमाल पातळी स्थिर ठेवण्यासाठी इक्विटी विकावी…

कसा असावा सल्लागार ?

अनेक गुंतवणूकदारांना स्वतःच्या उत्पन्नाविषयी, आर्थिक गरजांविषयी अनेक जणांशी बोलायला आवडत नाही. ही त्यांची वैयक्तिक बाब असल्याने त्यांना संकोच वाटतो. त्यामुळे ही वैयक्तिक बाब सार्वजनिक न करता आर्थिक गरजांविषयी योग्य मार्गदर्शन करणारा सल्लागार त्यांना हवा असतो. अशावेळी पक्षपात न करता सल्ला देणारा वित्त सल्लागार निवडावा. तुमचा पैसा ज्याच्या हाती तुम्ही सोपवणार आहात तो वितरक सहजगत्या उपलब्ध असावा. तुमच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे लवकरात लवकर त्या सल्लागाराने किंवा त्यांच्या चमूने द्यायला हवीत. ही उत्तरे देताना तुम्ही ईमेल, फोन कॉल, एसएमएस असे जे संपर्क माध्यम निवडले आहे, त्याला तो सल्लागार सरावलेला असावा. आर्थिक जगात वेळेला सर्वोच्च महत्त्व असते. त्यामुळे तुमच्या गुंतवणुकीचे निर्णय त्याने चटकन…

नव्याने कर्ज घेणाऱ्या ग्राहकांचा फायदा

भारतीय स्टेट बॅंकेने कर्जदरात (एमसीएलआर) 0.05 टक्‍क्‍याची किरकोळ कपात केली आहे. दहा महिन्यांत पहिल्यांदाच बॅंकेने "एमसीएलआर"चा दर घटवला असून एक वर्षासाठी तो 7.95 टक्के झाला आहे. हा दर 1 नोव्हेंबरपासून लागू करण्यात आल आहे. एसबीआयच्या या निर्णयामुळे नव्याने कर्ज घेणाऱ्या ग्राहकांचा फायदा होणार आहे.

NPS मध्ये बदल !!

केंद्र सरकारने ‘राष्ट्रीय पेन्शन प्रणालीबाबत (एनपीएस) महत्त्वाची घोषणा केली आहे. आता एनपीएसमध्ये वयाच्या पासष्टीपर्यंत गुंतवणुकीची मुभा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने घेतला आहे. याचा आता बिगर सरकारी आस्थापनांतील कर्मचारी, खासगी आणि अनौपचारिक क्षेत्रातील पगारदार तसेच स्वयंरोजगार करणाऱ्यांना निवृत्तीनंतर नियमित निवृत्तीलाभासाठी ही योजना फायदेशीर ठरणार आहे. ‘एनपीएस’ योजनेसाठी वयोमर्यादा किमान 18 ते 60 वर्षापर्यंत असते. आता पेन्शन निधी नियामक व विकास प्राधिकरण (पीएफआरडीए)ने घेतलेल्या निर्णयानुसार आता 65 व्या वर्षांपर्यंत ‘एनपीएस’मध्ये गुंतवणूक करता येणार आहे.

End of content

No more pages to load