नतमस्तक होऊया !!

गेल्याच आठवड्यात भारतीय काॅर्पोरेट जगतातल्या एका दाम्पत्याने आपली निम्मी मालमत्ता (कोट्यवधीची) समाजाला परत करण्याची शपथ वाहिली. नंदन निलेकणी, इन्फोसिसच्या संस्थापक सदस्यांपैकी एक, जे नुकतेच इन्फोसिसच्या कसोटीच्या वेळी नॉन एक्‍झिक्‍युटिव्ह चेअरमन म्हणून इन्फोसिसमध्ये परत आले. त्यांनी आणि त्यांच्या पत्नी रोहिणी हे ‘देतं व्हा!’ व्रत स्वीकारत बिल गेटस्‌ आणि वॉरन बफे यांच्या दिंडीत सामील झाले. जगातल्या २१ देशांमधील १७१ दानशूर कर्णांच्या या यादीत भारतातील विप्रोचे अझीम प्रेमजी, बायोकॉनच्या किरण मुजुमदार-शॉ, शोभा डेव्हलपरचे पीएनसी मेनन, यानंतर निलेकणी दाम्पत्याचा चौथा क्रमांक येतो. कदाचित यातून स्फूर्ती घेऊन भारती एअरटेलच्या मित्तल कुटुंबीयांनीही स्वतःची ७००० कोटींची मिळकत समाजाच्या कल्याणासाठी सुपूर्द केली आहे. या सर्वांच्या प्रति आपण नतमस्तक…

विक्रेत्यांपासून सावधान !!

घर, कार, इलेक्ट्रॉनिक्स अशी महागडी खरेदी करताना आपण प्रचंड संशोधन करतो. मग, इन्शुरन्स पॉलिसी ही तिसऱ्या क्रमांकाची सर्वात महागडी खरेदी करण्याच्या बाबतीत संपूर्ण प्रक्रिया एजंटवर सोपवून आपण इतके बिनधास्त कसे काय राहतो? केवळ tax वाचविणे हाच उद्देश ध्यानी घेवून policyची खरेदी करू नका!! इन्शुरन्स पॉलिसीचे मिस-सेलिंग होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे एजंटांवर प्रचंड विश्वास ठेवला जातो. एजन्सीसोबत दीर्घकाळ नाते, एजंट संभाव्य ग्राहकांचे नातेवाईक असणे अशा काही कारणांमुळे भारतात लोकांना विमा योजना खरेदी करण्याबाबत विचारणाऱ्यांना नकार देण्यात संकोच वाटतो. ग्राहक म्हणून आपण ज्या प्रपोजल फॉर्मवर सही करतो तो कागद अत्यंत महत्त्वाचा असतो, कारण त्यावरून आपली योजना एकतर जारी केली जाते किंवा…

मिळकत वाढवा !!

पैशाच्या वाटा मुख्य दोन प्रकारच्या असतात. येणाऱ्या पैशांच्या आणि जाणाऱ्या पैशांच्या. बहुतेक वेळा येणारे पैसे एकाच मार्गाने येत असतात; मात्र जाणाऱ्या पैशांना अनेक वाटा असतात. अशा वेळी येणारे पैसेदेखील एकापेक्षा जास्त मार्गाने कसे येऊ शकतील, याचा विचार केला पाहिजे. साधारणतः प्रत्येकाचे पैसे बऱ्याचदा बॅंकेच्या बचत खात्यात किंवा मुदत ठेवीत असतात. जोपर्यंत ठेवींवरील व्याजाचा दर 9-10 टक्के होता, तोपर्यंत फारसा प्रश्‍न नव्हता. पण आता या व्याजदरात बरीच घसरण होऊन ते 6 ते 7 टक्‍क्‍यांवर आले आहेत. बचत खात्यावरदेखील जेमतेम 4 टक्के व्याज मिळते. अशा वेळी बॅंकेत पैसे ठेवणाऱ्यांनी आपले व्याजाचे उत्पन्न, मुद्दल न वाढविता कसे वाढविता येईल, याचा विचार केला पाहिजे.…

लक्षात असुद्या !!

सध्या बाजारात अनेक NFO वेगवेगळे investment प्लान घेवून आले आहेत , तसेच डिसेंबर नंतर करबचतीच्या अनेक योजना येतील पण गुंतवणूकीपुर्वी खालील बाबी पाहणे , तज्ञ सल्लागाराचा सल्ला घेणे केव्हाही चांगले आहे !! महत्त्वाचे मुद्दे गुंतवणूक ही सर्वासाठी महत्त्वाची आहे. इथे स्त्री, पुरुष, अविवाहित, विवाहित, घटस्फोटित, एकेरी पालक, तरुण, मध्यमवयीन, वयस्क असा काही भेदभाव नसतो. खूप वाचन करा आणि स्वत:ला आर्थिक नियोजनात हुशार करा. इंटरनेटवर खूप माहिती आहे. योग्य प्रश्न विचारला की उत्तर सापडते. सल्ला घ्या, पण सर्व शंकांचे समाधान झाल्यावरच त्यावर अंमल करा. एकाचा सल्ला दुसऱ्यासाठी लागू पडेल असे नेहमीच होत नाही. पैशाकडे लक्ष द्या, आपल्या मुलाकडे देता तसे. आपला…

वाचा ! विचार करा !! आणि निर्णय घ्या !!!

  मुदत ठेव आणि विमा योजना ही भारतीय गुंतवणूकदारांची आवडती गुंतवणूक साधने आहेत. सेवा निवृत्तीनंतर मिळालेली पूंजी ही बँकेच्या मुदत ठेवींपेक्षा अर्धा ते एक टक्का अधिक व्याज दर असलेल्या गुंतवणूक साधनात गुंतविली की गुंतवणूकदारांचा आणि मुख्यत्वे ज्येष्ठ नागरिकांना कृतकृत्य झाल्यासारखे वाटते. निश्चित परतावा आणि एक लाखापर्यंतच्या बँक ठेवींना संरक्षण यामुळे गुंतवणूकदारांचा ओढा हा बरेचदा मुदत ठेवीकडे असतो. पण खात्रीशीर परतावा आणि सुरक्षित मुद्दल ही धारणा वस्तुत: अपसमजातून तयार झालेली आहे. ठेवींसंबंधी या गैरसमजातूनच मग, अर्ध्या टक्क्यापासून ते दोन टक्क्यांपर्यंत अधिक व्याजदराच्या मोहापायी मुद्दल गमावण्याची वेळ अनेकदा या गुंतवणूकदारांवर येते. ज्या गुंतवणूकदारांनी पुणे शहरातील एका प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाच्या मुदत ठेव योजनेत…

‘वित्तीय साक्षरते’चे संस्कार

सुशिक्षित, उच्चशिक्षित आणि सुस्थितीत पोहचलेल्या पालकांची तिसरी पिढी आता देशात आहे. या पालकांकडून मुलांना शिक्षण देताना आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जात आहे. त्यात एक खबरदारी आहे आपल्या लहान मुलांना शिकवताना त्यांच्या आगामी काळात 'वित्तीय साक्षरते'चे (फिनॅन्शियल लिटरसी) संस्कार त्यांच्यावर करणे, म्हणजेच त्यांना 'अर्थसाक्षर' बनविणे. याचाच एक भाग आहे लहान मुलांच्या नावाने बँक खाते उघडणे. आताची लहान मुलांची पिढी लवकरच कम्प्युटर शिकते व तिला वित्तीय जगतातील गुंतागुतींचा लहान वयातच चांगला परिचय होईल. बँक अकाउन्ट उघडून देऊन लहान वयातच मुलांना पैशाच्या व्यवहारांशी परिचय करून देता येईल व त्यांचे सक्षमीकरण ('एम्पॉवरमेन्ट') करता येईल. आतापर्यंत मुलांच्या नावांनी उघडल्या जाणाऱ्या बँक खात्यांवर बरेच निर्बंध…

‘पर्पेच्युअल एसआयपी’ म्हणजे निरंतर एसआयपी

गुंतवणूकदाराला आयुष्यभरासाठी म्युच्युअल फंड ‘एसआयपी’ करता येते का आणि ती कशी केली जाते?  अशी ‘एसआयपी’ करता येते आणि अशा गुंतवणुकीला ‘पर्पेच्युअल एसआयपी’ म्हणजे निरंतर एसआयपी म्हणतात. नेहमीच्या एसआयपी गुंतवणुकीत आपण गुंतवणुकीचा कालावधी निवडतो. उदाहरणार्थ, एक वर्ष, तीन वर्षे, पाच वर्षे आदी. म्हणजेच आपण एसआयपी गुंतवणूक सुरू होण्याची आणि संपण्याची तारीख ठरवतो. परंतु, एसआयपी फॉर्म भरताना एसआयपी संपण्याची तारीख नमूद केली नाही, तर गुंतवणूकदाराला ती एसआयपी बंद करायची नाही, असा अर्थ घेतला जातो आणि ही एसआयपी वर्ष २०९९ पर्यंत सुरू राहते. काही म्युच्युअल फंड कंपन्यांच्या फॉर्ममध्ये ‘पर्पेच्युअल एसआयपी’ असा स्वतंत्र पर्याय असतो आणि इच्छुक गुंतवणूकदार तो निवडू शकतात.  ‘पर्पेच्युअल एसआयपी’ कोणी…

ईएलएसएस योजना काय आहे?

मी अनेक नोकरदार / छोटे व्यावसायिक यांच्याशी कर बचतीसम्बंधात आपण काय करता ? हे विचारतो तेव्हा PPF, NSC, यापेक्षा वेगळे उत्तर मिळत नाही. १००  जणांना विचारतो तेव्हा एखाद दुसरा मनुष्य सुकन्या समृद्धी संबंधात सांगतो ,  पण ELSS ही  म्युच्युअल फंड आधारित योजना अनेकांना समजलेलीच नाही हे जाणवते म्हणून हे वाचाच !! ईएलएसएस योजना काय आहे? ईएलएसएस ही म्युच्युअल फंड योजना आहे. ज्यामध्ये गुंतवणूक केल्यास कर वाचवता येतो. ईएलएसएस फंड पूर्णतः भांडवल बाजारात पैसा गुंतवता, ज्यामुळे दीर्घकालीन गुंतवणुकीत चांगले उत्पन्न मिळवता येते. परंतु, ईएलएसएसमध्ये भांडवल बाजारातील धोके असतात आणि त्यामुळे निश्चित परताव्याची हमी देता येत नाही. ईएलएसएसमध्ये गुंतवणूक कशी करावी? एसआयपीद्वारे…

कोणती काळजी घ्यावी ??

online व्यवहार करताना कोणती काळजी घ्यावी ते थोडक्यात पहा !! पासवर्ड तुमच्या खात्याची माहिती कधीही सेव्ह करू नका, यात खाते क्रमांक, क्रेडिट आणि डेबिट कार्डांचे पिन क्रमांक कधीही मोबाइल, लॅपटॉप किंवा आय-पॅडवर अथवा कार्डाच्या क्व्हरवर सेव्ह करू नका. अनधिकृत वापर टाळण्यासाठी तुमचा फोन नेहमी लॉक असू द्या. तुमचा पासवर्ड सहज ओळखता येणार नाही असा असावा, यात मुळाक्षरे आणि क्रमांक यांचे समीकरण हवे आणि विविध खात्यांना विविध पासवर्ड वापरा. ते लिहून ठेवू नका. तुमच्या ब्राउजरमधून `ऑटो कम्प्लिट' प्रक्रिया काढून टाका. तुमचा कॉम्प्युटर, लॅपटॉप आणि मोबाईलसाठी नेहमी पॉवर ऑन / अॅक्सेस पासवर्ड वापरा तसेच स्क्रीनसेव्हर पासवर्ड वापरा, यामुळे तुमची यंत्रणा तुमच्या परवानगी शिवाय कुणीही वापरू शकणार नाही.  सुरक्षितता…

बालदिन झाला !!

  कालच बालदिन झाला आहे ! बालदिनाच्या निमित्ताने लहानांना काय संदेश द्यावा ह्याचा विचार गेले दोन दिवस मनात होता. पण बालकांना संदेश देण्याऐवजी पालकांनाच संदेश द्यावा असे मनात आल्याने लगेच लिहायला घेतले. नाहीतरी प्रत्येक माणसाच्या मनात एक बालक असतोच ना !! तुमचं मूल अन्य शहरात शिक्षणासाठी जाणार असेल तर त्याला सर्व प्रकारच्या बँकिंग व्यवहारांची सवय आहे ना ते पहा. बँकेची स्टेटमेंट ऑनलाइन वाचता येणे, ऑनलाइन व्यवहार करता येणे, एटीएममधून व्यवहार करता येणे हे सर्व त्याला करता येते का याची शहानिशा करावी. त्याला चित्रपटाचे तिकिटही ऑनलाइन बुक करता यायला हवे! तसेच टॅक्सीसेवाही ऑनलाइन बुक करता यायला हवी. याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे,…

End of content

No more pages to load