उद्दिष्टे ठरवा व साध्य करा !!!

सोबत एक video पाहण्यासाठी जोडत आहे . म्युच्युअल फंडामधून SIP करून आपण आपले एखादे आर्थिक उद्दिष्ट सध्या करू शकतो हे अत्यंत प्रभावीपणे दाखविले आहे. आपणही आपले आर्थिक उद्दिष्ट कसे गाठू यासठी सल्ला हवा असल्यास शेअरखान सावंतवाडी या कार्यालयास किंवा एखाद्या फंड distributor कडे भेटून यासंबंधात चौकशीही करू शकता !!   https://youtu.be/7VfODy77Fn8

शेअरखान तर्फे INSTA MF सुविधा

insta MF presentation by sharekhan शेअरखान या depositary participant तर्फे नव्याने एक सुविधा सुरु झाली आहे . ज्यांची KYC प्रक्रिया पूर्ण आहे त्यांना आता कोणताही म्युच्युअल फंड कोणत्याही कागदी प्रक्रियेशिवाय खरेदी करता येवू शकेल. त्यासाठी एक सोपे power point presentation वर लिंकद्वारे पहाण्यासाठी उपलब्ध केले आहे . त्यामध्ये काही शंका असल्यास आपण केव्हाही ९४२२४२९१०३ या क्रमांकावर विचारू शकता !! धन्यवाद !!

भूलथापाना बळी पडताना —-

आजकाल तुम्हाला २००००० पौंडांची lottery रक्कम मिळणार आहे , तुम्ही अमुक / तमुक form पूर्ण करा व आपले  पैसे घ्या अशा किंवा याहीपेक्षा मोठ्या रक्कमेच्या अमिषाचे लघुसंदेश किवा इमेल आला नाही असा एखादाच सापडेल !! पण या भूलथापाना बळी पडताना ---- या ईमेलना फिशिंग मेल म्हणतात. यामध्ये बव्हंशी लॉटरी लागल्याचे किंवा तुमची निवड बक्षिसासाठी झाल्याचे सांगितले जाते. हे बक्षीस मिळवायचे असेल तर अमुक इतकी रक्कम जमा करायलाही सांगितले जाते. सामान्य लोक या संदेशांना भुलतात आणि आपली सर्व वैयक्तिक माहिती बँक खात्यासह देतात. यामुळे चौरांचे फावते. कदाचित अशा प्रकारे संदेश पाठवणाऱ्यांमध्ये अतिरेकी, आयएस संघटना किंवा स्थानिक चोर यांचा समावेश असतो. या…

‘किसान विकास पत्र’– अधिक माहिती

  'किसान विकास पत्र' ही केंद्र सरकारचे पाठबळ लाभलेली गुंतवणूक योजना आहे. योजनेमध्ये गुंतवणुकीच्या माध्यमातून जमा होणारा निधी केंद्र सरकारच्या विविध विकासकामांमध्ये वापरला जाणार आहे. गुंतवणूकदारांना १०००, ५,०००, १०,००० आणि पन्नास हजार रुपये किंवा त्यापटीत गुंतवणूक करण्याची मुभा आहे. कमाल गुंतवणूक किती असावी, यावर मर्यादा नाही. संबंधित गुंतवणुकीची रक्कम शंभर महिन्यांत (आठ वर्षे चार महिने) दामदुप्पट होईल.  एकदा रक्कम गुंतवल्यानंतर किमान अडीच वर्षे (३० महिने 'लॉक इन पीरिएड') ती काढता येणार नाही. पहिल्या टप्प्यात योजनेची प्रमाणपत्रे केवळ टपाल खात्याच्या माध्यमातूनच मिळणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात ही योजना देशातील सर्वच सार्वजनिक बँकांमध्ये उपलब्ध होईल. योजनेद्वारा जारी करण्यात येणारी प्रमाणपत्रे वैयक्तिक गुंतवणूकदाराच्या अथवा…

ही सोय वापरून तर पहा !!

  बॅंका सहसा फक्त सहा दिवसांपर्यंच्या मुदत ठेवी स्वीकारत नाहीत, परंतु लिक्विड योजनांमध्ये तुम्ही पैसे एक दिवसासाठीसुद्धा ठेवू शकता. तसेच ते एक दिवसाच्या "नोटिसी'मध्ये परत काढता येतात. पैसे थेट बॅंकेत जमा होतात. त्यांचे निव्वळ मालमत्ता मूल्य (एनएव्ही) रोज मोजले जाते, अगदी शनिवार-रविवार आणि सुटीच्या दिवशीसुद्धा. त्यामुळे बहुतेक मोठ्या कंपन्या या योजनांमध्ये शुक्रवारी पैसे ठेवतात व सोमवारी काढून घेतात. कारण शनिवार व रविवार आर्थिक व्यवहार बंद असतात. सध्या या योजनांवर साधारणपणे 7 टक्के व्याज मिळते, जे स्थिर नसून बदलते असते. परंतु योजनांमधील एकही पैसा शेअर बाजारामध्ये गुंतविला जात नाही. तो फक्त "डेट' अर्थात रोखे विभागामध्ये गुंतविला जातो, जो तुलनात्मकदृष्ट्या सुरक्षित असतो.…

म्युच्युअल फंड units दुसऱ्याचे नावे कशी करावीत ?

युनिट्स दुसऱ्याचे नावे कशी करावीत? प्रथम युनिटधारकाचा मृत्यू झाल्यास ते युनिट दुसऱ्या युनिटधारकाच्या नावे करता येते. युनिटधारक एकच असेल तर, त्याच्या मृत्यूनंतर ते युनिट नामांकित व्यक्तीच्या (नॉमिनी) नावे करावे लागते. अशा वेळी दुसऱ्या युनिटधारकाला किंवा नामांकित व्यक्तीला या मृत्यूची माहिती म्युच्युअल फंडाला द्यावी लागते. त्यासोबत युनिटधारकाच्या मृत्यूचे प्रमाणपत्र, केवायसी, एफएटीसीए तपशील तसेच बँक खातेक्रमांकही जोडावे लागते. काही फंडांना दुसऱ्या युनिटधारकाचे किंवा नामांकित (नॉमिनेटेड) व्यक्तीचे बँक तपशीलही लागतात. युनिटधारक जिवंत असेल तर, म्युच्युअल फंड कोणतीही कागदपत्रे विचारणार नाही. परंतु नॉमिनीने या युनिटवर दावा केल्यास त्याला सर्व वैध कागदपत्रे द्यावी लागतील. या सर्व कागदपत्रांबरोबरच नॉमिनीला इन्डेम्निटी प्रमाणपत्रही द्यावे लागते. या प्रमाणपत्राचा नुमना…

‘जुने ते सोने’

बाजारात उपलब्ध असलेले जुने फंड महाग वाटत असल्यामुळे साहजिकच गुंतवणूकदार इतर महत्त्वाच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष करीत नव्या योजनांकडे आकर्षित होतात. अशा वेळी पुढील मुद्दे लक्षात ठेवले पाहिजेत. १) म्युच्युअल फंडाच्या दर्शनी किमतीला स्वतःचे अस्तित्व नसते. ज्या शेअरमध्ये आणि इतर गुंतवणूक पर्यायांमध्ये त्या म्युच्युअल फंडाची गुंतवणूक असते, त्यांच्यातून होणाऱ्या फायद्यावर सर्व काही अवलंबून असते. म्हणूनच जुन्या म्युच्युअल फंडाची किंमत (मूल्य) अधिक असेल, तर तो ‘महाग झाला आहे,’ असे म्हणून टाळणे योग्य नव्हे. २) थोडक्‍यात, फंडाची गुंतवणूक संकल्पना काय आहे, त्याच्याकडे किती मालमत्ता आहे आणि त्या फंडाचे खर्च किती आहेत, या गोष्टीही गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाच्या आहेत. या तीनही निकषांवर जुने फंड सरस ठरताना दिसतात.…

वाचा — एक मत

[12:21 PM, 12/4/2017] +91 90110 68900: This Tsunami will wipe out your money lying in the Banks I now get on with my "banking Armageddon amendment" that is under way. Read the post and all the links that I have provided here and you will understand as to how the "kitchen sink" is thrown at you by this Govt. Banks, the world over, get into problems, when the loans advanced by them are not repaid on time, by the borrowers. When the economy is in a slow-down, many of these borrowers go belly up and become NPAs. Normal banking prudence…

मेहनताना

  भारतात व्यक्तीगत फायनान्स बद्दल बोलायचे झाल्यास आपल्याला दोन समस्या भेडसावतात. १. इक्विटी मार्केट कॅपिटलायझेशनचा ८५% भाग प्रमोटर्स, एफआयआयएस आणि एलआयसी सारख्या संस्थांनी व्यापला आहे. भारताचे अर्थकारण आणि त्याच्या काल्पनिक विकासाची मालकी भारतीयांच्या मालकीचे नाही. २. भारतात लोक स्थिर त्यांचा पैसा स्थिर दरावरच्या लहान बचत योजना, बॅंक डिपॉझिट्स, प्रॉव्हिडंट फंड आणि या प्रकारच्या योजनांमध्ये ठेवण्यात समाधान मानतात. हे सुरक्षित आहे, कारण त्या बचती आहेत. बचती संरक्षण देतात पण गुंतवणूकीपासून प्रगती होते . आपला देश बचत करणा-यांवर गर्व करतो आणि आपल्याला सोन्याची अतिशय आवड आहे. आपण अशा देशात आहोत जेथे लोक चिट फंड्स आणि पॉन्झी योजनांमध्ये त्यांची मूळ रक्कम गमावतात .…

सुंदर संदेश

The Best ever message sent by a Mutual Fund Company to Customer ?? "Think of Mutual Fund as your 3rd Child !! Most families have two children. We spend a lot of money over a 25 year period in educating our children, providing for all their needs, marrying them off in short, getting them well settled in life. I tell you to think of Mutual Fund as your 3rd child. Put in the same amount each year in Mutual Fund that you spend on one child. Do that for the same 25 years. After 25 years, whether your real children…

End of content

No more pages to load