कमी कालावधीसाठी

Short-term debt opportunity In its monetary policy last week, the Reserve Bank held rates steady though it marginally increased inflation projections for the next fiscal year. The policy also noted inflation risks from rising crude oil prices and the Budget-declared crop MSP hikes. With prospects for rate cuts, thus remote and markets building in higher rates, an accrual strategy – which doesn't bet on interest rate direction - can work well now. Shorter-term accrual funds also stand to benefit from interest rate uncertainty. UTI Banking & PSU Debt, HDFC Short Term Opportunities, and Axis Banking & PSU Debt are good…

मौकेपे चौका !!

गुंतवणूक म्हटल्यावर एकतर बँकांमधील मुदतबंद ठेव किंवा थेट शेअर बाजारातील गंतवणूक असे दोन टोकाचे विचार पाहायला मिळतात. मुदतबंद ठेवी सुरक्षित समजल्या जातात. तसेच त्यापासून ठराविक दराने व्याजही मिळते. म्हणजे मूळ गुंतवणूक तशीच राहते व परतावासुध्दा मिळतो. याउलट शेअर्समधील गुंतवणूक जर फारसा विचार न करता केली तर ती धोकदायक ठरू शकते. शेअर्समध्ये होणारे चढउतार इतके मोठे असतात की मूळ गुंतवणूकसुध्दा काही वेळेला परत मिळत नाही तर काहीवेळा काही वर्षांतच दामदुप्पटसुध्दा होऊ शकते. या दोन्ही गुंतवणुकांमध्ये असलेले तोटे कमी करून दोन्हीचे फायदे थोड्याफार प्रमाणात एकत्र करण्यासाठी म्युच्युअल फंड हा एक गुंतवणुकीचा पर्याय म्हणून उपलब्ध आहे. बँकांमधील ठेवींवर मिळणारे मर्यादित व्याज, महागाई, शेअरबाजारातील…

फंडांचा मागोवा

म्युच्युअल फंडाकडून प्रत्येक योजनेची फॅक्टशीट दर महिन्याला प्रसिद्ध केली जाते. त्यावरून तुम्ही तुमच्या योजनेचा तपशील पाहू शकता. ही फॅक्टशीट म्युच्युअल फंडाच्या वेबसाइटवर सहजगत्या उपलब्ध असते. यामध्ये प्रत्येक योजनेचा तपशील, योजनेतील पैसा गुंतवला जात असलेला पोर्टफोलिओ, समभाग यांची माहिती दिलेली असते. यामुळे बेंचमार्कच्या तुलनेत या योजनेची वाटचाल कशी होते आहे, वार्षिक परतावा किती मिळतो आहे आणि स्टँडर्ड डिव्हिएशन, बिटा व शार्पी हे रेशो यांच्याही माहिती मिळते. कोणत्याही म्युच्युअल फंडाच्या योजनेची वाटचाल ही केवळ त्याच योजनेचा इतिहास पाहून ठरवता येत नाही. ही वाटचाल मोजताना तिची तुलना अन्य म्युच्युअल फंडांमध्ये असलेल्या तशाच प्रकारच्या अन्य योजनांबरोबर करणे गरजेचे आहे. प्रत्येक फंडाच्या फॅर्टशीटशिवाय म्युच्युअल फंडांची…

एसआयपी लवचिक असते का?

महिन्याच्या पहिल्या तारखेला १० हजार रुपयांची एसआयपी तुम्ही केली आहे. या तारखेला एसआयपी कापली जात असलेल्या तुमच्या बँक खात्यात पुरेसी रक्कम नसल्यास काय होईल? तुमच्या बँक खात्यात पुरेशी रक्कम नसेल तर एसआयपीसाठी बँकेला म्युच्युअल फंडाकडून करण्यात आलेली विनंती बँकेकडून नाकारली जाईल आणि त्या महिन्यातील तुमची एसआयपी पूर्ण होणार नाही. एसआयपी रद्द झाली किंवा पैसे भरले गेले नाहीत म्हणून संबंधित फंड हाउसकडून कोणताही दंड आकारला जात नाही. मात्र, तुमच्या बँकेकडून ईसीएस (इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सिस्टिम) चुकल्याबद्दल तुम्हाला दंड आकारला जाईल. हा दंड प्रत्येक बँकेनुसार बदलता असतो. तुमची एसआयपी सुरूच राहील आणि पुढच्या महिन्यात पुन्हा एकदा बँकेकडे म्युच्युअल फंडाकडून विनंती केली जाईल. एकामागून…

ग्रोथ फंड व व्हॅल्यू फंड

  ग्रोथ फंड हे ग्रोथ स्टॉक्स खरेदी करतात. या फंडाच्या पोर्टपोलिओमध्ये समाविष्ट कंपन्या शेअर बाजारातील अन्य कंपन्यांच्या तुलनेत वेगाने वृद्धी दाखवतात. अर्थव्यवस्था तिच्या बिझनेस सायकलच्या मध्यात किंवा अंतिम टप्प्यात असते तेव्हा हे स्टॉक्स चांगली कामगिरी करतात. ग्रोथ स्टॉक्स सामान्यतः कमी लाभांश देतात, तसेच प्राइस-टू-अर्निंग्ज, मार्केट कॅपिटलायझेशन-टू-सेल्स व प्राइस-टूबुक व्हॅल्यू या गुणोत्तरांपेक्षा या स्टॉक्सचे मूल्य अधिक असते. ग्रोथ फंड लार्ज कॅप व मिड कॅप स्टॉक्स खरेदी करू शकतात.   ज्या कंपन्यांच्या समभागांची किंमत कमी ठरवलेली असते, परंतु त्या कंपन्यांना चांगले भवितव्य असते, अशा कंपन्यांमध्ये व्हॅल्यू फंड गुंतवणूक करतात. या कंपन्यांच्या समभागांची किंमत सतत कमी राहणार नसते. त्यामुळे या समभागांची किंमत वधारण्यापूर्वी…

ईएलएसएसमधील गुंतवणूक काढू का?

ईएलएसएसमधील गुंतवणूक काढू का? दीर्घकालीन भांडवली लाभावर (एलटीसीजी) कर आकारण्यात येणार असल्यामुळे सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी (पीपीएफ) व युलिप हे करबचत करणारे पर्याय आता ईएलएसएसच्या तुलनेत अधिक कर वाचवणारे (करानुकूल) ठरणार आहेत. ईएलएसएस फंडांतील गुंतवणुकीवर १० टक्के कर लागणार आहे. परंतु त्यामुळे ईएलएसएसमधून लांब पळणे श्रेयस्कर नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. गुंतवणूकदाराच्या पोर्टफोलिओमध्ये प्रत्येक योजनेतील गुंतवणुकीला वेगवेगळे स्थान आहे. इक्विटी आधारित असल्यामुळे ईएलएसएसमध्ये गुंतवणूकदाराला अधिक प्रमाणात उत्पन्न देण्याची क्षमता आहे. त्यामुळे या प्रकारच्या फंडातील गुंतवणूक ही दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी आदर्श मानली जाते. बिनधास्त दीर्घकालीन गुंतवणूक करणाऱ्यांना ईएलएसएसचे अजूनही आकर्षण असते. याचे कारण एलटीसीजीनंतरही पीपीएफ व महागड्या युलिपपेक्षा ईएलएसएसमधून अधिक उत्पन्न मिळते. विमा कंपन्यांकडून…

चिंता कशाला ?

नव्या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर गेल्या 10-12 दिवसांत सर्वसामान्य गुंतवणूकदारांना एका विलक्षण चिंतेनं ग्रासलं आहे आणि ते म्हणजे शेअर व म्युच्युअल फंडांतील गुंतवणुकीसाठी लागू केलेला दीर्घकालीन भांडवली नफ्यावरील 10 टक्के कर! सुमारे 13-14 वर्षांपूर्वी असा कर होताच आणि असाच कर पुन्हा लागू होऊ शकतो, असं गेल्या चार-पाच वर्षांपासून बोललं जात होतं. त्यामुळं फार अघटित घडलं किंवा आभाळ कोसळलं, असं म्हणण्यासारखी परिस्थिती नाही. अर्थसंकल्पातील घोषणेनंतर आपला शेअर बाजार घसरायला लागला तो योगोयोगाने; पण त्याला आपसूकच कारण जोडलं गेलं ते या 10 टक्के कराचं! खरं तर जागतिक, विशेषतः अमेरिकेसारख्या देशांतील शेअर बाजार घसरल्यानंतर आशियाई बाजारही घसरले आणि त्यात भारतही होता इतकंच.…

रोबो अ‍ॅडव्हायझर

रोबो अ‍ॅडव्हायझर म्हणजे काय ? तर वित्तीय सल्ला देणारे माणसानेच बनविलेले एक मशीन. कमीत कमी मनुष्य हस्तक्षेपाशिवाय ते ऑनलाइन व्यासपीठावर सेवा पुरवतात. गुंतवणूक सल्लागाराचे काम हे आपल्या गुंतवणूकदाराची खरी गरज ओळखून निष्पक्ष सल्ला देणे हे आहे. रोबो अ‍ॅडव्हायझरीमध्ये कुठल्याही सल्लागाराचा थेट सहभाग नसल्यामुळे गुंतवणूकदाराला काहीशा कमी खर्चात म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता येते. त्यामुळे वरकरणी हे बरोबर आहे की गुंतवणूकदाराला यामुळे थेट गुंतवणुकीचा फायदा मिळतो. पण खोलात जाऊन याचे विश्लेषण केल्यास याबाबत अधिक माहिती मिळू शकेल. आपण आधी रोबो अ‍ॅडव्हायझर आणि गुंतवणूक सल्लागार यामध्ये फरक करणारी वैशिष्टय़े बघूया. रोबो अ‍ॅडव्हायझर हे आधुनिक आणि ज्याप्रमाणे त्यांना माहिती पुरविली जाते त्याप्रमाणेच प्रमाणित सल्ला…

परवडणारी घरे व जी.एस.टी.

परवडणारी घरे ही सर्वसामान्यांसाठी बांधण्यात येत असल्यामुळे या घरांची विक्री करताना त्यावर वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) आकारू नका, असा स्पष्ट आदेश केंद्र सरकारने सर्व बांधकाम व्यावसायिकांना (बिल्डर) दिला आहे. परवडणाऱ्या घरप्रकल्पांसाठी आठ टक्के जीएसटी सध्या आकारण्यात येत आहे. हा कर बांधकाम व्यावसायिकांना मिळणाऱ्या इनपुट क्रेडिटच्या बदल्यात वळता करून घेतला जाईल, असे आश्वासनही सरकारने दिले आहे. सरकारने याबाबत असे स्पष्टीकरण दिले आहे की, परवडणाऱ्या घरांचे बांधकाम करणाऱ्या बिल्डरांना या घरांची विक्री करताना जीएसटी लावता येईलही. मात्र या घरांचा निर्मिती खर्च दाखवून त्यावर क्रेडिटचा दावा केला असेल आणि त्यानंतर प्रत्यक्ष घराची विक्री किंमत कमी केली असेल, तरच तो आकारता येईल.

शेअर खरेदीसाठी ही चांगली वेळ

शेअर बाजारात गेल्या काही दिवसांत झालेल्या तुफानामुळे गुंतवणूकदारांनी धसका घेतला असला तरी तज्ज्ञांच्यामते शेअर खरेदीसाठी ही चांगली वेळ आहे. अनेक चांगले चांगले शेअर  स्वस्तात उपलब्ध आहेत आणि आत्ताच खरेदी केले तर काही शेअर तर 62 टक्क्यांपर्यंत फायदा देऊ शकतात. विशेष म्हणजे असे काही शेअर्स आहेत ज्यांची किंमत सर्वसामान्यांना परवडणारी म्हणजे 200 रुपयांपेक्षा कमी आहे. जवळपास 13 महिने तेजीत असलेल्या शेअर बाजाराला लागलेला लगाम स्मार्ट गुंतवणूकदारांसाठी पथ्यावर पडणारी गोष्ट असल्याचं काही तज्ज्ञांचं मत आहे. फायनान्शियल एक्सप्रेसने गुंतवणूक तज्ज्ञांच्या दाखल्याने असे काही स्टॉक्स सुचवले आहेत जे 200 रुपयांपेक्षा कमी किमतीला उपलब्ध आहेत आणि तुम्हाला कमी कालावधीत देऊ शकतात भरपूर परतावा… जैन इरिगेशन…

End of content

No more pages to load