इमर्जन्सी फंड–कशासाठी ?
आजच्या युगात जॉब सिक्युरिटीची गॅरंटी कोणीच घेऊ शकत नाही. अलिकडेच चेन्नई येथील नोकिया कंपनीने आपले युनिट बंद केल्याने शेकडो जण बेरोजगार झालेत. त्यामुळे अशी स्थिती उद्भवल्यास सर्वांत मोठा फटका हा आर्थिक आघाडीवरच बसतो. त्यामुळे व्यक्ती कितीही कुशल असली तरी तिला नवी नोकरी मिळविण्यासाठी काही वेळ जाऊ द्यावा लागू शकतो. या काळासाठी आपल्या आर्थिक गणिताची जुळवणी करणे फारच आवश्यक असते. याबाबत आपल्या कुटुंबीयांनाही विश्वासात घेऊन काही पावले उचलणे सहज शक्य आहे, त्याबाबत... इमर्जन्सी फंड 'तहान लागल्यावर विहीर खोदण्यात' काहीच अर्थ नसतो. त्यामुळे अचानक जॉब गेल्याची परिस्थिती उद्भवण्याची शक्यता असो वा नसो आपला व कुटुंबाचा सहा महिन्यांचा खर्च भागेल एवढा इमर्जन्सी फंड…