समज आणि गैरसमज …

इक्विटी म्युच्युअल फंडांतील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संख्येत अलीकडे विक्रमी वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षातसुद्धा गुंतवणूकदारांची संख्या आणि पोर्टफोलिओची संख्या यात वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, शेअर बाजारात अस्थिरता असूनही इक्विटी फंडातील गुंतवणूक वाढली आहे. परंतु म्युच्युअल फंड म्हणजे फक्त शेअर बाजाराशी (इक्विटी) निगडित योजना असा गैरसमज अनेकांच्या मनात दिसून येतो. त्यामुळे बरीच मंडळी म्युच्युअल फंडापासून दूर राहतात. परंतु प्रत्यक्षात असे समजण्याचे कारण नाही. यानिमित्ताने म्युच्युअल फंडाविषयीचे गैरसमज दूर करायचा प्रयत्न करूया. 1) म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्यासाठी डी-मॅट खाते आवश्‍यक अथवा अनिवार्य नाही. काही गुंतवणूकदार केवळ या गैरसमजामुळे म्युच्युअल फंडांच्या चांगल्या योजनांपासून दूर राहतात.   2) बहुतांश लोकांना असे वाटते, की…

online विमा खरेदीचे फायदे

8 smart reasons to buy insurance online! In a 2014 survey named ‘Digital Natives on Protecting Life: Gauging knowledge, attitude and behaviour’, Nielsen interviewed 1000 effluent and high-income respondents from the four major Indian metros. Of these 84% respondents reported to have searched for insurance online and as many as 76% attempted to buy online, while 20% ended up buying. These are early and encouraging signs for the industry that is gearing up for the digital age. When it comes to buying insurance online, here are the top eight reasons that are driving the change: 1.Saves time Since you transact…

म्युच्युअल फंडात गुंतवणूकीचे फायदे

शेअर बाजारातील थेट गुंतवणुकीच्या तुलनेत म्युच्युअल फंडातील गुंतवणूक पुढील फायदे देते.   कमी जोखीम गुंतवणुकीतील विविधता, अनेक गुंतवणूकदारांचा सहभाग, तज्ज्ञ व्यकींनी केलेले आर्थिक व्यवस्थापन यामुळे म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीमधील जोखीम कमी होते. छोट्या गुंतवणूकदारांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बाब ठरते.   विविध क्षेत्रामध्ये गुंतवणूक एका म्युच्युअल फंड योजनेमध्ये गुंतवणूक करून सामान्य गुंतवणूकदार अप्रत्यक्षपणे अनेक क्षेत्रामध्ये गुंतवणूक करण्याचे फायदे मिळवितो. शिवाय यासाठी त्याला किचटक आमि वेळखाऊ प्रक्रियेलादेखील सामोरे जावे लागत नाही.   भावनिक ताणतणावांपासून सुटका शेअर बाजारामध्ये थेट गुंतवणूक करताना अनेक गुंतवणूकदारांना भावनिक ताणतणावांना सामोरे जावे लागते. मात्र, म्युच्युअल फंडातील गुंतवणूकदार कोणत्याही शेअर खरेदी-विक्रीमध्ये प्रत्यक्ष सहभागी होत नसल्याने अशा ताणतणावांपासून तो दूर राहू…

गुंतवणूक करण्यास ही वेळ योग्य आहे?

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना शेअऱ बाजारातील चढ उतारांच्या संदर्भात सर्वसामान्य माणसाच्या मनात काही प्रश्न असतात. अशाच काही प्रश्नांचा वेध घेण्याचा प्रयत्न करूया. प्रश्न : गुंतवणुकीसाठी बाजार खाली येण्याची वाट पाहावी का?  उत्तर : शेअर बाजारात प्रवेश करण्यासाठी अचूक वेळ साधणे खूप अवघड असते आणि म्युच्युअल फंड गुंतवणुकीसाठी अशा "टायमिंग'ची गरजदेखील नसते. त्यामुळे बाजार खाली येण्याची वाट न पाहता शक्‍य तितक्‍या लवकर गुंतवणूक सुरू करणे योग्य ठरेल. गुंतवणूक करताना काय काळजी घ्यावी?  उत्तर : सर्वांत महत्त्वाचे म्हणजे गुंतवणुकीचा कालावधी कमीतकमी पाच वर्षांचा ठेवावा. त्यापेक्षा अधिक कालावधीचा दृष्टिकोन ठेवल्यास अधिक चांगले! शिवाय, बाजार कितीही आकर्षक दिसत असला तरीही आपली सर्व गुंतवणूक म्युच्यअल…

‘एसआयपी’ म्हणजे नेमके काय?

आजकाल विविध माध्यमातून म्युच्युअल फंडाबाबत आणि त्यातील "सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन' (एसआयपी) या संकल्पनेविषयी जनजागृती केली जात आहे. पण या "एसआयपी'विषयी नवगुंतवणूकदारांना फारशी माहिती नसल्याचे लक्षात येते. अगदी थोडक्‍यात सांगायचे झाले, तर "एसआयपी' (सिप) म्हणजे म्युच्युअल फंडातील "रिकरिंग डिपॉझिट'! आपण जसा कॉफीचा "सिप' घेतो, तेवढे ते सोपे आहे! "एसआयपी'च्या माध्यमातून म्युच्युअल फंडात टप्प्याटप्प्याने गुंतवणूक केल्यास, दीर्घकाळात या थेंबाथेंबांमधून संपत्तीचे तळे सहजपणे भरू शकते.   'एसआयपी' कसे करायचे?  पुढील गोष्टी ठरवून आणि एक अर्ज भरून पहिला चेक द्यायचा, त्यानंतर पुढील हप्त्यांची रक्कम "इसीएस'ने आपल्या बॅंक खात्यातून परस्पर वजा होऊन भरली जाते. 1) म्युच्युअल फंडाची योजना, 2) दरमहा गुंतवणूक करण्याची रक्कम, 3) गुंतवणुकीची…

फ्लिपकार्टचा ‘आयपीओ’ चार वर्षांत येणार

प्लिपकार्ट कंपनीची प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) चार वर्षांत केली जाईल, अशी माहिती वॉलमार्टने अमेरिकेतील भांडवली बाजार नियामकांसमोर दिली आहे. वॉलमार्टने १६ अब्ज डॉलरला फ्लिपकार्टमधील ७७ टक्के हिस्सा खरेदी केला आहे. फ्लिपकार्ट कंपनी पुढील चार वर्षांत शेअर बाजारात सूचिबद्ध करण्यात येईल, अशी माहिती वॉलमार्टने अमेरिकेतील भांडवली बाजार नियंत्रक संस्थेला दिली आहे.

योग्य वेळ कोणती?

शेअर बाजारातील सततच्या घडामोडींमुळे सामान्य नागरिकांमध्ये नेहमीच संभ्रम असतो. परिणामी तो गुंतवणुकीपासून दूर असल्याचे दिसून येते. मात्र, सर्वात प्रथम हे लक्षात घेतले पाहिजे की बाजारमध्ये येणारे हे चढ-उतार ही अतिशय सामान्य गोष्ट आहे. बाजार नेहमीच बदलत असतो. परंतु दीर्घकाळामध्ये बाजार सकारात्मक असण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे बाजारातील परिस्थितीचा बाऊ न करता खाली घसरलेला बाजार म्हणजे नवीन गुंतवणूकदारांना कमी पैशांमध्ये जास्त खरेदी तर जुन्या गुंतवणूकदारास आणखी गुंतवणूक करून आपला पोर्टफोलिओ मजबूत करण्यासाठी दिलेली संधी म्हणून बघितले पाहिजे. गुंतवणूक आज की उद्या गुंतवणूकीच नियोजन करताना तुमचे उत्पन्न, खर्च किंवा इतर जबाबदारी इत्यादींचा विचार करून गुंतवणुकीचा निर्णय घेणं अपेक्षित आहे. त्यामुळे वेळेपेक्षा तुमची…

पाचवर्षात १० हजाराचे झाले दोन लाख

पंजाब नॅशनल बँकेतील आर्थिक घोटाळा, अमेरिका-चीनमधील व्यापार युद्ध, शेअर्सवर आकारण्यात येणाऱ्या LTCG टॅक्सवरुन असलेली अस्वस्थतता या सर्व प्रतिकुल परिस्थितीतून भारतीय शेअर बाजार आता बऱ्यापैकी सावरला आहे. मागच्या महिन्याभरापासून भारतीय शेअर्सच्या मुल्यामध्ये सातत्याने वाढ झाली आहे. पाचवर्षांचा विचार करता चीन आणि जपानच्या तुलनेत देशातंर्गत शेअर बाजाराने चांगली कामगिरी केली आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्सच्या मुल्यामध्ये घसघशीत वाढ झाली आहे. रिको ऑटो इंडस्ट्रीज लिमिटेड या वाहन क्षेत्रातील कंपनीच्या प्रगतीपुस्तकावर नजर टाकली तर लक्षात येईल कि, पाचवर्षांच्या आत या कंपनीने गुंतवणूकदारांना दामदुप्पट फायदा मिळवून दिला आहे. रिको ऑटो इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये १८०० टक्के वाढ झाली आहे. पाचवर्षांपूर्वी ४.३ रुपये मुल्य असलेल्या एका शेअरची किंमत…

वयवंदना योजनेचा विस्तार

पंतप्रधान वयवंदना योजनेच्या विस्तार झाला आहे . आतापर्यंत या योजनेची कमाल मर्यादा साडेसात लाख रुपये होती. या निर्णयामुळे ज्येष्ठ नागरिकांना या योजनेमध्ये जास्तीत जास्त १५ लाख रुपये गुंतविता येतील व त्यांना जास्तीत जास्त १० हजार रुपये मासिक पेन्शन (व्याज) मिळेल. ही योजना भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) माध्यमातून कार्यान्वित आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी चालू आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प मांडताना या विस्ताराबाबत सुतोवाच केले होते. मुदत ठेवींचे दर सतत घटते असल्याने आठ टक्क्यांचा निश्चित परतावा देणारी ही योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरक्षित व फायदेशीर गुंतवणूक पर्याय आहे. या योजनेची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे. वयाची अट या योजनेत ६० व त्याहून अधिक वय असलेल्या ज्येष्ठ…

हाउसिंग सोसायट्यांना गुंतवणूकसंधी

साधारणपणे म्युच्युअल फंडात फक्त वैयक्तिक गुंतवणूकदार आणि कंपन्या यांची गुंतवणूक होताना दिसते. गृहनिर्माण सहकारी संस्था आणि ट्रस्ट यांनाही म्युच्युअल फंडात लाभदायी गुंतवणूक करता येते, याची या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना पुरेशी माहिती दिसून येत नाही. महाराष्ट्रात एक लाखापेक्षा जास्त गृहनिर्माण किंवा हाउसिंग सोसायट्या आहेत, ज्यांना महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा १९६० अन्वये आता म्युच्युअल फंडातही गुंतवणूक करता येते. या कायद्यातील अन्य तरतुदींनुसार आणि इंडियन ट्रस्ट ॲक्‍ट १९८२ मधील कलम २० मध्ये गेल्या वर्षी झालेल्या दुरुस्तीनुसार, आता म्युच्युअल फंडातील सर्व प्रकारच्या योजनेत हाउसिंग सोसायट्यांना गुंतवणूक करता येते.  ज्या हाउसिंग सोसायट्यांकडे अतिरिक्त निधी असेल, त्यांनी तो केवळ मुदत ठेवींमध्ये न ठेवता त्यातील काही रक्कम म्युच्युअल…

End of content

No more pages to load