इंडेक्‍स फंड्‌स

इंडेक्‍स फंडांतील गुंतवणूक म्हणजे पैसा कमावण्याचा उत्तम मार्ग, असे गुंतवणूकगुरू वॉरेन बफे सांगतात. आपल्यानंतर आपली सर्व संपत्ती वारसांनी इंडेक्‍स फंडांत गुंतवावी, असेदेखील त्यांनी सांगून ठेवले आहे. अमेरिकी इक्विटी म्युच्युअल फंडांतील एकूण गुंतवणुकीपैकी साधारणतः २५ टक्के हिस्सा इंडेक्‍स फंडांचा आहे आणि ही गुंतवणूक २०२४ पर्यंत ‘ॲक्‍टिव्हली मॅनेज्ड’ इक्विटी फंडांतील गुंतवणुकीलाही मागे टाकेल, असा अंदाज ‘मूडी’ या आंतराष्ट्रीय पतमापन संस्थेने वर्तविला आहे. हे झाले अमेरिकेतील चित्र! भारतात मात्र इंडेक्‍स फंडांतील गुंतवणूक ही एकूण म्युच्युअल फंडांच्या मालमत्तेच्या फारच कमी म्हणजे अवघी ३ टक्‍क्‍यांच्या आसपास आहे. का आहे ही परस्परविरोधी स्थिती आणि काय आहेत हे इंडेक्‍स फंड्‌स? तेच आपण जाणून घेऊ या. व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून…

नियमितपणा महत्वाचा

आपल्या आयुष्यात नियमितपणाचे फायदे किती असतात हे आपण जाणतो. व्यायाम, आहार इत्यादी अनेक बाबींमध्ये नियमित आणि शिस्तीने वागल्यास होणारे लाभ खूप असतात. आणि हा नियमितपणा जर दीर्घ काळ सांभाळता आला तर? अर्थात अनेकपट कमाई! गुंतवणुकीतही हेच तत्त्व लागू पडते. पावसाळा, थंडी, उन्हाळा अशा सर्व मोसमात व्यायाम करणाऱ्याच्या पदरात उत्तम प्रकृतीचे फळ पडते; तसेच नियमित आणि शिस्तीने गुंतवणूक करणाऱ्यांनाही आर्थिक लाभाचे फळ मिळते, असे दिसून येते. आणि अर्थातच फक्त थोड्या दिवसांसाठी हे न करता अनेक वर्षे ही गुंतवणूक केल्यास होणारा लाभ लक्षणीय असतो. भारतीय गुंतवणूकदार हा खूप लाभ थोड्या काळात मिळण्याची अपेक्षा करतो. त्यामुळे जास्त मुदतीसाठी (बॅंक मुदत ठेवी सोडून) भांडवल…

एचडीएफसी बॅंकेचे नवे डिजीटल कर्ज फक्त तीन मिनिटांत!!!!!!!!!

एचडीएफसी बॅंकेने नवीन प्रकारचे डिजीटल कर्ज देण्याची योजना आणली आहे. ग्राहकांकडे असलेल्या म्युच्युअल फंडाच्या आधारावर हे डिजीटल कर्ज त्वरित दिले जाणार आहे. या योजनेचे नाव डिजीटल लोन अगेन्स्ट म्युच्युअल फंड (एलएएमएफ) असे असणार आहे.   ग्राहकांकडे असलेल्या म्युच्युअल फंडाच्या युनिस्टना तारण ठेवत अवघ्या तीन मिनिटात कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन असणार आहे. कॉम्प्युटर एज मॅनेजमेंट सर्व्हिसेस अर्थात सीएएमएसशी संलग्न असलेल्या म्यु्च्युअल फंडाच्या संदर्भातच  हे कर्ज मिळणार आहे. सीएएमएस मु्ख्यत्वे म्युच्युअल फंड धारकांच्या पोर्टफोलिओचे व्यवस्थापन करते.    म्युच्युअल फंडाच्या आधारावर मिळणाऱ्या कर्जासाठी ग्राहकांना सर्वसाधारणपणे पाच ते सहा दिवस लागतात. या डिजीटल कर्ज योजनेमुळे आता फक्त तीन…

म्युच्युअल फंड युनिट्‌सवर एचडीएफसी बॅंक देणार कर्ज

एचडीएफसी बॅंकेने म्युच्युअल फंड युनिट्‌सवर डिजिटल कर्ज देणारी योजना बुधवारी सादर केली. फंड युनिट्‌सवर डिजिटल लोन ही बॅंकिंग व्यवस्थेतील पहिलीच संकल्पना आहे. एचडीएफसी बॅंकेच्या खातेदारांना ही सुविधा मिळणार असून, फंड व्हॅल्यूवर कर्जाची रक्कम ठरवली जाईल. फंड व्यवस्थापनातील ‘सीएएमएस’ या कंपनीशी बॅंकेने भागीदारी केली असून, दहा आघाडीच्या म्युच्युअल फंड कंपन्यांच्या इक्विटी आणि डेट फंडांवर कर्ज मिळेल. गेल्या वर्षी बॅंकेने सिक्‍युरिटीजवर कर्ज देणारी योजना आणली होती. आता त्याच धर्तीवर म्युच्युअल फंड युनिट्‌सवरदेखील बॅंक खातेदारांना तात्काळ कर्ज मिळणार आहे.

गुंतवणूक संधी—-

बरोडा पायोनियर ऍसेट मॅनेजमेंट कंपनीने डेट फंडातील 'बरोडा पायोनियर अल्ट्रा शॉर्ट ड्युरेशन फंड' नावाने नवीन योजना गुंतवणुकीसाठी बाजारात सादर केली आहे. डेट ओपन एंडेड प्रकारातील योजनेचा एनएफओ (न्यू फंड ऑफर) २४ मे पासून ते २९ मे पर्यंत उपलब्ध असणार आहे. योजनेचा एनएफओ खरेदी करण्यासाठी कमीत कमी ५००० रुपयांची गुंतवणूक बंधनकारक आहे.    नवीन योजना ३ ते ६ महिन्यांच्या गुंतवणूक कालावधी असलेल्या रोख्यांमध्ये गुंतवणूक करणार आहे. या योजनेतीळ गुंतवणूक प्रामुख्याने सरकारी व कॉर्पोरेट  सिक्युरिटीज मध्ये गुंतवले जाणार आहेत. ऍसेट अलोकेशनच्या मर्यादेत राहून टी- बिल्स, कमर्शिअल पेपर्स, कॉर्पोरेट रोखे अशा मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट्‌समध्ये योजनेचे व्यव्थापन केले जाणार आहे. या नवीन योजनेसाठी एन्ट्री…

विस्तारित “मुद्रा” योजना !!

केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुद्रा कर्ज योजनेला आता खासगी कंपन्यांचे बळ मिळणार आहे. या योजनेचा अधिकाधिक विस्तार व्हावा व सर्वसामान्य व्यावसायिकांपर्यंत ती सहज पोहोचावी या हेतूने ४० खासगी कंपन्या वा आर्थिक संस्थांशी केंद्र सरकार हातमिळवणी करणार आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने ही माहिती दिली. केंद्र सरकारने आठ एप्रिल २०१५पासून मुद्रा योजना सुरू केली असून त्या अंतर्गत बिगर कृषी, बिगर व्यावसायिक गटातील लघू उद्योजकांना दहा लाख रुपयांपर्यंतचे कर्ज बँकांच्या माध्यमातून मिळते. मात्र चांगला व्यवसाय करणाऱ्या व रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या ४० खासगी कंपन्या व आर्थिक संस्थांची सरकारने निवड केली असून त्यांच्या माध्यमातूनही हे कर्ज मिळू शकेल. हे कर्ज सरकारच देणार असून या कंपन्या…

श्रीमंत व्हायचंय?

श्रीमंत व्हावं, असं कोणाला वाटत नाही? पण, या जगात कोणीही अपघाताने श्रीमंत होत नाही. संपत्ती निर्माण करण्यासाठी, श्रीमंत होण्यासाठी आवश्‍यक असलेल्या गोष्टी करण्याचा निश्‍चय करावा लागतो. यासाठी सर्वांत आधी आपल्या मानसिकतेत करावा लागणारा बदल महत्त्वाचा आहे. यानिमित्ताने श्रीमंत होण्यासाठी जे काही नियम आणि सवयी पाळण्याची गरज असते, त्यावर एक नजर टाकूया.     "मला हे इतक्‍यात शक्‍य नाही. पुढील वर्षी पगारवाढ झाल्यावरच मी गुंतवणूक करीन," हे वाक्‍य आपण अनेकांच्या तोंडून ऐकलेलं आहे. कोणत्याही गोष्टीत दिरंगाईची सवय वाईटच. मात्र, गुंतवणुकीबाबत दिरंगाई केल्यास आपल्याला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागू शकतात, त्यामुळे गुंतवणुकीला सुरवात करण्यास उशीर करू नये. तुम्ही जेवढा उशीर कराल, तेवढी परिस्थिती…

स्वागतार्ह बदल

आतापर्यंत म्युच्युअल फंड कंपन्या एका विभागामध्ये (लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप आदी) कितीही योजना आणू शकत होत्या, त्यामुळे योजनांचे पेव फुटून दोन हजारांच्या वर योजना तयार झाल्या होत्या. त्याचप्रमाणे, लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप याविषयी प्रत्येक म्युच्युअल फंड त्यांच्या स्वतंत्र व्याख्या ठरवीत होते आणि त्याप्रमाणे शेअर खरेदी करीत होते. यामुळे, गुंतवणूकदारांमध्ये गोंधळ आणि संभ्रम निर्माण होत होता आणि त्यांना विविध कंपन्यांच्या योजनांची योग्य तुलना करता येत नव्हती. योजनांची संख्या बरीच असल्याने कोणत्या म्युच्युअल फंडाची कोणती योजना निवडावी, यामध्येसुद्धा क्‍लिष्टता होती.     विविध विभागांमध्ये एकसमानता, सुबोधता, सुसूत्रता आणि प्रमाणबद्धता आणून गुंतवणूकदारांना योजनांची योग्य तुलना करता यावी आणि त्यांची…

समाधानकारक निव्रुत्तिसाठी —-

A 35-year old, having a Rs 70,000 monthly expense, will need Rs 8 crore at retirement 'How much money should I have when I retire?' This is one of the most common questions that financial advisors and planner face when someone new approaches them for help with their future financial Goals. There is no easy answer to this question. The retirement corpus__the amount of money one would require to have a peaceful retired life__varies from person to person, depending on a host of factors, primarily the lifestyle one wants to maintain post retirement and hence the related expenses, said Sanjeev…

सोन्यात गुंतवणुक ??

सणासुदीच्या दिवसात सोने खरेदी करण्याची भारतीयांची मानसिकता आहे. त्यातच गुढीपाडवा, गुरूपुष्यांमृत योग, अक्षयतृतीया आणि दिवाळीसारख्या सणांमध्ये सोनं खरेदीकडे सर्वसामान्य माणसाचा कल असतो. दोन दशकांपूर्वी सर्वसामान्य माणसासाठी गुंतवणूकीचे मर्यादित प्रकार अस्तित्वात होते. त्यातलाच एक आवडता गुंतवणूक प्रकार आहे सोने. काही वर्षांपूर्वीपर्यंत सोन्यातून मिळणारा परतावा चांगला असायचा. संपत्तीची वृद्धी करणारा असायचा.  मुलामुलींच्या लग्नात दागदागिने करण्यासाठी सोन्याची आवश्यकता भासते. त्यातच सोन्याला सामाजिक प्रतिष्ठासुद्धा आहे. यामुळेच सोनेखरेदी हा सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे.    परंतु या दृष्टीकोनांमध्ये आता काळानुरूप बदल करण्याची आवश्यकता आहे. संपत्तीची वाढ तेव्हाच होते जेव्हा आपल्याला गुंतवणूकीतून मिळणारा परतावा हा महागाई दरापेक्षा जास्त असतो.  म्हणजेच दैनंदिन वापरातील वस्तूंच्या किंमती लक्षात घेता महागाई…

End of content

No more pages to load