गृहकर्जाची मुदतपूर्व परतफेड?
तुम्ही तुमच्या गृहकर्जाची मुदतपूर्व परतफेड करण्याचा विचार करीत आहात का? या संदर्भातील अंतिम निर्णय घेण्यापूर्वी पुढील मुद्द्यांचा विचार करा. १) कर्ज परतफेडीसाठी एकरकमी मोठी रक्कम वापरल्याने त्यानंतर आर्थिक समस्यांचा सामना तर करावा लागणार नाही ना, याचा तुम्ही विचार करायला हवा. कारण आपण साठवलेली रक्कम एकदम कमी झाल्याने दर महिन्याच्या खर्चांबरोबरच अचानक उद्भवणाऱ्या एखाद्या खर्चाची तरतूद करण्यासाठी आपल्याकडे पुरेशी रक्कम शिल्लक राहिली नाही तर काय होईल? याची खात्री नसल्यास कर्जाची पूर्ण परतफेड एकरकमी करण्याचा अट्टहास न धरता तुम्हाला शक्य असेल तेवढ्याच रकमेने कर्जाची परतफेड करणे सूज्ञपणाचे ठरेल. २) गृहकर्जाची परतफेड करण्यापूर्वी तुमच्यावर अधिक व्याजदराचे इतर कोणते कर्ज नाही ना, याची खात्री…