टाळावयाच्या चुका

महत्त्वाचे काय? ’  समभाग विकत घेताना आणि विकताना ‘चेकलिस्ट’ वापरा. ती नेहमी छोटी आणि वाजवी ठेवा ’  गुंतवणुकीपूर्वी आवश्यक ती खबरदारी घ्या. सुरक्षित मार्जिन ठेवा, कधीही अघळपघळ गुंतवणूक करू नका. ’  ‘विकत घ्या आणि सांभाळा’ या धोरणाचा अवलंब करा आणि ठरावीक कालावधीने त्याचा पडताळा करा. जितके कमी तुम्ही बाजारातील चढ-उतार पाहाल आणि तुमचा पोर्टफोलिओ तपासून पाहाल तितके कमी तुम्ही शेअर बाजारातील नैसर्गिक चढ-उतारांमध्ये भावनिकरीत्या निर्णय घ्याल. ’  दीर्घकालीन गुंतवणुकीचा निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या. जर तुम्ही एखादा समभाग १० वर्षांसाठी ठेवणार असाल तर एखाद दिवसाचा परतावा गेला तरी फरक पडत नाही. जेव्हा तुम्हाला पॅनिक वातावरण जाणवते तेव्हा आणखी एखादा दिवस वाट…

प्रातिनिधिक योजना पहा

प्रातिनिधिक तीन योजनांची माहिती फ्रॅंकलिन इंडिया प्रायमा फंड ः १९९३ मध्ये सुरू झालेला आणि सातत्याने उत्तम कामगिरी करीत राहिलेला हा फंड त्याच्या रौप्यमहोत्सवी वर्षात पोचला आहे. या फंडाची एनएव्ही आता एक हजार रुपये प्रति युनिटच्या जवळ पोचली आहे. गेल्या २५ वर्षांच्या कालावधीत या फंडाने जवळजवळ २१ टक्के भरघोस वार्षिक परतावा दिला आहे. गुंतवणूकदारांच्या पाठिंब्यावर या फंडाच्या मालमत्तेचे बाजारमूल्य आता ६३०० कोटी रुपयांच्या पुढे पोचले आहे. शेअर बाजारातील तेजी-मंदीच्या चढ-उतारात या फंडाने योग्य गुंतवणुकीच्या आधारावर दीर्घकाळात उत्तम कामगिरी ठेवली आहे. ज्या गुंतवणूकदारांनी या फंडात सुरवातीपासून गुंतवणूक केली असेल, त्यांना त्याचा उत्तम परतावा नक्की मिळाला असेल.   एचडीएफसी इक्विटी फंड ः १९९५…

‘एसआयपी’साठी रोखेसंलग्न फंडांना वाढती पसंती – महिंद्र एमएफ

 सर्वागाने सुरक्षितता हव्या असलेल्या गुंतवणूकदारांसाठी रोखेसंलग्न अर्थात डेट योजना सर्वाधिक पसंतीचा पर्याय ठरत आहे. सध्या म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांमध्ये नियोजनबद्ध गुंतवणुकीचे लोकप्रिय माध्यम ठरलेल्या ‘एसआयपी’ पद्धतीनेही डेट फंडातही मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक ओघ सुरू आहे, रोखेसंलग्न फंडांनी दिलेल्या जोखीमसंतुलित परताव्याची ऐतिहासिक कामगिरी पाहता, तो गुंतवणूकदारांसाठी आकर्षक राहिला आहे. मुख्यत: बँकांमधील मुदत ठेवी, आवर्ती ठेवी, पोस्टाच्या अथवा तत्सम अल्पबचत योजनांसारख्या पारंपरिक पर्यायांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना, तितकीच सुरक्षितता परंतु तुलनेने अधिक लाभ या पर्यायाने दिला असल्याचे आता सामान्य गुंतवणूकदारांच्याही लक्षात येत असल्याचे बिश्नोई यांनी सांगितले. आजवर स्थिर उत्पन्न पर्यायातील लिक्विड तसेच लो डय़ुरेशन फंडांचा वापर हा बहुतांश बडे उद्योग, संस्थात्मक गुंतवणूकदार तसेच उच्च संपदा असणारे…

म्युच्युअल फंडांतील जनजागृतीसाठी ‘जन निवेश’ मोहीम

असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्‌स इन इंडिया (ऍम्फी) 'जन निवेश' या राष्ट्रव्यापी गुंतवणूकदार जागरूकता मोहिमेची मुंबईत आज सुरुवात केली. या मोहिमेचा एक भाग म्हणून मुंबई, बडोदा आणि नोएडा येथे गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडात गुंतवणुकीची शपथ घेतली. या प्रसंगी नागरी उड्डान राज्यमंत्री जयंत सिन्हा, सेबीचे पूर्णवेळ सदस्य जी. महालिंगम, ऍम्फीचे अध्यक्ष ए. बालासुब्रह्मण्यन आदी उपस्थित होते. नागरिकांना बचतीच्या सवयीचा फेरआढावा घ्यावा आणि म्युच्युअल फंडात गुंतवणुकीला विचारात घ्यावे या उद्देशाने जन निवेश मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे. लोकांना 18008333666 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन अथवा www.jannivesh.in या संकेतस्थळाच्या माध्यमातून दरमहा आपल्या एका दिवसाची मिळकत म्युच्युअल फंडात गुंतविण्यासंबंधी शपथ घेऊन या मोहिमेत सामिल होता येईल, असे ऍम्फीने…

‘रिच डॅड, पुअर डॅड’

‘रिच डॅड, पुअर डॅड’चे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांचे एक वाक्य आहे – ‘तुम्ही किती पैसा कमावता हे महत्त्वाचे नाही, तर तुम्ही किती पैसा राखता, तो तुम्हाला किती मिळवून देतो आणि किती पिढय़ा तो राखला जातो हे महत्त्वाचे आहे.’ तेव्हा केवळ पैसा कमावण्यावर लक्ष केंद्रित करू नका, तर शहाणपणाने गुंतवणूक सुरू करा आणि चांगली संपत्ती निर्माण करा हा मिलेनिअल्ससाठी मंत्र असला पाहिजे.

आता सिबिल क्रेडिट स्कोअर ‘व्हॉटसअॅप’वर!

व्हॉटसअॅपवर पा‌ठ‌विण्यात आलेली नोटीस ग्राह्य धरली जाणार असल्याचा महत्वपूर्ण निकाल देऊन  नुकतंच हायकोर्टाने एका प्रकारे व्हॉटसअॅपच्या अधिकृततेवर शिक्कामोर्तब केले. सध्या सबकुछ व्हॉटसअॅपचा जमाना आहे. यामध्ये फिन-टेक कंपन्या तरी मागे कशा राहतील. विशफीन या स्टार्टअप फिन-टेक कंपनीने ट्रान्स युनियन सिबिल बरोबर भागीदारी करत ग्राहकांना त्यांच्या व्हॉटसअॅपवर सिबिल क्रेडिट स्कोअर उपलब्ध करून देण्याचा महत्वपूर्ण करार केला आहे.   सिबिल स्कोअरचे महत्व आपण सगळे जाणून आहोतच. देशात कुठेही कर्ज मिळवताना सिबिल स्कोअर हा मुख्य घटक विचारात घेतला जातो. यावरून कर्ज घेणाऱ्याचे पत मूल्यांकन ठरत असते. ७५० पॆक्षा जास्त सिबिल स्कोअर असणाऱ्यांसाठी कर्ज देताना बँका पायघड्या घालतात तर तोच सिबिल स्कोअर ७५० पेक्षा कमी असल्यास कर्ज मिळवताना  गरजूला प्रचंड…

हे पहा –rule ऑफ 72

Whats Rule 72?   In personal finance, if you divide the number 72 by the rate of interest, you get to know the number of years it will take for you to double the money.. Eg: if the rate of interest is 9%, simply divide the number 72 by 9% and the answer is 8. Thus it will take 8 years to double your money if you invest at 9% p.a. rate of interest.   INTEREST: We can use this rule in reverse to know the rate of interest needed to double your money to achieve your set goal. Eg:…

फिक्सड मॅच्युरिटी प्लॅन म्हणजे काय ते पहा

व्याजदरांत होणाऱ्या बदलांचे दुष्परिणाम टाळण्यासाठी तसेच, डेट गुंतवणुकीतून अधिक परतावा मिळत असल्याने पारंपरिक मुदत ठेवींपेक्षा फिक्सड मॅच्युरिटी प्लॅन्समध्ये (एफएमपी) गुंतवणूक करण्यावर गुंतवणूकदारांचा भर दिसत आहे. एफएमपीच्या माध्यमातून होणारी गुंतवणूक सुरक्षितही असल्याने यातील गुंतवणूकदारांची संख्या वाढत आहे. एफएमपी हे ठरावीक मुदतीचे डेट फंड असतात. हा कालावधी एक महिना, ९० दिवस ते पाच वर्षांपर्यंत असू शकतो. या फंडात तीन वर्षांचा कालावधी निवडल्यास गुंतवणूकदाराला दीर्घकालीन भांडवली करातून (लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स) सवलत मिळत असल्याने अनेक जण हाच कालावधी निवडतात. निर्धारित मुदतीत स्थिर परतावा देणे हे या एफएमपीचे उद्दिष्ट असते. यामुळे बाजारातील चढ-उतारांचा या गुंतवणुकीवर परिणाम होत नाही. एफएमपीमधून गोळा झालेला पैसा हा…

वॉरन बफेचे गुंतवणूकदारांसाठी आठ गुरूमंत्र…

आपल्या गुंतवणूक क्षेत्रातील ज्ञानामुळे जगप्रसिद्ध असलेल्या वॉरन बफे आपल्या अचूक अंदाजासाठीसुद्धा जाणले जातात. उद्योग विश्वात होणारे बदल बफे अचूकपणे टिपत असतात. वॉरन बफेची गुंतवणूकीच्या संदर्भातील सूत्रे जगभरातून लाखो लोक अंमलात आणत असतात. ज्यांना गुंतवणूकदार, ट्रेडर किंवा उद्योगात आपले स्थान निर्माण करायचे आहे ते वॉरन बफे यांना या क्षेत्रातील दैवतच समजतात इतका बफे यांचा प्रभाव आहे. आर्थिक शिस्त, संयम, अचूक विश्लेषण यासारख्या गुणांनी वॉरन बफे यांनी आपले अढळ स्थान निर्माण केले आहे.   जगातला तिसऱ्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती आणि गुंतवणूक गुरू वॉरन बफे यांची काही निवडक गुंतवणूक सूत्रे अशी आहेत.   1. फेथ (विश्वास)   दिर्घ कालात शेअर बाजार नेहमीच फलदायी…

म्युच्युअल फंड पुनर्रचना आणि तुम्ही!

‘सेबी’च्या निर्देशानुसार अनेक म्युच्युअल फंड कंपन्यांनी आपल्या योजनांमध्ये बदल केले आहेत. या संदर्भातील काही प्रश्‍न प्रश्‍न - योजनांची पुनर्रचना कशाप्रकारे झाली आहे? त्यामुळे आम्ही काही करायचे आहे का? उत्तर - यामध्ये तीन प्रकारचे बदल झाले आहेत - १) नावात बदल - यामध्ये फक्त योजनेचे नाव बदलले आहे. त्यातील युनिट्‌सची संख्या आणि एनएव्ही तीच पुढे चालू राहिली आहे. उदा. डीएसपी बॅलन्स्ड योजनेचे नाव डीएसपी इक्विटी आणि बाँड फंड असे झाले आहे; पण गंमत म्हणजे बॅलन्स्ड फंड योजनांची नावे म्युच्युअल फंडांनी स्वत:च्या मर्जीने ठरविल्याचे दिसत आहे. त्यात सुसूत्रता दिसत नसल्याने गोंधळ अधिकच वाढला आहे. २) ॲसेट ॲलोकेशनमध्ये बदल - उदा. रिलायन्स रेग्युलर इक्विटी योजना आता रिलायन्स…

End of content

No more pages to load