गैरसमज !!
म्युच्युअल फंडाविषयी अनेकांचे काही समज- गैरसमज आहेत. ते पहा !! १) म्युच्युअल फंड म्हणजे फक्त शेअर बाजार नव्हे - म्युच्युअल फंड म्हणजे फक्त शेअर बाजाराशी निगडित योजना नव्हेत. त्यांच्या ‘लिक्विड’, ‘डेट’ योजनासुद्धा असतात, ज्यांचा शेअर बाजाराशी संबंध नसतो. २) डी-मॅट खाते - म्युच्युअल फंड गुंतवणुकीसाठी ‘डी-मॅट’ खाते आवश्यक नसते; परंतु तसा पर्याय उपलब्ध असतो. गुंतवणूकदार त्यांची म्युच्युअल फंड युनिट्स ‘डी-मॅट’ खात्यामध्ये ठेवू शकतात. डी-मॅट नसले तरी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता येते. ३) केवायसी अर्थात नो युवर क्लायंट - ‘केवायसी’ची प्रक्रिया एकदाच करावी लागते. ती सर्व म्युच्युअल फंडांना लागू पडते आणि त्यासाठी कोणतीही फी द्यावी लागत नाही. ४) म्युच्युअल फंड योजना बंद…