यूटीआयच्या अॅक्रुअल ओरिएंटेड फंडांत गुंतवणुकीची संधी
भारतीय रिझर्व्ह बँकेने व्याजदरात वाढ करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली असल्याने, गुंतवणूकदार कमी कालावधी विचारात घेता उत्पन्नातील स्थिरता व उच्च अॅक्रुअल यातून फायदा मिळण्यासाठी शॉर्ट टर्म इन्कम फंडांचा विचार करत आहेत. असाच एक फंड म्हणजे यूटीआय शॉर्ट टर्म इन्कम फंड. या फंडाचे उद्दिष्ट, सरासरी मुदतपूर्ती 4 वर्षे असलेल्या मनी मार्केट सिक्युरिटीज व हाय क्वालिटी डेट् पोर्टफोलिओतून कमी जोखीम व उच्च रोखता याद्वारे चांगले उत्पन्न मिळवणे, हे आहे. हा फंड उच्च क्रेडिट गुणवत्ता व पोर्टफोलिओचे वैविध्यीकरण यांना महत्त्व देतो. “आगामी आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत सीपीआय महागाई 5% च्या दिशेने जाण्याची अपेक्षा असताना, महागाई विशिष्ट प्रमाणापर्यंत नियंत्रित करण्याचा दबाव आरबीआयवर असू शकतो.…