टाळण्याजोगे काही—-

मी म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणुकीचे नियोजन करतो, तेव्हा अशी गुंतवणूक करताना कोणत्या गोष्टी टाळायला हव्यात, याकडे लक्ष देतो. त्यापैकी पुढील प्रमुख नऊ गोष्टींचा मी येथे उल्लेख करीन.   १) म्युच्युअल फंडात लाभांश पर्याय शक्‍यतो निवडू नये. या पर्यायात आपलेच पैसे आपणास लाभांश रूपाने मिळतात व तेही लाभांश कर वजा करून!   २) एकरकमी पैसे गुंतवताना, पाच वर्षांपेक्षा जास्त गुंतवणूक कालावधी नसेल, तर इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू नये. आपली गुंतवणूक केलेली रक्कम घटण्याची शक्‍यता असते.   ३) डेट हायब्रिड फंडात गुंतवणूक करू नये. कारण या पर्यायात इतर डेट फंडांपेक्षा जास्त  व्यवस्थापन शुल्क आकारले जाते. याचा परिणाम आपल्या परताव्यावर होऊ शकतो.  …

डेट फंड म्हणजे नक्की काय? 

डेट फंड म्हणजे नक्की काय?  ‘डेट’ म्हणजे कर्ज. म्हणजे डेट फंड वेगवेगळ्या कर्जरोख्यांमध्ये गुंतवणूक करतात. मुख्यतः केंद्र सरकार, तसेच राज्य सरकार, खासगी कंपन्या, सरकारी अथवा खासगी बॅंका आदींच्या कर्जरोख्यांमध्ये गुंतवणूक करतात. जर आपण डेट फंडात गुंतवणूक केली, तर ती सरकारी रोखे किंवा वर सांगितल्याप्रमाणे नामवंत संस्थांच्या रोख्यांमध्ये होते.   कर्जरोखे म्हणजे काय? हा सावकार आणि कर्जदार यांच्यातील लेखी करार असतो. ‘मी तुमच्याकडून रु. ..... इतकी रक्कम कर्जाने ..... मुदतीसाठी घेतली आहे. यावर मी ..... टक्के दराने नियमित (वार्षिक, सहामाही, तिमाही, मासिक किंवा मुदतपूर्तीच्या वेळेस) व्याज आणि मुदतपूर्तीच्या वेळेस मूळ रक्कम परत देईन,’ अशा प्रकारचा हा व्यवहार-करार असतो. यामुळे सावकार आणि…

मोटारविम्याचे नूतनीकरण करताना —

तुमच्याकडे स्वतःची मोटार असेल, तर तिचा विमा उतरवणे किती आवश्यक आहे याची तुम्हाला निश्चितच जाणीव असते. त्यातच पूर्वी कधी तुमच्या मोटारीचे नुकसान झाले असेल तर, मोटारविम्यात कोणत्या गोष्टींच्या भरपाईचा समावेश आहे आणि कोणत्या नाही याचीही तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. आपल्या देशात मोटार विमा उतरवणे कायद्याने बंधनकारक असल्यानेच विमा उतरवण्याचे प्रमाण अधिक आहे. मोटारविमा योजना घेण्यापूर्वी या योजनेतील बारकावे, वैशिष्ट्ये, अटी आणि नियम यांचे बारकाईने वाचन करणाऱ्यांची संख्या अगदीच नगण्य आहे. मोटारविमा योजनेचे नूतनीकरण करतानाही बहुसंख्य ग्राहक नवे बदल, अतिरिक्त सुविधा आणि योजनेत समाविष्ट नसलेल्या बाबींची माहिती न घेताच नूतनीकरण करतात. त्यानंतर मात्र गाडीचा अपघात झाल्यास त्याचा फटका त्यांना बसतो.…

‘लिक्विड फंडां’साठी सेबी ‘लॉक-इन पिरियड’ आणण्याची शक्यता

लिक्विड फंड म्हणजे काय? लिक्विड फंड योजनांमध्ये संपूर्ण तरलता आणि सुलभता आहे. लिक्विड या शब्दाचा अर्थ तरलता. म्हणजेच तुम्ही पैसे अगदी एका दिवसातसुद्धा काढून घेऊ शकता. या प्रकारच्या योजनांमध्ये कोणताही "लॉक इन' काळ नसतो, एंट्री लोड- एक्‍झिट लोड नसतो. समजा बुधवारी पैसे गुंतवले, तर गुरुवारी काढून घेऊ शकता तेही थेट तुमच्या बॅंक खात्यामध्ये. फक्त पैसे दुपारी तीनच्या आत म्युच्युअल फंडाच्या खात्यामध्ये जमा झाले पाहिजेत; तसेच काढण्यासाठी एक दिवस आधी दुपारी तीनच्या आत नोटीस द्यायला पाहिजे. म्हणजेच बुधवारी दुपारी दोनच्या आत गुंतवलेले पैसे काढण्यासाठी नोटीस बुधवारीच तीनच्या आत देणे गरजेचे आहे. असे केले, की गुरुवारी सकाळी दहा वाजता तुमच्या बॅंक खात्यामध्ये…

एसबीआय म्युच्युअल फंड–‘एसडब्ल्यूपी-बंधन’

आज आजूबाजूला बरेच पालक असे दिसतात, की ज्यांची मुलं देशाबाहेर स्थायिक आहेत. अशा पालकांना जर ठराविक रक्कम नियमितपणे मिळावी असं त्यांच्या मुलांना वाटत असेल तर त्याची सोय एसबीआय म्युच्युअल फंडाने ‘एसडब्ल्यूपी-बंधन’द्वारे केली आहे. .‘एसडब्ल्यूपी’ अर्थात ‘सिस्टीमॅटिक विथड्रॉवल प्लॅन’ ही एक अशी सोय आहे, की ज्याद्वारे तुमच्याच म्युच्युअल फंड गुंतवणुकीतून तुमच्या सूचनेप्रमाणे दर महिन्याला ठराविक रक्कम तुमच्या बॅंक खात्यात आपोआप जमा होते, ज्याचा तुम्हाला पेन्शनसारखा उपयोग होतो. ‘बंधन’मध्ये फरक इतकाच आहे, की ही रक्कम तुम्ही तुमच्या पालकांच्या किंवा मुलांच्या किंवा भाऊ-बहिणीच्या अथवा वैवाहीक जोडीदाराच्या बॅंक खात्यातसुद्धा जमा करू शकता. ही रक्कम लाभार्थींसाठी करमुक्त असते, कारण गुंतवणूकदाराने या रकमेवर त्याच्या कर पातळीनुसार…

एचडीएफसी बॅंक– गुतंवणूकदारांना केले सर्वाधिक मालामाल…

 मोतीलाल ओस्वाल या गुंतवणूक क्षेत्रातील दिग्गज कंपनीने संपत्ती निर्मितीच्या संदर्भात केलेल्या एका  अहवालानुसार गुंतवणूकदारांसाठी संपत्ती निर्माण करताना एचडीएफसी बॅंकेने रिलायन्स आणि टीसीएस या दोन मातब्बर कंपन्यांनाही मागे टाकले आहे. 2013 ते 2018 या पाच वर्षात एचडीएफसी बॅंकेने गुंतवणूकदारांना सर्वाधिक परतावा देत मालामाल केले आहे. याआधीच्या अहवालांमध्ये एचडीएफसी बॅंकेला दुसरे आणि तिसरे स्थान मिळाले होते.    एचडीएफसी बॅंकेने गेल्या पाच वर्षात तब्बल 3,247 अब्ज रुपयांची संपत्ती गुंतवणूकदारांसाठी निर्माण केली आहे. तर मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने 3,094 अब्ज रुपयांची संपत्ती याच काळात निर्माण केली आहे. त्याखालोखाल आयटी क्षेत्रातील दिग्गज टीसीएसचा नंबर लागतो. टीसीएस पाच वर्षात गुंतवणूकदारांना 2,532 अब्ज रुपये कमावून दिले आहेत.…

नवीन गुंतवणुकीसाठी इन्फ्रास्ट्रक्चर आणि मिड कॅप फंड

जगभरात व्याजदरांत वाढ होत आहे आणि रोकडसुलभता आटत चालली आहे. कमी होणाऱ्या रोकडसुलभतेचा परिणाम उभरत्या अर्थव्यवस्थांवर अधिक दिसून येत आहे. डॉलरच्या तुलनेत या देशांच्या चलनाचे तीव्ररूपात अवमूल्यन होत आहे. भारतीय अर्थव्यवस्थेच्या बाबतीत बोलायचे तर सध्याच्या स्थितीकडे आर्थिक आवर्तनाचा परिणाम म्हणून बघायला हवे. अर्थव्यवस्थेची जितकी चिंता वाटते तितकी चिंता कंपन्यांच्या ताळेबंदाबाबत वाटत नाही. कंपन्यांच्या उत्सर्जनात होत असलेली वाढ ‘इंडिया ग्रोथ स्टोरी’ अद्याप शाबूत असल्याचे द्योतक आहे. मिड कॅप कंपन्यांच्या समभागात झालेल्या घसरणीमुळे मिड कॅप फंडात नव्याने गुंतवणूक करण्याचा गुंतवणूकदार विचार करू शकतात. अर्थचक्राचा दिशाबदल झाल्यानंतर याच कंपन्या भविष्यात भांडवली लाभ देतील.  दिवाळीनिमित्ताने होणाऱ्या नवीन गुंतवणुकीसाठी इन्फ्रास्ट्रक्चर आणि मिड कॅप फंडात गुंतवणूक…

प्रशांत जैन म्हणतात –दीर्घकाळाचा विचार महत्त्वाचा !!

प्रशांत जैन म्हणतात - भारतीय अर्थव्यवस्था अतिशय मजबूत स्थितीत असून, प्रगतिपथावर आहे. ‘जीएसटी’ किंवा दिवाळखोरी कायद्यासारख्या आमूलाग्र बदलांमुळे तिला आणखी चालना मिळाली आहे. त्यामुळे रुपयाच्या किंवा शेअर बाजाराच्या तात्पुरत्या घसरणीने घाबरण्याचे कारण नाही. त्याऐवजी, शेअर बाजारातील घसरणीचा फायदा घेऊन दीर्घकालीन गुंतवणूक चालू ठेवली पाहिजे. तसेच, गुंतवणूक करताना महागाईदरावर मात करण्यासाठी इतर कोणत्याही गुंतवणूक प्रकारांपैकी ‘इक्विटी’ हाच ॲसेट क्‍लास उत्तम पर्याय आहे !!   ‘एसआयपी’चा मार्ग उत्तम  म्युच्युअल फंडातील ‘एसआयपी’ हा गुंतवणुकीचा पर्याय भारतीय नागरिकांसाठी उत्तम असल्याचे सांगत श्री. जैन यांनी त्याला सोन्याच्या गुंतवणुकीचे उदाहरण दिले. ज्याप्रमाणे आपल्याकडे सोन्यात टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करीत ती दीर्घकाळासाठी ठेवली जाते, त्याचप्रमाणे नजीकच्या काळातील शेअर बाजाराच्या…

खरेदीची संधी साधावी काय?

शेअरबाजारातल्या मूल्यांकनांचे मोजमाप करण्यासाठी अनेकदा समभागाची किंमत आणि त्या कंपनीचे प्रति-समभाग उत्पन्न यांच्या गुणोत्तराकडे पाहिले जाते. जेव्हा समभागांच्या किमती कंपनीच्या उत्पन्नाच्या वाढीच्या वेगापेक्षा जास्त वेगाने वाढतात, तेव्हा हे गुणोत्तर फुगत जाते. निफ्टी निर्देशांकासाठी या गुणोत्तराची २०१० पासूनची सरासरी २१.५ आहे. म्हणजे निर्देशांकाची पातळी निर्देशांकाच्या समग्र प्रति-समभाग उत्पन्नाच्या साधारण साडेएकवीस पट असेल, तर मूल्यांकन सरासरी पातळीवर आहे, असे म्हणता येईल. गेल्या दोन महिन्यांमधल्या १५ टक्के घसरणीनंतरही निफ्टीसाठीचे सध्याचे गुणोत्तर २४च्या थोडे वर, म्हणजे दीर्घकालीन सरासरीपेक्षा १२ टक्के जास्त आहे. मिड कॅप निर्देशांकाच्या बाबतीत तर ही तफावत आणखी जास्त आहे (सोबतचे आलेख पाहा). २०११ ते २०१३ या काळात – म्हणजे संयुक्त पुरोगामी…

End of content

No more pages to load