अस्थिरतेत म्युच्युअल फंड गुंतवणुकीचे काय ?

बहुतेक छोटे गुंतवणूकदार हे शेअर बाजारात तेजी असताना गुंतवणूक करायला सुरवात करतात आणि जरा अस्थिरता दिसली, की घाईघाईने त्यातून बाहेर पडतात. म्युच्युअल फंडाचे ‘सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स’ (एसआयपी) हे बाजारपेठेच्या अस्थिरतेचा फायदा करून देणारे सर्वांत योग्य साधन आहे.  म्युच्युअल फंडाचे ‘सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स’ (एसआयपी) हे तुम्हाला बाजारपेठेच्या अस्थिरतेचा फायदा करून देणारे सर्वांत योग्य साधन आहे. म्युच्युअल फंड योजनेतील या सातत्यपूर्ण गुंतवणुकीमुळे बाजारपेठेत तेजी असताना कमी युनिट्‌स आणि मंदी असताना जास्त युनिट्‌स खरेदी केले जातात. या प्रक्रियेमध्ये कालांतराने युनिट्‌स खरेदी करण्याची सरासरी किंमत कमी होते आणि तुम्हाला नियमितपणे केलेल्या गुंतवणुकीचा फायदा होतो. अस्थिर बाजारपेठेत ‘एसआयपी’ थांबविण्याची किंवा ‘एसआयपी’मधून बाहेर पडण्याची वृत्ती आढळून…

‘एनसीडी’ म्हणजे काय ? बॅंक एफडी घ्यावी की एनसीडी ?

सध्या बॅंका मुदत ठेवींवर (एफडी) ७-८ टक्के व्याज देत आहेत, तर काही कंपन्या अपरिवर्तनीय कर्जरोखे किंवा ‘नॉन कन्व्हर्टिबल डिबेंचर’वर (एनसीडी) सुमारे दोन टक्के अधिक म्हणजे ९-१० टक्के व्याज देऊ करीत आहेत. ‘एनसीडी’त गुंतवणूक करण्याआधी ‘एनसीडी’ म्हणजे काय, त्यांचे प्रमुख प्रकार कोणते व पारंपरिक बॅंक एफडीच्या तुलनेत ‘एनसीडी’ किती सुरक्षित, किती तरल असतात आणि दोन्हींचा करपश्‍चात परतावा किती असतो, आदी महत्त्वाचे घटक समजून घेणे गरजेचे असते.   कंपन्या जारी करीत असलेल्या कर्जरोख्यांचे (एनसीडी) दोन प्रकारे वर्गीकरण करता येईल. ‘कन्व्हर्टिबल’ म्हणजे परिवर्तनीय कर्जरोखे आणि ‘नॉन कन्व्हर्टिबल’ म्हणजे अपरिवर्तनीय कर्जरोखे. ज्या कर्जरोख्यांचे पूर्णतः किंवा अंशतः शेअरमध्ये रूपांतर करण्यात येते, त्यांना परिवर्तनीय कर्जरोखे असे…

‘एसबीआय – ईटीएफ क्वालिटी’ फंड पहा !!

एसबीआय म्युच्युअल फंडाने नवा 'एसबीआय - ईटीएफ क्वालिटी' फंड बाजारात आणला आहे. एसबीआयचा हा पहिला स्मार्ट बिटा फंड आहे. हा एक ओपन एंडेड प्रकारातील फंड आहे. निफ्टी 200 क्वालिटी 30 इंडेक्समधील टॉप 30 कंपन्यांमध्ये 95 टक्के या फंडाद्वारे गुंतवणूक केली जाणार आहे. तर उर्वरित 5 टक्के गुंतवणूक मनी मार्केटमध्ये केली जाणार आहे. हा फंड गुंतवणूकीसाठी 26 नोव्हेंबर रोजी खुला झाला आहे आणि 3 डिसेंबर ही अंतिम तारीख आहे. या फंडातील गुंतवणूकीसाठी कोणताही एन्ट्री लोड आणि एक्झिट लोड नाही. निफ्टी 200 क्वालिटी 30 इंडेक्समधील कंपन्यांचे गुणांकन केले जाणार आहे. त्यासाठी तीन निकष मुख्यत्वे वापरले जाणार आहे. कंपनीची नफा कमावण्याची क्षमता, भांडवलाच्या…

‘एसटीपी’म्हणजे काय?

सध्या प्रत्येक गुंतवणूकदाराला ‘एसआयपी’ची माहिती झाली आहे; परंतु ‘एसटीपी’चे काय? एसआयपीच्या अगदी विरुद्ध पद्धतशीर हस्तांतरण योजना (एसटीपी) हा असा शब्दप्रयोग आहे ज्याची अनेक गुंतवणूकदारांना पुरती माहिती नसण्याचाच संभव आहे. एसआयपी म्हणजे बचत खात्यातून म्युच्युअल फंडात पैसे हस्तांतरित करणे, तर एसटीपी म्हणजे एका म्युच्युअल फंड योजनेतून दुसऱ्या योजनेत पैसे हस्तांतरित करणे. कसा फायदा होतो? जोखमीचे व्यवस्थापन: एसटीपीमुळे अधिक जोखीम असलेल्या श्रेणीतून दुसऱ्या कमी जोखीम असलेल्या मत्तेच्या श्रेणीत पैसे वळवता येतात. उदाहरणार्थ, समजा, तुम्ही निवृत्तीच्या नियोजनासाठी ३० वर्षांसाठी इक्विटी योजनांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी एसआयपी सुरू केलीत. तुम्ही जसे निवृत्तीच्या जवळ पोहोचाल तसे तुम्ही फंड मूल्याचे संभाव्य नुकसान होणे टाळण्यासाठी एसटीपी सुरू करू शकता.…

एसआयपी गुंतवणूक किती कालावधीसाठी असावी ?

दीर्घ कालावधीचा विचार केला तर इक्विटीमधून फार चांगला परतावा मिळतो, असे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. इक्विटी परतावा हा सर्वसाधारणपणे जीडीपीच्या दराचे अनुसरण करतो. त्यामुळे अल्प काळातील घसरणीमुळे विचलित न होता म्युच्युअल फंडातील गुंतवणूक किमान पाच ते सात वर्ष कायम राखावी. परताव्यात घटआल्यास फंडाच्या योजनेमध्ये बदल करावा काय? एखाद्या योजनेच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी फंड मॅनेजरला किमान तीन ते पाच वर्षांचा अवधी देण्याची गरज असते. केवळ वर्षभराच्या कालावधीत कोणत्याही योजनेला जोखता येत नाही. तीन वर्षांनंतरही एखादी योजना चांगला परतावा देत नसेल तर मात्र त्यातून बाहेर पडणे योग्य ठरते. यासाठी फंड मॅनेजरचा सल्ला घ्यावा. एसआयपीतील गुंतवणूक किती काळ चालू ठेवावी? आर्थिक उद्दिष्टे साध्य…

‘ओव्हरनाइट’ प्रकाशझोतात

आतापर्यंत आपल्याला म्युच्युअल फंडांच्या ‘लिक्विड फंड’ योजनांची ओळख होती. या योजनांमध्ये मूळ मुद्दल (बऱ्यापैकी) सुरक्षित असते आणि परतावा बॅंकेच्या बचत खात्यापेक्षा जास्त मिळतो. ‘ओव्हरनाइट फंड’ योजना यादेखील ‘लिक्विड’ योजनांचाच भाग असून, त्या लिक्विड योजनांसारखेच कार्य करतात. यात प्रवेश आणि बहिर्गमन भार नाही, ‘लॉक-इन-पिरियड’ नाही. यातील एकही पैसा शेअर बाजारामध्ये गुंतविला जात नाही, त्यामुळे शेअर बाजाराची जोखीम नाही. शनिवार-रविवार आणि सुटीच्या दिवशीसुद्धा याचे निव्वळ मालमत्ता मूल्य (एनएव्ही) काढले जाते. पैसे काढण्यासाठी अर्ज दिल्यावर दुसऱ्याच दिवशी सकाळी पैसे बॅंक खात्यात जमा होतात. मग आता फरक काय आहे ते पाहूया.    पैसे गुंतविण्यात फरक! ओव्हरनाइट फंडात फरक केवळ पैसे गुंतविण्यामध्ये आहे. लिक्विड योजनांमधील…

एलआयसी एमएफ टॅक्स प्लान

आपण सध्या आर्थिक वर्षांच्या  आठव्या महिन्यांत असल्याने आयकर नियोजनाच्या दृष्टीने कमी कालावधी राहिला असल्याने फंड गटाच्या सरासरीहून अधिक परतावा दिलेल्या एका कर बचत अर्थात ‘ईएलएसएस फंडा’ची ही ओळख. एलआयसी एमएफ टॅक्स प्लान हा ईएलएसएस फंड गटातील २० वर्षे जुना फंड आहे. ईएलएसएस फंड गटात सर्वाधिक रोख रक्कम बाळगणारा फंड असल्याने मागील एका वर्षांत बाजार घसरणीचा सर्वात कमी परिणाम झालेला हा फंड आहे. या फंडाच्या निधी व्यवस्थापनाची सूत्रे ९ मार्च २०१५ पासून सचिन रेळेकर यांच्याकडे आहेत. फंडाची गुंतवणूक मल्टी कॅप फंडाप्रमाणे असून फंडाच्या मालमत्तेत ४७.२९ टक्के लार्ज कॅप, ३०.५६ टक्के मिड कॅप, २.८७ टक्के स्मॉल कॅप प्रकारचे समभाग आहेत. फंडाच्या गुंतवणुकीचा…

परकी गुंतवणूकदारांचे शानदार कमबॅक

गेल्या काही दिवसांपासून अस्थिर असलेल्या शेअर बाजारात परकी गुंतवणूकदारांनी मात्र गुंतवणूक करण्यावर भर दिला आहे. एफआयआयनी नोव्हेंबर महिन्यात शेअरच्या खरेदीचा सपाटा लावला आहे. ऑक्टोबरमध्ये परकी गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारातून आपली गुंतवणूक काढून घेताना दिसत होते. मात्र नोव्हेंबरमध्ये हा ट्रेंड बदलला आहे. नोव्हेंबर महिन्यात मात्र हे चित्र बदलेले दिसत आहे. आतापर्यत परकी गुंतवणूकदारांनी 10,523 कोटी रुपये भारतीय बाजारात ओतले आहेत.    परकी गुंतवणूकदारांनी ऑक्टोबर महिन्यात तब्बल 38,906 कोटी रुपये काढून घेतले होते. यात इक्विटी, डेट आणि हायब्रिड प्रकाराचा समावेश होता. अमेरिकेतील बॉंड्समधून मिळणाऱ्या चांगल्या परताव्याचा प्रभाव परकी गुंतवणूकदारांवर होता. त्याआधी सप्टेंबर महिन्यातसुद्धा गुंतवणूक काढून घेण्यावरच परकी गुंतवणूकदारांचा कल होता.

क्रेडिट कार्डचे फायदे आणि वापरताना घ्यावयाची काळजी

क्रेडिट कार्डचे फायदे आणि वापरताना घ्यावयाची काळजी आर्थिक शिस्त पाळून  क्रेडिट कार्डचा वापर केल्यास २० ते ५० दिवसांसाठी बिनव्याजी पैसे वापरायला मिळतात. तुमच्या आर्थिक व्यवहारांनुसार क्रेडिट कार्ड मर्यादा ठरविली जाते. क्रेडिट कार्डवर अतिरिक्त शुल्क न भरता विमा मिळतो. एकापेक्षा जास्त  क्रेडिट कार्ड वापरू नयेत. क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर भरावे. वार्षिक शुल्क साधारणतः 1100 रुपयांपर्यंत. (बँक आणि क्रेडिट कार्ड प्रकारानुसार शुल्क बदलते ) क्रेडिट कार्ड वापरताना शक्यतो हप्त्यांचा पर्याय टाळावा. अन्यथा व्याज भरावे लागते. तसेच, हप्ता चुकविल्यास अतिरिक्त दंड वेगळा. क्रेडिट कार्डचा वापर एटीएम म्हणून नको. प्रत्येक ठिकाणी वापर टाळावा. तसेच कॅश क्रेडिट घेण्याचा मोह टाळावा. क्रेडिट कार्डचा वापर योग्य झाल्यास…

पीएफ खातेधारक– मिळणार स्वस्तात घर

आता लवकरच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) खातेधारकांसाठी गृहयोजना सुरू होणार आहे. ईपीएफओकडून गृहयोजनेचा प्रस्ताव देण्यात आला असून त्यात त्याअंतर्गत त्यांना स्वस्त घरे उपलब्ध होणार आहेत. सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीच्या येत्या महिन्यात होणाऱ्या बैठकीमध्ये गृहयोजनेचा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे.   सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या खातेधारकांकडे स्वतःचे घर नसेल, अशा खातेधारकांनाच स्वस्तात घरे मिळतील. शिवाय लाभार्थ्याचे खाते उघडून किमान ३ वर्षे झाले असावे आणि घर खरेदीसाठी पीएफ खात्यातून ९० टक्क्यांपर्यंत रक्कम काढता येऊ शकते. किंवा कर्जावरील ईएमआय पीएफ खात्यातून दिला जाणार आहे.     ईपीएफओकडून 'नॅशनल हाउसिंग असोसिएशन' स्थापन करण्याच्या प्रस्तावाचा देखील यात समावेश असून याच नॅशनल हाउसिंग असोसिएशनकडून राज्यांकडून स्वस्त…

End of content

No more pages to load