कर-बचत करताना..

संपूर्ण आर्थिक नियोजनामध्ये कर नियोजन हा एक महत्त्वाचा भाग आहे. परंतु बऱ्याचदा असे लक्षात येते की आपण कर वाचतो म्हणून एखादी गुंतवणूक करतो. मला अनेकजण असे भेटले आहेत ज्यांनी कर वाचवण्यासाठी आपल्या आर्थिक गरजा न समजून घेता किंवा घाईघाईमधे चुकीच्या गुंतवणूक पर्यायांमधे गुंतवणूक केली आणि मग पस्तावले. प्रत्येक गुंतवणूक पर्यायाचा सर्वांगीण विचार न करता फक्त कर कुशलता पाहून त्यात गुंतवणूक करणे म्हणजे आपल्या मुलाला चुकीच्या शाळेत बसवण्यासारखं आहे. कधी तरी पास होईल या अपेक्षेने आपण मुलाला पुढच्या इयत्तेत घालतो का? तिथे आपण त्याच्या क्षमतेचा, त्या बोर्डाच्या अभ्यासामुळे भविष्यात होणाऱ्या फायद्याचा आणि आपल्याला झेपणाऱ्या खर्चाचा विचार करतोच. तर मग कर वाचवतानासुद्धा…

नवी ‘चॅट बोट’ गुंतवणूक सेवा पहा !!!!!!!

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाने एक अभिनव सुविधा आपल्या गुंतवणूकदारांसाठी आणली आहे. गुगल व्हॉईसवर आधारित नवी 'चॅट बोट' गुंतवणूक सेवा आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाने लॉंच केली आहे. या सुविधेला नॅचरल लॅग्वेज प्रोसेसिंगचाही आधार असणार आहे. ही सुविधा नव्या ग्राहकांना केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्याचबरोबर आयसीआयसीआयच्या वेगवेगळ्या म्युच्युअल फंडामंध्ये गुंतवणूक करण्यासाठी ही सुविधा ग्राहकांच्या दिमतीला असणार आहे. आधीच अस्तित्वात असलेल्या जुन्या गुंतवणूकदारांना आपल्या ट्रॅन्झॅक्शनसाठी किंवा असलेल्या फोलिओत एसआयपी नोंदवण्यासाठीही या 'चॅट बोट' गुंतवणूक सेवेचा वापर करता येणार आहे. त्याचबरोबर 'चॅट बोट' या सुविधेचे आखणी अशी पद्धतीने करण्यात आली आहे की ही सुविधा वापरताना जर काही तांत्रिक अडचणी आल्या तर गुंतवणूकदारांचा यासंदर्भात मार्गदर्शन…

स्टेप अप एसआयपी

सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, अर्थात "एसआयपी' ही संकल्पना आता म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्या सर्वांच्याच परिचयाची झाली आहे. "एसआयपी'सारखे परिणामकारक साधन जर योग्य रीतीने वापरता आले नाही, तर त्याची धार बोथट होईल आणि आपली आर्थिक उद्दिष्टे साध्य करणे शक्‍य होणार नाही. त्यामुळे "एसआयपी'चा घेतलेला वसा कधीही टाकू नये; उलट "स्टेप अप' या पर्यायाचा जरूर उपयोग करून गुंतवणुकीची गती वाढविणे योग्य. "एसआयपी' किती?  मासिक उत्पन्न - मासिक खर्च = मासिक गुंतवणूक, अशा हिशेब न करता उत्पन्न - गुंतवणूक = खर्च, असे ठरविले तरच शिस्तीने दर महिन्याचे "एसआयपी' नक्की होईल म्हणजे आर्थिक उद्दिष्टांनुसार गुंतवणूक करायची रक्कम आधी निश्‍चित करून मगच खर्च करावा. थोडेसे आक्रमक…

म्युच्युअल फंडांकडे पैशाचा प्रचंड ओघ

म्युच्युअल फंडांच्या विविध योजनांकडे नागरिकांचा कल वाढला असून, गेल्या महिन्यात (नोव्हेंबर) गुंतवणूकदारांनी तब्बल 1.4 लाख कोटी रुपयांचा ओघ म्युच्युअल फंडांकडे वळविला आहे.    असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्‌स इन इंडियाने (ऍम्फी) दिलेल्या आकडेवारीनुसार, म्युच्युअल फंड योजनांमधील चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या आठ महिन्यांतील (एप्रिल-नोव्हेंबर) गुंतवणूक आता 2.23 लाख कोटी रुपयांवर पोचली आहे. अशा प्रकारे चालू आर्थिक वर्षात म्युच्युअल फंडांच्या विविध योजनांमध्ये विक्रमी गुंतवणूक होऊ लागल्याचे चित्र दिसू लागले आहे. शेअर बाजारात घसरणीचे वारे असून देखील गुंतवणूकदारांनी इक्विटी आणि डेट योजनांना पसंती दिल्याचे समोर आले आहे. बॅंकेच्या ठेवींवर मिळणाऱ्या व्याजदरामध्ये दिवसेंदिवस कपात होत असल्याने गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडाकडे ओढा वळविला आहे. विशेष म्हणजे छोट्या…

टाटा म्यु्च्युअल फंडाचा नवा ‘टाटा आर्ब्रिट्राज फंड’

टाटा म्युच्युअल फंडाने नवा टाटा आर्ब्रिट्राज फंड बाजारात आणला आहे. हा एक ओपन एंडेड, इक्विटी प्रकारातील फंड आहे. या फंडाद्वारे कॅश आणि डेरिव्हेटिव्ह या इक्विटीच्या उपप्रकारांमध्ये मुख्यत: गुंतवणूक केली जाणार आहे. त्याचबरोबर डेट आणि मनी मार्केटसारख्या प्रकारांमध्येही गुंतवणूक करून समतोल साधला जाणार आहे. हा फंड गुंतवणूकीसाठी 10 डिसेंबर खुला झाला असून 17 डिसेंबर ही त्याची अंतिम मुदत आहे. या फंडात गुंतवणूक करण्यासाठीची किमान गुंतवणूक रक्कम 5,000 रुपये इतकी आहे. या फंडाचे व्यवस्थापन शैलेश जैन करणार आहेत. 

बिर्ला सन लाइफ निफ्टी नेक्स्ट ५० ईटीएफ

आदित्य बिर्ला सन लाइफ एएमसी लिमिटेड (पूर्वीची बिर्ला सन लाइफ असेट मॅनेजमेंट कंपनी) या आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेड (पूर्वीची आदित्य बिर्ला फायनान्शियल सर्व्हिसेस लि.) आणि आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंडाची गुंतवणूक व्यवस्थापक (एबीएसएलएमएफ) यांनी बिर्ला सन लाइफ निफ्टी नेक्स्ट ५० ईटीएफ (ईटीएफ) ही निफ्टी नेक्स्ट ५० इंडेक्सचा मागोवा घेणारी ओपन एंडेड योजना लाँच केल्याचे जाहीर केले आहे. नव्या फंड योजनेची नोंदणी ११ डिसेंबर २०१८ रोजी सुरू होणार असून १७ डिसेंबर २०१८ रोजी बंद होणार आहे. ही ईटीएफ विक्रीसाठी सातत्याने परत खुली होणआर असून वाटपानंतर कामकाडाच्या पाच दिवसांत पुनर्खरेदी केली जाणार आहे. निफ्टी नेक्स्ट ५० इंडेक्सने प्रतिनिधीत्व केलेल्या सिक्युरिटीजच्या त्यातील…

लिक्विड फंडाकडे गुंतवणूकदारांची वापसी !!

नोव्हेंबर महिन्यात लिक्विड फंडात चांगली गुंतवणूक झाल्याचे दिसून आले आहे. लिक्विड फंडातील गेल्या तीन महिन्यातील सर्वाधिक गुंतवणूक नोव्हेंबर महिन्यात झाली आहे. गुंतवणूकदारांनी तब्बल 1.4 ट्रिलियन रुपयांची गुंतवणूक लिक्विड फंडात केली आहे. ऑगस्टनंतरची लिक्विड फंड प्रकारातील ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे. गेल्या महिन्यातच आयएल अॅंड एफएसच्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी या फंड प्रकारातून गुंतवणूक काढून घेण्याचा सपाटा लावला होता. 2007 नंतर काढून घेतलेली ही सर्वात मोठी गुंतवणूक रक्कम होती. आयएल अॅंड एफएसच्या आर्थिक अरिष्टाचे सावट हळूहळू दूर होत गुंतवणूकदारांची चिंता कमी होत ते आता मनी मार्केटकडे परत वळू लागले आहेत. आयएल अॅंड एफएसच्या आर्थिक संकटाने लिक्विड फंडसुद्धा एका पातळीवर जोखमीचे आहेत…

गृहकर्जाचे व्याजदर बाजारभावानुसार ठरणार

पुढील आर्थिक वर्षापासून गृहकर्जांचे व्याजदर बाजारभावाशी जोडण्याचा निर्णय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने घेतला आहे. सध्या सीटी बँक वगळता कोणतीच बँक बाजारभावानुसार गृहकर्जाचे व्याजदर ठरवत नाहीत. बाजारभाव वाढले की बँकांचे व्याजदर वाढतात. पण बाजारभाव घटले की व्याजदर कमी होत नाही. हे लक्षात घेऊन रिझर्व्ह बँक गेल्या अनेक वर्षांपासून रेपो रेट आणि गृहकर्जाचे व्याजदर बाजारभावाशी जोडण्याचा विचार करत होती. त्याची आता अंमलबजावणी होणार आहे. व्याजदरांसाठी बाजारभावाचा निकष वापरल्यास व्यवहारात पारदर्शकता येईल. बाजाराचा कानोसा घेऊन राष्ट्रीयीकृत बँकांना ग्राहकांसाठी व्याजदरांची आखणी करता येईल.

येस बॅंकेच्या म्युच्युअल फंड योजना — सेबीची परवानगी…

येस बॅंकेचीच एक उपकंपनी येस अॅसेट मॅनेजमेंटला सेबीने म्युच्युअल फंड व्यवसायात आपल्या योजना बाजारात आणण्याची परवानगी दिली आहे. सेबीने येस बॅंकेच्या दोन म्यु्च्युअल फंड योजनांना परवानगी दिली आहे. देशात सध्या 40 पेक्षा जास्त म्यु्चुयअल फंड कंपन्या आहेत. त्यात आता येस बॅंकेची भर पडणार आहे. येस बॅंक आपल्या दोन नवीन योजना बाजारात आणणार आहे. येस लिक्विड फंड आणि येस अल्ट्रा शॉर्ट टर्म फंड अशा या दोन योजना असणार आहेत. रिझर्व्ह बॅंकेने येस बॅंकेला म्युच्युअल फंड योजना बाजारात आणण्याची परवानगी दिल्यानंतर सेबीने ही परवानगी दिली आहे. याआधीच जुलै महिन्यात सेबीने येस बॅंकेला म्युच्युअल फंड व्यवसायासाठी दरवाजे खुले केले होते.

large retirement corpus?

A 35-year old, having a Rs 70,000 monthly expense, will need Rs 8 crore at retirement 'How much money should I have when I retire?' This is one of the most common questions that financial advisors and planner face when someone new approaches them for help with their future financial Goals. There is no easy answer to this question. The retirement corpus__the amount of money one would require to have a peaceful retired life__varies from person to person, depending on a host of factors, primarily the lifestyle one wants to maintain post retirement and hence the related expenses, said Sanjeev Govila,…

End of content

No more pages to load