एलआयसी म्युच्युअल फंडाने आणला नवा आर्बिट्राज फंड

एलआयसी म्युच्युअल फंडाने नवीन 'एलआयसी एमएफ आर्बिट्राज फंड' या नावाने नवा फंड बाजारात आणला आहे. हा एक ओपन एंडेड स्किम प्रकारातील फंड असून आर्बिट्राज प्रकारातील गुंतवणूक संधींचा लाभ यातून घेतला जाणार आहे. या फंडाची ऑफर 4 जानेवारीपासून गुंतवणूकीसाठी खूली झाली आहे. तर 18 जानेवारी ही यासाठीची अंतिम मुदत आहे. या फंडातील इक्विटी प्रकाराचे व्यवस्थापन योगेश पाटील करणार आहेत. यातील डेट प्रकाराचे व्यवस्थापन मर्झबान इराणी करणार आहेत. या नव्या फंडात गुंतवणूकदार एकरकमी गुंतवणूक करू शकतात. आर्बिट्राज प्रकारात कॅश आणि डेरिवेटिव्ह मार्केटच्या संदर्भात असलेली तसेच डेट सिक्युरिटीज आणि मनी मार्केटमधील संधी या फंडातील गुंतवणूकीतून मिळवण्याचे 'एलआयसी एमएफ आर्बिट्राज फंडाचे उद्दिष्ट आहे. फंड…

कर्मचार्यांना शेअर्स विक्री

कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या विशेष कोट्याअंतर्गत शेअर्स विक्री करून देशातील आघाडीची सार्वजनिक बँक असलेली युनियन बँक ऑफ इंडिया 600 कोटी रुपयांचे भांडवल उभारणार आहे. काल 'स्टेकहोल्डर्स रिलेशनशिप कमिटी'च्या  बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कमिटीने 'युनियन बँक ऑफ इंडिया-कर्मचारी शेअर खरेदी योजना' मंजूर केली आहे. याअंतर्गत पात्र कर्मचार्यांना तब्बल 8 कोटी नवीन शेअर्स खरेदी करण्यासाठी उपलब्ध करण्यात येतील. या अगोदर सिंडिकेट बँकेने देखील कर्मचाऱ्यांना शेअर्स इश्यू करून 500 कोटी रुपये उभारणार असल्याचे जाहीर केले आहे. तर, विजया बँक देखील 5 कोटी रुपयांचे भांडवल अशाच पद्धतीने जमा करणार आहे. सकाळच्या सत्रात युनियन बँक ऑफ इंडियाचा शेअर 2.50 टक्क्यांनी वधारून 91.15 रुपयांवर व्यवहार करत आहे.

एचडीएफसी म्युच्युअल फंड अव्वल स्थानी

देशातील आघाडीची म्युच्युअल फंड कंपनी असलेली एचडीएफसी ॲसेट मॅनेजमेंट कंपनी(एएमसी) मालमत्तेनुसार (एयुएम) नुसार देशातील सर्वात मोठी कंपनी बनली आहे. डिसेंबर मध्ये संपलेल्या तिमाहीत एचडीएफसी एएमसी 3.35 लाख कोटी रुपयांचे व्यवस्थापन करत असून दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल म्युच्युअल फंडाकडे  3 लाख  हजार कोटींची गुंतवणूक आहे. महत्वाचे म्हणजे, 2016 नंतर प्रथमच एचडीएफसी म्युच्युअल फंडाने आयसीआयसीआय प्रुडेन्शिअलला मागे टाकले आहे. 2011 मध्ये रिलायन्स म्युच्युअल फंडाला मागे टाकत एचडीएफसीने सलग पाच वर्षे गुंतवणूकदारांची पसंती मिळविली होती. मात्र 2016 मध्ये आयसीआयसीआय प्रुडेन्शिअलने एचडीएफसी एएमसीला मागे टाकले होते. गुंतवणुकीचा सोपा आणि उत्तम पर्याय म्हणून सर्वसामान्य गुंतवणूकदारांची पसंती म्युच्युअल फंडाला मिळत असताना एचडीएफसी म्युच्युअल फंड देशातील…

आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल लाइफने व्हॉट्सअॅपशी केली भागीदारी

आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल लाइफ इन्शुरन्स ही व्हॉट्सअॅपशी थेट एकात्मिकरण करणारी भारतातील पहिली लाइफ इन्शुरन्स कंपनी ठरली आहे. यामुळे कंपनीला या जगभरातील लोकप्रिय मेसेजिंग सुविधेवर व्हेरिफाइड बिझनेस अकाउंट उघडणे शक्य झाले आहे. आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल लाइफ व्हॉट्सअॅप मेसेजिंग सुविधेचा वापर ग्राहकांना सेवा देण्याचे एक माध्यम म्हणून करणार आहे. ग्राहकांना त्यांच्या लाइफ इन्शुरन्स योजनांचा तपशील सहज उपलब्ध होण्यासाठी कंपनीने अवलंबलेला हा सर्वात मोठा डिजिटल उपक्रम आहे. व्हॉट्सअॅपवर मेसेज मिळण्याची परवानगी देणाऱ्या ग्राहकांना वेलकम किट, योजना प्रमाणपत्र, प्रीमिअम रिसिट व अन्य अनेक सेवा उपलब्ध होतील. मेसेजिंग सुविधेवर वापरल्या जाणाऱ्या मोठ्या प्रमाणातील एन्क्रिप्शनमुळे, ग्राहकाकडून मिळालेली व ग्राहकाला दिलेली माहिती गोपनीय राखली जाते.    

नॉन कन्व्हर्टीबल डिबेंचर्सं

भारतीय कंपन्यांनी 2018 मध्ये नॉन कन्व्हर्टीबल डिबेंचर्सद्वारे (एनसीडी) तब्बल 29,300 कोटी रुपयांची उभारणी केली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यात तिप्पटीने वाढ झाली आहे. नॉन कन्व्हर्टीबल डिबेंचर्स तुलनात्मकरित्या कन्व्हर्टीबल डिबेंचर्सपेक्षा जास्त व्याज देतात. सेबीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार भारतीय कंपन्यांनी उभ्या केलेल्या नॉन कन्व्हर्टीबल डिबेंचर्सच्या संख्येत चांगलीच वाढ झाली आहे. या वर्षी कंपन्यांनी 29,300 कोटी रुपये उभारले आहेत. तर मागील वर्षी नॉन कन्व्हर्टीबल डिबेंचर्सच्या माध्यमातून 9,779 कोटी रुपये उभारण्यात आले होते.    मुथ्थूट फायनान्स, कोसामट्टम फायनान्स, एसआरईआय इक्यूपमेंट फायनान्स, दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉ. जेएम फायनान्शियल क्रेडीट सोल्यूशन्स, श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनी, ईसीएल फायनान्स, इंडियाबुल्स कमर्शियल क्रेडिट, टाटा कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेस, आधार हाऊसिंग…

‘एफडी’चे हे दोन प्रकार—-

क्युम्युलेटिव्ह फिक्स्ड डिपॉझिट्स म्हणजे काय ?  नावाप्रमाणेच ज्यावेळी तुम्ही क्युम्युलेटिव्ह फिक्स्ड डिपॉझिटमध्ये पैसे गुंतवता त्यावेळी तुम्हाला चक्रवाढ वाढीचा लाभ मिळतो. ज्यावेळी तुम्ही क्युम्युलेटिव्ह एफडीजमध्ये पैसे गुंतवता त्यावेळी तुमच्या एकूण कालावधीतील पहिल्या वर्षाचे व्याज हे दुस-या वर्षाच्या मुद्दलात जोडले जाते व त्यानुसार व्याजाचे गणित मांडले जाते.  म्हणूनच जसजशी वर्षे वाढत जातात तसतसा व्याजातून येणारे उत्पन्न वाढतांना दिसते. पण हे लक्षात असू द्या की क्युम्युलेटिव्ह फिक्स्ड  डिपॉझिटमध्ये आपल्याला मुदत संपल्यावरच व्याज  मिळते, जरी व्याजाची गणना वर्षाला किंवा सहा महिन्यांनी होत असली तरीही.  हे कधीकधी तुमच्या एफडीच्या प्रकारावरही अवलंबून असते.     जर गुंतवणुकीचे लक्ष्य हे मालमत्ता तयार करणे असेल तर हा पर्याय अतिशय…

“शार्प रेशो’

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना सर्वसामान्य गुंतवणूकदाराने एखाद्या योजनेने भूतकाळात किती परतावा दिला आहे, या एकाच निकषावर अवलंबून न राहता त्या फंडातील जोखीम आणि त्याने दिलेला परतावा, यांचा संबंध लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी "शार्प रेशो'चा अर्थ समजावून घेतल्यास फंडाची निवड करताना त्याचा उपयोग होऊ शकतो.  कमीतकमी जोखीम घेऊन अधिक काम करणाऱ्या व्यक्तीला आपण "शार्प' अर्थात चाणाक्ष म्हणतो. व्यक्तीप्रमाणेच म्युच्युअल फंडसुद्धा किती "शार्प' आहे, हे ठरविता येते. त्यासाठी "शार्प रेशो'ची मदत घेतली जाते. फंडाने घेतलेली जोखीम आणि दिलेला परतावा याचे गुणोत्तर हा रेशो मांडतो. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना सर्वसामान्य गुंतवणूकदाराने एखाद्या योजनेने भूतकाळात किती परतावा दिला आहे, या एकाच निकषावर अवलंबून…

सर्वसामान्यांना मिळणार आणखी दिलासा

जीएसटी कररचनेतील सुधारणा आणखी पुढे नेत जीएसटी कौन्सिल भविष्यातही सर्वसामान्यांना मोठा दिलासा देणार आहे. महसूलात वाढ होत गेल्यावर देशात दैनंदिन वापरातील वस्तूंवर जीएसटीचा 0 टक्के, 5 टक्के आणि 12 -18 टक्क्यांचा स्टॅंडर्ड रेट लागू होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी याबाबतची घोषणा केली आहे. सध्या चैनीच्या आणि तंबाखू, मद्य यासंदर्भातील वस्तू जीएसटीच्या सर्वाधिक कर श्रेणी प्रकारात आहेत. जीएसटी अंतर्गत एकूण 1,216 वस्तू येतात. त्यातील 183 0 टक्के, 308 वस्तू 5 टक्के, 178 वस्तू 12 टक्के आणि 517 वस्तू 18 टक्के श्रेणीत येतात. 28 टक्क्यांची श्रेणी ही लवकरच रद्द होणार आहे. सध्या सरकारने फक्त 28 टक्के वस्तू 28 टक्के श्रेणीत…

बॅलन्स्ड फंड्‌स: उत्पन्नाच्या समतोल योजना

गेल्या काही काळात बॅंकांचे व्याजदर कमी व्हायला सुरवात झाली आहे. त्यामुळे ठेवींवरच्या व्याजावर अवलंबून असणाऱ्याना आता आपले पुढे कसे भागणार आणि आता कशात गुंतवणूक करावी, असा रास्त प्रश्‍न पडला आहे. जसजशी देशाची आर्थिक प्रगती होत जाते, तसेतसे व्याजदर कमी होतात, असे प्रगत देशांकडे पाहिले की लक्षात येते. देशातील महागाईवाढीच्या दराशी व्याजदर निगडित असतात. आपल्या देशात सध्या 10 वर्षे मुदतीच्या सरकारी रोख्यांवर एक वर्षापूर्वी असलेले 8 टक्के व्याज आता 7.7 टक्के एवढे कमी झाले आहे. त्यामुळे या पुढील काळात आर्थिक प्रगतीचा वेग कायम राखण्यासाठी रेपो दरात कपात करुन कमी व्याजदरांचे धोरणच राबविले जाईल, असे दिसते आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत ठेवींवरच्या व्याजापेक्षा…

आयडीएफसी होणार ‘आयडीएफसी फर्स्ट बँक’

बिगर बँकिंग वित्त संस्था कॅपिटल फर्स्ट आणि आयडीएफसी बँकेचे विलीनीकरण पूर्ण झाले असल्याची माहिती दोन्ही कंपन्यांच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे. तसेच भागधारकांची मंजुरी मिळताच 'आयडीएफसी फर्स्ट बँक' म्हणून कामकाजाला सुरुवात होऊन कॅपिटल फर्स्टचे संस्थापक -अध्यक्ष व्ही वैद्यनाथ बँकेचे एमडी आणि सीईओ पदाची सूत्रे हाती घेतील. दोन्ही कंपन्यांच्या एकत्रित येण्यामुळे आयडीएफसी बँकेला 'रिटेल' आणि 'व्होलसेल' प्रकारात विविध प्रकारची उत्पादने / ऑफर्स सादर करता येणार आहेत. तसेच दोन्ही कंपन्यांच्या एकत्रीकरणानंतर 203 बँक शाखा, 129 एटीएम आणि 454 ग्रामीण व्यापार प्रतिनिधी केंद्रांद्वारे बँक 72 लाख ग्राहकांना सेवा पुरवेल. 12 जानेवारी 2018 रोजी कंपन्यांच्या एकत्रीकरणाला सुरुवात झाली होती. शेअरधारकाला 10 कॅपिटल फर्स्टच्या शेअर्सच्या…

End of content

No more pages to load