रिलायन्स इंडस्ट्रीजने एक नवा विक्रम केला

मुकेश अंबानीच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने एक नवा विक्रम केला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने डिसेंबरअखेर सरलेल्या तिसऱ्या तिमाहीत 10,251 कोटी रुपयांचा दणदणीत नफा मिळवला आहे. 10,000 कोटी रुपयांचा निव्वळ नफा एकाच तिमाहीत मिळवणारी रिलायन्स ही देशाच्या खासगी क्षेत्रातील पहिली कंपनी ठरली आहे. रिलायन्सच्या नफ्यात 8.82 टक्क्यांची वाढ झाली आहे. याआधीच्या सप्टेंबरअखेर सरलेल्या तिमाहीत कंपनीने 9,516 कोटी रुपयांचा नफा मिळवला होता. विश्लेषकांच्या अपेक्षेपेक्षा जास्त नफा रिलायन्सने कमावला आहे.

तज्ञ म्हणतात —

 डिसेंबर 2018 अखेर इएलएसएस प्रकारातील म्युच्युअल फंडातील गुंतवणूकीत 27 टक्क्यांची घसरण झाली आहे. डिसेंबर अखेर इएलएसएसमध्ये 841 कोटी रुपयांची गुंतवणूक झालेली होती. तर डिसेंबर 2017 अखेर इएलएसएसमधील गुंतवणूक 1,166 कोटी रुपयांवर होती. अॅम्फीने यासंदर्भातील आकडेवारी जाहीर केली आहे. मागील वर्षभरात शेअर बाजारात सुरू असलेले चढउतार, अस्थिरतेचे वातावरण यामुळे इक्विटी प्रकारात चांगला परतावा मिळालेला नाही. याचा परिणाम इएलएसएसमधील गुंतवणूकीवरही झाला आहे. इएलएसएस प्रकारातील गुंतवणूक मुख्यत: करबचतीच्या उद्देशाने केली जाते. 'इक्विटीचा परतावाच नकारात्मक असल्यामुळे मागील वर्षभरात या प्रकारातून गुंतवणूकरदारांना अपेक्षित असलेला परतावा मिळू शकलेला नाही. त्याचबरोबर मागील वर्षभरात मुदतठेवींच्या व्याजदरांमध्ये अर्ध्या टक्क्याची वाढ झालेली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी या प्रकारातील गुंतवणूक कमी केलेली…

‘ASBA’ म्हणजे काय?

आयपीओ गुंतवणूकदारांसाठी खुला झाल्यानंतर पब्लिक इश्यूसाठी अर्ज करताना शेअर्स मागणी अर्जासोबत चेक, डिमांड ड्राफ्ट अथवा अँस्बा (ASBA - Application Supported by Blocked Amount) यांपैकी कोणत्याही एका पद्धतीने पेमेंट करता येत होते. (ASBA पद्धतीने पेमेंट करण्याचा पर्याय 2008 पासून उपलब्ध आहे.) तथापि एक जानेवारी  2016 पासून ‘सेबी’ने ASBA पद्धतीनेच पेमेंट करणे बंधनकारक केले आहे आणि त्यामुळे ‘ASBA’ विषयी गुंतवणूकदारांना माहिती असणे आवश्यक आहे. या पद्धतीमध्ये आपल्याला जेवढ्या शेअर्ससाठी अर्ज करायचा असेल, त्यासाठी लागणारी रक्कम (ही रक्कम प्राइस बँड, लॉट साइज व आपण मागणी करत असलेले एकूण लॉट यावर अवलंबून असते.) गोठवून ठेवण्याचा अधिकार आपल्या बँकेला देणे आवश्यक असते. उदा. मागील लेखात…

योग्य आर्थिक सल्लागाराच का हवा ?

सरलेले २०१८ साल हे सामान्य गुंतवणूकदारासाठी तसं निराशाजनक होतं. त्यातही मिड आणि स्मॉल कॅप फंडांमध्ये भरपूर नुकसान झालं. इन्फ्रा, बँकिंग आणि कन्झम्प्शन फंडांमध्येसुद्धा नुकसान सोसावं लागलं. आयएल अ‍ॅण्ड एफएस गोंधळामुळे डेट फंडसुद्धा तोटय़ात गेले. तर या सर्व घटनांमुळे आपण काही शिकलो का? हे तर नक्कीच शिकलो की, जेवढी मानतो तेवढी जोखीम क्षमता आपली नसते. दुसरे म्हणजे, ध्येयानुसार गुंतवणूक, त्यानुसार गुंतवणूक पर्याय या अनुषंगाने केली नाही तर तोटा होऊ शकतो. प्रत्येक गुंतवणुकीचं एक चक्र असतं. ती गुंतवणूक आधी शांत असते, मग ती हळूहळू वर येते, मग ती प्रचंड वेगाने वाढते, त्यानंतर खाली येते, आणि मग पुन्हा शांत होते. तेव्हा तुमच्या पोर्टफोलिओमध्ये…

‘एलआयसी शॉर्ट टर्म डेट फंड

एलआयसी म्युच्युअल फंडाने नवा 'एलआयसी शॉर्ट टर्म डेट फंड' बाजारात आणला आहे. हा फंड ओपन एंडेड शॉर्ट टर्म फंड आहे. 1 ते 3 वर्षांच्या कालावधीसाठी गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांना डोळ्यासमोर ठेऊन हा फंड बाजारात आणण्यात आला आहे. या एनएफओची ऑफर अंतिम मुदत 25 जानेवारी आहे. या फंडाचे व्यवस्थापन मर्झबान इराणी करणार आहेत. गुंतवणूकीच्या जोखमीच्या तुलनेत परतावा मिळवून देण्याचे या फंडाचे उद्दीष्ट आहे.    फंड मॅनेजर क्रेडीट रेटींग एजन्सीने दिलेल्या मानांकनाच्या आधारात डेट प्रकारात गुंतवणूक करणार आहे. व्याजदर, व्याजदराची रचना, रोकडेची उपलब्धता, रिझर्व्ह बॅंकेचे धोरण, वाढत्या अपेक्षा, वित्तीय तूट, जागतिक व्याजदर, चलनवाढ या सारखे मुद्दे लक्षात घेऊन फंड मॅनेजर या फंडाद्वारे…

E M I – किती असावा ???

E M I - किती असावा ???   आज अतिशय महत्वाच्या अशा मुद्यावर आपण माहिती घेणार आहोत, तो म्हणजे EMI किती असावा? खरेतर EMI किती असावा याचा काही नियम नाही. तुम्ही कितीपण EMI घेऊ शकता परंतू, खरच आपण त्याला काही तरीमापदंड लावायलाच पाहिजे, नाही तर पगार कमीआणि EMI जास्त होतो. EMI ची एकदा सवय लागली की मगआपण त्या ट्रॅप मध्ये अडकत जातो आणि बाहेर पड़ने खुपअवघड होऊन जाते, मी मागच्याच महिन्यात अनुभवलेला एक EMI चा ट्रॅप. त्या ट्रॅप मध्ये अड्कलेल्या एका फॅमिलीचा EMI किती होता ते बघू… मला गेल्या महिन्यात माझे एक गुंतवणूकदार जे पुण्यामध्ये असतात त्यांचा फ़ोन आला, त्यांच्या…

गृहकर्ज सुलभतेने मिळवण्यासाठीच्या या सूचना..

गृहकर्ज सुलभतेने मिळवण्यासाठीच्या या सूचना   तुमचे पत (क्रेडिट) नामांकन तपासा : कमी दराचे गृहकर्ज मिळवण्यासाठी तुमचे पतनामांकन तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे, जसे की ‘सीबीएल’ किंवा ‘एक्वीपॅक्स’. ग्राहकाने अशाप्रकारचे पतनामांकन केले नसेल तर त्याला ‘प्रीमियर’ भरावा लागतो. त्यामुळे चांगले पतनामांकन राखणे गरजेचे आहे.    घर घेण्यापूर्वीच गृहकर्जाची मंजुरी मिळवा : घर खरेदीची प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी ग्राहकाने आपले ‘बजेट’ तपासावे. तसेच आपल्याला किती गृहकर्ज मिळू शकेल तसेच किती ‘डाऊनपेमेंट’ करावे लागेल याचा अंदाज घ्यावा. बरेच जण आधी घराची खरेदी करण्याची चूक करतात नि मग गृहकर्ज मिळवण्याच्या मोहिमेस त्यांच्याकडून प्रारंभ होतो. उदा. एखाद्या मालमत्तेचे मूल्य जर ६० लाख रुपये असेल आणि ग्राहकाकडे…

इन्फोसिस पुन्हा ‘शेअर बायबॅक’ करण्याची शक्यता

आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेली ‘इन्फोसिस’ पुन्हा एकदा ‘शेअर बायबॅक’ करण्याची शक्‍यता आहे. येत्या 11 जानेवारीला होणाऱ्या कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत शेअरच्या ‘बायबॅक’ प्रस्तावावर विचार केला जाणार असल्याचे समजते. कंपनीकडून 1.6 अब्ज डॉलर मूल्यही शेअर पुन्हा विकत घेतले जाण्याची शक्यता आहे. म्हणजे भारतीय रुपयात सुमारे 11 हजार 264 कोटी रुपयांचे शेअर विकत घेतले जाणार आहे. शिवाय गुंतवणूकदारांसाठी स्पेशल डिव्हिडंटची देखील घोषणा केली जाणार आहे.   कंपनी येत्या 11 जानेवारीला तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करणार आहे. गेल्यावर्षी कंपनीने 13 हजार कोटी रुपयांचे ‘शेअर बायबॅक’ केले होते. इन्फोसिसच्या जवळपास 36 वर्षांत पहिल्यांदाच कंपनीने शेअर बायबॅक करण्याचा निर्णय घेतला होता. शिवाय एप्रिल महिन्यात…

सकारात्मक भारतीय शेअर बाजार

मागील दोन सत्रांपासून सकारात्मक वाटचाल करीत असलेला भारतीय शेअर बाजार आज देखील तेजीत बंद झाला. आज मुंबई शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्समध्ये 130 अंशांची वाढ होऊन 35,980 वर बंद झाला. तर, राष्ट्रीय शेर बाजार निर्देशांक निफ्टी 30 अंशांच्या तेजीने 10,802 वर स्थिरावला. शेअर वधारले: सनफार्म, आयसीआयसीआय बँक,एसबीआय , येस बँक, टाटा मोटर्स, ऍक्सिस बँक शेअर्स घसरले: कोटक बँक, एनटीपीसी, एचडीएफसी आज विशेष भारत डायनॅमिक्स लिमिटेडच्या शेअरमध्ये 9 टक्क्यांची तेजी भारत डायनॅमिक्स लिमिटेडला भारतीय लष्कराकडून अँटी-टँक मार्गदर्शित मिसाईल (एटीजीएम) आणि लॉन्चर्सची पुरवठा करण्यासाठी 760 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाल्याने कंपनीच्या शेअरमध्ये 9 .5 टक्क्यांनी वाढ होऊन शेअर 304.90 रुपयांवर पोचला होता. बंधन बँक…

लिक्विड फंड असाही वापरावा !!

काही खर्च असे असतात, की ते आपल्याला वर्षातून एकदाच करावे लागतात. त्यात सोसायटी मेंटेनन्स, आयुर्विमा हप्ता, मोटार विमा हप्ता, महापालिका मिळकत कर, नोकरांना बोनस आदी. अशा खर्चाचे नियोजन दरमहा गुंतवणूक करून केले तर वर्षअखेरीस त्या खर्चाचे ओझे वाटत नाही आणि दरमहा केलेल्या गुंतवणुकीवर व्याजसुद्धा (परतावा) मिळते. उदाहरणार्थ, आपल्या स्थावर मालमत्तेचा मिळकत कर आपल्याला एप्रिलमध्ये द्यावा लागतो. तो समजा, 12,000 रुपये आहे. त्यासाठी बॅंकेत दरमहा 1000 रुपयांचे रिकरिंग डिपॉझिट (आर.डी.) खाते सुरू केले, तर त्यावर 6.50 ते 7 टक्के दराने व्याज मिळेल आणि एप्रिल महिन्यात एकरकमी 12,000 रुपयांचा मिळकत कर भरायला जड जाणार नाही. यापुढे जाऊन, एलआयसी म्युच्युअल फंड, तसेच बिर्ला…

End of content

No more pages to load